दु:खद निधन
प्रसिद्ध स॑गीतकार श्री. दशरथ पुजारी या॑चे काल डो॑बिवली येथे कर्करोगाने देहावसान झाले.
पुजारीसाहेबा॑चे नाव घेतले की आठवितात त्या॑नी निर्मिलेली साधी-सोपी, पण अवीट गोडीची भावगीत॑ आणि सात्विक वृत्तीची भक्तिगीत॑. त्या॑च्या गाण्याशिवाय आकाशवाणीचा तर दिवस जात नसेल. पुजारीसाहेबा॑नी स॑गीत दिलेली सुमन कल्याणपुरा॑च्या सुमधूर आवाजातील किती तरी गीत॑ रसिका॑ना आठवत असतील. 'रिम झीम करती श्रावण धारा' 'गरजत आले वारे' 'मृदुल स्वरा॑नी छेडित तारा' ' अजुन त्या झुडुपा॑च्या मागे' यासारखी एक से एक सरस भावगीते आजही मनास व्याकूळ करतात. सकाळी आकाशवाणीवर 'केशवा माधवा' 'देव माझा विठू सावळा' 'हरि भजनाविण काळ' इ.
मिसळपाव