Skip to main content

भविष्य

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 12/09/2019 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
वर्तमानपत्रातले रोजचे राशिभविष्य सकाळी पहिला चहा घेण्याआधी वाचून घ्यावे असे माझे ठाम मत झाले आहे. तसे केल्याने त्या दिवसाच्या भविष्यानुसार वागण्याची आखणी करता येते. त्याचे दोन फायदे असतात. पहिला म्हणजे, भविष्यानुसार आपण त्या दिवशीच्या वागण्याची आखणी केली तर वर्तमानपत्रांनी वर्तविलेले भविष्य तंतोतंत खरे ठरविता येऊन भविष्य वर्तविण्याच्या विद्या किंवा शास्त्रावर आपला विश्वास बसतो, आणि दुसरे म्हणजे, आपले त्या दिवसाचे वागणे केवळ रामभरोसे रहात नसल्याने व कोणा तरी शास्त्राच्या मार्गदर्शनाखाली घडणार असल्याने त्या वागण्याचे जे बरेवाईट परिणाम होणार असतात, त्याचे वाईट वाटत नाही.

भाग ३ - जब वी मेट - समा, समा है ये प्यार का...

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 12/09/2019 14:29 या दिवशी प्रकाशित केले.

भाग ३ - जब वी मेट - समा, समा है ये प्यार का...

  1 भोळा शशी... आमच्या आवडीचे गाणे आम्ही ऐकत होतो... कहीं दिल ना चुराले मौसम बहार का... माझे मन मागे मागे गेले...

दिवसभराची कमाई

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 12/09/2019 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
आज गुरूवार. दत्ताचा वार. दिवसभर बसून होतो. मधूनच पावसाची सर यायची. तात्पुरता आडोसा शोधायला लागायचा. समोरच्या दुकानाच्या पायर्‍यांवर गर्दी व्हायची. अंग ओले झाल्याने बसवत नव्हते. तरीपण पाच वाजेपर्यंत बसून राहीलो. घरी जाणार्‍यांची गर्दी संध्याकाळीच होते. घरी जाता जाता दत्ताला हात जोडून, पैसे टाकून ते पुण्य कमवत होते. कंटाळलो कंटाळलो अन मग तेथून उठलो. बँकेत अकाऊंटला नेटबँकींगने पैसे ट्रान्सफर केले. थोडे पैसे गावी आयएमपीएसने पाठवले. खर्चासाठी अर्जंट पाहीजे म्हणत होती. ओले अंग अन थंडीच्या उतार्‍यासाठी समोरच्या शॉपमधून बाटली घेतली. अन स्विगीवरून ऑर्डर मागवली.

सहजच

लेखक चंद्र.शेखर यांनी गुरुवार, 12/09/2019 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
तुला भेटण्याची ओढ मला अनंत काळापासून लागून राहीलेली आहे ... निसर्गात तू असतोस म्हणे म्हणून मग तुझ्या ओढीने मी पर्वतांत ट्रेकिंग ला जातो तुझा रखरखीतपणा देखील अंगावर झेलतो, मातीच्या सुगंधानं हरखून जातो जंगलात-शेतात जातो, नदीत डुंबतो, पाण्याची तरलता, प्रवाह, ओढ मी माझ्यात साठवतो, प्रसन्न वाटतं तिथे एखादी मोठी शीळा बघून तिच्या आडोशाला मी शरीर मोकळं करतो छोट्या सुबक दगडांना मात्र मी सोबत घेवून येतो, शेंदूर फासतो आणि त्यांच्यासमोर मन मोकळं करतो तु सर्वव्यापी आहेस मी मुलांना हेच त्यांच्या लहानपणापासून शिकवतो पण शरीरधर्माच्या त्या दिवसांत विटाळ होईल म्हणून मी मंदिराच्या गाभाऱ्यात, देवघराजवळ जात नाही

तंत्रजगत करीअर विषयक सल्ला

लेखक सिरुसेरि यांनी बुधवार, 11/09/2019 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर मंडळी . मी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात DBA क्षेत्रामधे १०+ वर्षे काम करीत आहे . नेहमीच्या routine कामापेक्षा यापुढे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामधेच काहितरी नवीन / advanced तंत्र शिकुन / जाणुन त्यामधे काम / करीअर करण्याचा विचार करीत आहे . अर्थात , जिथे मला माझ्या या आधी केलेल्या कामाच्या अनुभवाचा उपयोग होइल असेच पर्याय ठरवायचे आहेत . Technical writing / cloud technology असे काही options ठरवत आहे . पण इतर options बद्दलही जाणुन घेणे महत्वाचे वाटत आहे .