मेघाची गोष्टं
* कथा जुनीच आहे. मिसळपावच्या वाचकांसाठी ईथे नव्याने देत आहे.
मेघाची गोष्टं
आता मी मोठा झालो आहे! खूप मोठा!....इंग्लिश देवाची पुस्तकं वाचण्याएवढा मोठा!....गच्चीवर एकटा झोपण्याएवढा मोठा!....माझ्याच पैशातून रंगीत कागद विकत घेण्याएवढा मोठा!....एकट्याने चार ग्लास रसना पिण्याएवढा मोठा!....बर्फ खाल्ल्यावरही ताप न येण्याएवढा मोठा!.....विमानाने अमेरिकेला जाण्याएवढा मोठा!.....मी आता एक ग्रेट आणि शहाणा माणूस झालो आहे हे नक्की.
माझ्या वर्गातली मिनी चिरमुले आज दुपारी 'तू मला आवडतोस' असे सांगत होती. मिनी अजून लहान आहे. मोठ्यांच्या सगळ्या गोष्टी तिला कळतातंच असे नाही.
कोठडी
कोठडी
-----------------------------------------------------------------------------------------------
साहिल कोठडीच्या आत शिरला. त्याच्या मागे लोखंडी दार आवाज करत बंद झालं.
त्याच्यावर खुनाचा आरोप होता. साराच्या, त्याच्या मैत्रिणीच्या खुनाचा.
तो आत जाऊन भिंतीला टेकून बसला. सुन्न ! आणि त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले.
एखादं झाड , एखादं घर डेंजर असतं सालं . झपाटलेलं ! पण एखादी तुरुंगातली कोठडी? ... तशी असू शकते ? ...
ती कोठडी तशीच होती . पण साहिलला तरी ते कसं माहित असणार . त्या क्षणाला ती कोठडी शांत होती . दगडी . जुनीपानी . अनेक गुन्हेगार पचवलेली आणि पोचवलेली .
समाज आणि काम
वाशी नाकावरच्या मेन रस्त्यावर ती म्हातारी मागच्या दोन दिवसांपासून भीख मागत बसली होती, राहायची चेंबूरला…. म्हातारीचा नवरा वारला बाई जवानीत असताना, एकुलता एक मुलगा मस्त सिंधी कॉलनीजवळच्या सरळ रेषेत असलेल्या म्हाडाच्या ब्लिडिंगच्या शेवटच्या टोकाला लागून पसरलेल्या वीस-पचवीस घराच्या बैठया चाळीपैंकी एका घरात राहतो, एकच रुम त्यात पडदा टाकून किचन आतल्या बाजूला, सलग मोरी, तरी ही म्हातारी इथं अशी रस्त्यावर का? अशी दीनवाणी…. अंगावरचं लुगडं ते तसचं, दोन दिवस झाले….. अंगाला पाणी नव्हतं….
कोविड-19 माझी डायरी
07 मार्च
एस. पी. कॉलेजमधे एकत्र शिकलेले आम्ही मित्र आज (ब-याच दिवसांनी) भेटतो. प्रभात रस्त्यावरच्या एका हॉटेलात बसून आम्ही रात्रीचं जेवण घेतो, नंतर सुजाता मस्तानीत मस्तानी हाणतो. (आंबा मस्तानीला तोड नाही!) ब-याच गप्पा होतात, पण मला आठवतं तसं करोनाव्हायरसचा विषय निघत नाही.
13 मार्च
आज आम्ही जेवायला बाहेर जायचं ठरवतो. मॉडर्न कॅफे हे आमचं आवडतं हॉटेल आहे. तिथलं व्हेज कटलेट आणि उपवासाची कचोरी आम्हाला विशेष आवडतात. भरपेट जेवण करायचा कुणाचाच मूड नसतो (आणि तसंही त्या पंजाबी जेवणाला आम्ही जाम कंटाळलोय) तेव्हा मॉडर्न कॅफेवर पटकन एकमत होतं. आज हॉटेलात गर्दी नेहेमीपेक्षा कमी दिसते.
।। मातृदशक ।।
आता वंदितो आईसी | जिने धरिले उरासी |
जेव्हा आलो जन्मासि | वात्सल्याने || १ ||
नवमांस गर्भ वाढविला | सोसूनि सर्व यातना-कळा |
न जाणो तूज किती वेळा | दुखावले मी || २ ||
हाती धरोनि चालविले | बोल बोबडे बोलविले |
शहाणपण शिकविले | जगण्याप्रती || ३ ||
कलागुणांचा वारसा | दिला आम्हां छानसा |
स्वयें दाखविला आरसा | योग्य वेळी || ४ ||
निरपेक्षभावे मनासि | दिले अखंड ज्ञानासि |
अज्ञानी या मुलासि | शहाणे केले || ५ ||
जैसी घार पिलांसि | जैसी वेल फुलांसि |
तैसे जपले मुलांसि | सावधपणे || ६ ||
घडल्या चुका जरी हातून | मार्ग दाखविला त्यातून |
जेणेंकरुन त्या परतून | न होणे कधी || ७
बायका...
