Skip to main content

गुलाबी कागद निळी शाई....5 चंद्रवेळ

लेखक प्राची अश्विनी यांनी गुरुवार, 02/07/2020 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाबी कागद निळी शाई..4 अलवार Hi दोन दिवस झाले अजून तुझं उत्तर नाही. काय झालं? तू काल ऑफिसला पण नाही आलास? Is everything ok??? सारखं वाटतंय फोन करावा किंवा निदान मेसेज तरी. तुझ्याकडे माझा नंबर जरी नसला तरी माझ्याकडे तुझा आहे. (कसा मिळवला विचारू नकोस.:)) पण असंही वाटतंय मला टाळत तर नाहीस ना? काही चुकीचं लिहिलं होतं का मी पत्रात? आठवत नाहीये. दुखावलं का मी तुला? If so then sorry. मेल किंवा मेसेज असता तर मी काय लिहिलं ते वाचता तरी आलं असतं.

वारी नाही ...

लेखक मनोज यांनी बुधवार, 01/07/2020 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
वारी नाही बारी नाही दिसणार हरी नाही विठ्ठला रे तुझ्या विना दुसरा कैवारी नाही साल भर खपायचे वावरात झिजायचे एका दर्शनाने देवा दु:ख सारे जिरायचे पावसाच्या सरी माथी पाया खाली घाट वाट लाख लाख तूच सवे मैल गेले पटापट आला गाव गेला गाव खाणे पिणे तमा नाही मुखी नाव चित्ती रूप बाकी काही जमा नाही पाहताच शांत झाली काळजाची घालमेल दिसे रूप असे डोळा आनंदच खोल खोल काय पाप झाले देवा नाही आता परवणी घर झाले बंदीशाळा डोळ्या मध्ये जमा पाणी घोर किती जीवा मा‍झ्या नाही येणे माहेराला विनवणी हीच माये तूच यावे भेटायाला