दोसतार - ४८
अशा सहा उदबत्त्यांची एक मोठी माळ करायची. आणि पलंगाखाली ठेवायची. सहव्या उदबत्तीच्या शेवटच्या टोकाला मोठ्ठा दंड्या फटाका वातीला बांधून ठेवायचा. सहावी उदबत्ती शेवटच्या टोकापर्यंत यायला सकाळचे पाच साडेपाच होणार. दंड्या फटाका उडणार. येवढा मोठा दंड्या फटका अगदी पलंगाखाली ढाम्म करून उडाल्यावर कुंभकर्णाला सुद्धा जाग यायला पाहिजे.
मागील दुवा http://misalpav.com/node/46878
लवकर उठायचे म्हणून कुंभकर्णाला जाग आणायचा गजर स्वतःसाठीच लावल्यावर झोपी गेलो. आपल्याला सकाळी तानुमामाच्याही अगोदर नक्की जाग येणार . तानुमामा सकाळी काहितरी गम्मत करणार म्हणतोय.
मिसळपाव