रंगराज्य -२
डॉक्टरीचं शिक्षण म्हणजे एकदम रटाळ काम असतं. त्यातही जर आयुर्वेद शिकायचा असेल तर ती भुक कॉलेजात कधीच पुर्ण होत नाही. मग पर्याय असतो ते प्रस्थापित वैद्यांच्या OPDs अटेंड करणे, पुण्यातले माझी सात वर्षही अशीच खुर्चीमागे उभी राहुन सरली. अगदी पहिल्या वर्षापासूनच याची सुरुवात झाली होती. राहायचो समितीला म्हणजे एफ सी रोडवर पटवर्धनांच्या पॅलेसमागे अन् कॉलेज सदाशिवात. वाहतुकीचं साधन एकच , सायकल. सकाळी साडे सातला तुळशीबागेत वैद्य अजित जोशींच्या दवाखान्यात तिकडुन दहा पर्यंत परत होस्टेल, कारण मेसला जेवण नाही केलं तरी दंड असायचा. जेवुन लगेच सदाशिवात कॉलेजला . .
मिसळपाव
मुंबई ते कन्याकुमारी सायकलवारी करायचा प्रस्ताव आला. परंतु दिवाळीच्या दिवसात सायकलिंगसाठी मुंबई बाहेर जायचे, याला मन तयार होईना. वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी एव्हढी मोठी सायकल सफर करावी का हा सुद्धा विचार आला. आतापर्यंतच्या आयुष्यात कुटुंबासमवेत दिवाळी साजरी केली होती. ह्या वर्षी निसर्गसोबत साजरी करायची.