सर्पणाला एकदा पालवी फुटली
त्यालाही जगण्यात मजा वाटू लागली
सर्पणच ते चुलीत जळायचेच होते
इतरांसारखेच राख होऊन वर जायचे होते
प्रेतांच्या ढिगाऱ्यात असेच पडून होते
स्वगत सर्पणाचे ==
फुंकलास का जीव तू या शुष्क देहात ?
कधी राख होईन , हि भीती मनात
पुन्हा जन्म घेऊनि काय रे तो अर्थ
जगावे वाढावे ते कोणा प्रित्यर्थ ?
उभा जीव अमुचा तुझ्या लेकरांशी
ती खेळती नित्य आमुच्या जीवाशी
कुणी तोडे पान, कुणा आवडे फुल
कुणी घेई जीव ,पेटवण्यासाठी चूल
किती देऊ फळे , जरी आमुची बाळे
तरी नाही शमले त्यांचे नीच चाळे
आम्ही वाढतो देण्यासाठी ते श्वास
ते श्वास घेता घेता घेती आमचाच घास
गतजन्मी असणार नक्की जन्म मानवाचा
ते पाप फेडण्या पुनर्जन्म झाडाचा
{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}
| लेखनविषय: |
|---|
वाचने
9138
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
कोंबडीचे मनोगतही लिहा ना
In reply to मस्त by ज्ञानोबाचे पैजार
कोंबडीला पाय फुटले
In reply to कोंबडीचे मनोगतही लिहा ना by Yogesh Sawant
बेस्ट
In reply to कोंबडीला पाय फुटले by महासंग्राम
+1
==)) ==)) ==))
हि घ्या मंदार शेट ,,
Ewwwww एकदम कडक झालाय तंदूर
In reply to हि घ्या मंदार शेट ,, by खिलजि
मूळ कविता आणि विडंबन दोन्ही
छान!!!
मी कवितेचे मनोगत
क्या बात है नाखु काका
In reply to मी कवितेचे मनोगत by नाखु
पूर्णतः सहमत पै बु काकांशी ..
In reply to क्या बात है नाखु काका by ज्ञानोबाचे पैजार
नाखुकाका (महाराजा) , आपले
ही कवीता
In reply to नाखुकाका (महाराजा) , आपले by खिलजि
धन्यवाद नाखुकाका ,, आपले
वाह!
धन्यवाद जॉनविक्क साहेब ,
मुळ कविता आणि प्रतिसाद दोन्ही
खिलजी ची आवडलेली पहिला वहिली
जब्राट अभिप्राय ... आवडलं
छान !
सर्पणाला एकदा पालवी फुटली
नमस्कार ,