पहिले जागतीक(ऑनलाईन) मिसळपाव साहित्य संमेलन
मा. सरपंच महोदय श्री. तात्याबा यांच्या कल्पनेतील पहिले जागतीक मिसळपाव संमेलन होणार होणार म्हणता पुढे ढकलले गेले.मिसळपावचे गावकरी जगभर विखुरले गेले आहेत. पुण्यात होणार्या या संमेलनाकरिता बर्याच गावकर्यांना वेळेअभावी उपस्थीत राहता येणार नाही,हे उघड आहे. अशावेळी मिसळपावच्या प्रतिभावान ग्रामस्थांकरिता एखादे ऑनलाईन साहित्य संमेलन भरावे अशी कल्पना आमच्या डोक्यात आली. या संमेलनादरम्यान साहित्यस्पर्धा आयोजीत करता येईल व या साहित्याचे परीक्षण करण्याकरिता मिपाच्या दिग्गजांची परीक्षक म्हणून मदत होईल. पुरस्कार म्हणून मिपाची प्रमाणपत्रे(हि सुद्धा ऑनलाईन) देता येतील.
मिसळपाव