काल ते म्हणाले,
सगळ्याच बायका
तशा असतात.
तशा म्हणजे नेमके कशा,
म्हणून शोधु लागलो,
बायका.
पुराणात, प्राचीन ग्रंथात,
ऑफिसात, समोर- मागे,
इथे तिथे.
गुगलवर.
अगदी मिपावरही.
असतात बायका,
हळव्या, खंबीर,धीट
आणि तितक्याच
कर्तबागरही.
बायका असतात,
पुरुषां प्रमाणेच.
सोशिक, शोषित
आणि बंडखोरही
काहींनाच जाणवतात,
खोल-खोल श्वास,
अन् ते शब्द.
काहींना नाही इतकाच,
फरक असतो त्या,
मुक-संवादाचा.
बायकात असते एक बाई,
अन आईही.
बायको- प्रेयसी,
मैत्रीण आणि एक मुलगीही.
आदिम काळापासून
सोबत आणि शिवाय,
सुरु असलेल्या
बायकांचा समर्थ प्रवास
अव्याहतपणे.
बायका म्हणजे
अस्वस्थ तगमग.
लिहिता येत नाही त्यावर
कविता, लेख.
काव्यरस
चक्र
झुंजूमुंजू आभाळात
किती सांडले केशर
सोनसळत्या सकाळी
निळे झळाळे अंबर
तळपत्या माध्यान्हीची
वितळती काचधार
धूसरशा संध्याकाळी
अदृष्टाची हुरहूर
नि:शब्दाच्या चाहुलीने
जागे रात्र काळीशार
प्रहरांच्या रंगी रंगे
बिलोरी हे कालचक्र
चक्रनेमिक्रम त्याचा
अनादि नी निरंतर
काव्यरस
मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस आठवा) ०१.११.२०१९ बंगलोर ते सेलम
मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस आठवा) ०१.११.२०१९
बंगलोर ते सेलम
बंगलोरच्या सिंदूरी हॉटेल मधून सकाळी सहा वाजता सेलमसाठी सायकल राईड सुरू झाली. कनकपुरा विभागातून मधून बाहेर पडून नाईस हायवे जवळ यायला अर्धा तास लागला.
आज सुद्धा नाईस टोल नाक्यावर आम्हाला अडवले. कालचा सीन पुन्हा रिपीट झाला. दिपकने फोनाफोनी सुरू केली आणि दहा मिनिटात रवी साहेबांनी पाठविलेली पोलीस व्हॅन आमच्या मदतीला हजर झाली. या पोलीस व्हॅनचे एस्कॉर्ट घेऊन आम्ही सर्वजण हायवे वरून रुबाबात निघालो. बंगलोरमध्ये असलेल्या दिपकच्या ओळखीमुळेच बंगलोर शहरातून आम्ही सर्व सहजपणे बाहेर पडलो.
तिचा काहीच दोष नसतो..
शाळेचे दिवस. आठवी-नववीत असेल. "ती तुझ्याकडेच बघते रे" असे शपथेवर सांगणारे मित्र भरपूर होते. नालायकांनी अश्या शपथा घेऊन कितीवेळा स्वतःच्याच म्हातारीचा जीव धोक्यात घातलाय त्याला गणतीच नाही. एक मित्र तर काहीही झालं की गजानन महाराजांची शपथ घ्यायचा. पण ती माझ्याकडे बघायची हे खरं होतं.कारण मी खिडकीजवळ बसायचो. मग खिडकीबाहेर बघण्यासाठी तिला माझ्या दिशेने बघण्याशिवाय पर्याय नव्हता! आता मित्रांनी त्याचे भलते अर्थ काढले ह्यात तिचा आणि गजानन महाराजांचा काहीच दोष नव्हता.
आणि ऍक्च्युअली, तिचा कधीच दोष नसतो!
तिचा शाळेला,ट्युशनला वगैरे येण्याजाण्याचा रस्ता ठरलेला होता.
मिसळपाव
फोटो सौजन्य: फेसबूक पेज ऑफ ALDM Photography, Pune
ढासळला वाडा
ढासळला वाडा, पडक्या झाल्या भिंती
उगवल्या बाभळी त्यातून काटेच पडती
सरकले वासे, खिडक्यांनी जागा सोडल्या
दरवाजे करकरूनी, कड्या कोयंड्या तुटल्या
टणक होते जूनेर ल