Skip to main content

[शशक' २०२०] - मिष्टेक

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 17/04/2020 या दिवशी प्रकाशित केले.

मिष्टेक




वडापाव खाताना कचकन दाताखाली आलेलं रुपयाचं नाणं तोंडातून चिमटीत काढून घेऊन ते शाळेच्या कँटिनवाल्यापुढं नाचवत, अख्ख्या शाळेवरून ओवाळून टाकलेला दहावीतला साहेबराव त्याच्यावर खेकसत होता, "लाज नै वाटत आमा पोरांच्या जीवाशी खेळायला? तरी बरं ह्यो नाणं पैल्याच घासाला दाताखाली आलं. एखांदा ल्हाना पोरगा असता तर जीवानिशी गेला असता ना? आता हेडसरांनाच तुझा पर्ताप सांगतो." "सायेबराव मिष्टेक झाली. पन हेडसरांकडं म्याटर नेऊ नका. पाया पडतो" "पुन्यांदा अस्ली मिष्टेक केलीस तर जल्माची अद्दल घडवीन." आसपासच्या पोरांना नजरेच्या जरबेने हाकलवून देत साहेबराव गुरकावला. अन् कँटीनवाल्याच्या अंगावर तेच चघळचोथा नाणं भिरकावत दबक्या आवाजात बोल्ला,... ..."हे घे गुमान अन् धा वडापावचं पार्सल दे लाल चटनी मारून"


वाचने 3765
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

+१

+१

+१

छान

+१

+१