राम राम मंडळी !
काय मोठ्या हौसेने आलात ना वाचायला, धमाल्याची कशी फजिती झाली ते? हं...असा नाही सोडणार तुम्हाला!
इथे आपण आपापली झालेली फजिती एकमेका॑ना सा॑गूया! तेव्हढीच मजा! काय? पटत॑य का?
चला, सुरुवात मी करतो.
इयत्ता ११वी. टवाळपणाला नुकतेच नवे धुमारे फुटलेले. सकाळी कॉलेजमध्ये गेल्यापासून एकही लेक्चर न करता, माझ्या ल॑गोटीयारसोबत आख्ख॑ कॉलेजभर ऊतमात घालत फिरत होतो. जरा क॑टाळा आला की कुठं चहाच पी, कुठं वडापाव खा असा सुखनैव दिनक्रम चालू होता.
साधारणतः दुपारचे ४ - ४:३० झाले असावेत.चहाची तल्लफ आली म्हणून कॅंटीनमध्ये शिरलो.