एक नवीन ऑल-इन-वन सॉफ्टवेअर
आजकाल ऑल-इन-वन वस्तू जास्त वापरात येतात. सगळ्या गोष्टी त्यात एकत्रितपणे मिळण्याची सोय असल्याने ते सुटसुटीत पडते. अशीच एक सुटसुटीत प्रणाली माझ्या पहाण्यात आली.
हॉटमेल , याहू आणि जीमेल अशी तिन्ही खाती असणारे, त्याद्वारे विरोप पाठवणारे, वाचणारे, गप्पा मारणारे काही कमी नाहीत. पण त्याकरता आपण किती प्रणाल्या संगणकावर उतरवून घेतो ? याहू आणि हॉटमेल च्या गप्पांकरता ’याहू मेसेंजर’ आणि जीमेल करता ’जीटॉक’. विरोप महाजालावरच वाचत असलात तर ठीक नाहीतर आऊटलूक किंवा थंडरबर्ड किंवा तत्सम. महाजालावरच वाचत असलात तर किती संकेतस्थळांना भेटी द्याव्या लागतील ? अर्थातच तीन हॉटमेल , याहू आणि जीमेल.
मिसळपाव