Skip to main content

वळु

लेखक राजस यांनी शुक्रवार, 27/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
वळु बर्‍याच दिवसांनी मराठी चित्रपट बघण्याचा योग आला. खरे तर मराठी चित्रपट बघायला मला आवडते. मध्यंतरीच्या काळात सचिन व महेश कोठारे चे चित्रपट छान असायचे. परंतु त्यानंतर मराठी चित्रपट एकाच साच्यात अडकला तेंव्हापासुन तो नकोसा व्हायला लागला होता. श्वास पासुन ही परिस्थीती बदलायला लागली आहे. तर बरेच दिवसांनी चित्रपट बघितला, वळु. कथानक सर्वांना माहीत झालेच असेल. एका गावात वळुने उच्छाद मांडलेला असतो त्यामुळे फॉरेस्ट ऑफीसरला बोलावणे पाठवले जाते. त्याबरोबर त्याचा भाऊ डॉक्युमेंटरी करण्यासाठी येतो. गावकर्यांना एकत्र जमवुन डॉक्युमेंटरी करताना कथानक उलगडत जाते.

"एखादा वेटर सुद्धा छोटासा संदेश देवून जातो"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 27/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
" एखादी क्षुल्लक गोष्ट सुद्धा अशा घटनेला अर्थ आणून देते.एक मैत्रिचा हात, मनाला शांती आणून देतो.एका माणसापासून सुरवात होते आणि प्रसाद वाटावा तसं त्याचं होतं." तसा मी वरचेवर गोव्याला जात येत असतो.एखादा आठवडा राहायचं असल्यास मी माझ्या नेहमीच्या रेस्टॉरंट मधे राहतो.त्यामुळे माझा आजुबाजूच्या लोकांशी परिचय झालेला आहे.त्यांच्याकडे वेळ असेल तेव्हा ख्यालीखुषालीच्या गप्पाही होतात.असंच एकदा त्या होटेल मधल्या एका वेटरशी हलो-हाय झाल्यावर मी त्याला सहजच म्हणालो, "तुला मी इकडे नवीनच पहात आहे." ते ऐकून तो म्हणाला, "होय, मला इकडे येवून दोन तीन महिने झाले.मी पुर्वी मुंबईच्या एका होटेलमधे काम करीत होतो.

रत्नपारखी शिवराय : भाग एक - बाजी पासलकर.....एक झलक.....

लेखक उदय सप्रे यांनी शुक्रवार, 27/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
बाजी लढताना एक घाव त्यांच्या पाठून त्यांच्या फिरंग समशेरधारी उजव्या हातावर झाला.वेदनेने कळवळलेले बाजी त्या भ्याडाचा प्रतिकार करण्यासाठी त्याही परिश्तितीत वळले आणि तोच क्षण साधत गनिमाची तलवार त्यांच्या छातीवर उतरली.पासष्ठ वर्षांचा तरणाबांड योध्दा-बाजी पडले ! आपल्या मागे वळण्याची इतिकर्तव्यता झाली हे लक्षात येताच फत्तेखान आपल्या सैन्यासह परत वळून पळून गेला.कावजी मल्हारला हे समजताच तो तीरासारखा सासवडला धावला.आपल्या धन्याचं जखमी शरीर पाठीवर लादून वाहून नेणारी बाजींची यशवंती घोडी आणि कावजी मल्हार यांच्या दु:खाची जात एकच होती !

हैदराबाद येथे झालेले मराठी बालनाट्य : 'राजकन्येची बाहुली'

लेखक विसुनाना यांनी शुक्रवार, 27/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
हैदराबाद येथील रंगधारा नाट्यसंस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या मराठी बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचा सांगता समारंभ पोट्टी श्रीरामलु तेलुगु युनिव्हर्सिटीच्या एन्.टी. रामाराव कलामंदिरात दि. २२ जून २००८ रोजी संपन्न झाला. यावेळी 'राजकन्येची बाहुली' हे बालनाट्य आणि 'ओले,ओले, टीव्ही बोले' हे लघुनाट्य सादर करण्यात आले. दोन्ही बालनाट्ये अत्यंत उत्कृष्टरित्या सादर झाली.

तुझी याद..

लेखक पद्मश्री चित्रे यांनी शुक्रवार, 27/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी याद आली पहाटे पहाटे जणु चांदण्याला खुली रात भेटे तुझा स्पर्श होता तनु मोहरावी मिठीने तुझ्या रातराणी फुलावी तुझ्या सोबती रात्र व्हावी सुगंधी फुलांनी ही हेवा करावा मनी तुझे हट्ट सारे तुझ्या मागण्या या तुला सावरीता मी हरवुन जावे तुझे स्वप्न डोळ्यात जागेपणी ही मला जाणवे की तुझे स्वप्न मी दुरावा जरी हा तरी ओढ वाटे- तुझी याद आली पहाटे पहाटे
Taxonomy upgrade extras

नभी चांदणे...(गझल)

लेखक पद्मश्री चित्रे यांनी शुक्रवार, 27/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
वृत- भुजंगप्रयात मात्रा- लगागा लगागा लगागा लगागा नभी चांदण्याची जुनी साथ होती उशाला कधीची उभी रात होती जळे जीव कोणी उदासीत येथे पुकारीत कोणा निशा गात होती कुणाला कसा सांग आता विसावा उसासून दु:खे हळू गात होती मला भासले अंत ना या क्षणाला पहाटेस ही रोजची रीत होती कुठे अंत आता अशी रात ओली पिवोनी उजेडास जागीत होती क्षणामागुती धावती जीव सारे इथे शेवटाची सुरुवात होती
Taxonomy upgrade extras

मुरबाडी आमटी

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी शुक्रवार, 27/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : १/२ वाटी मूगाची डाळ , १ वाटी तुरीची डाळ , लसूण (६ ते ७ पाकळ्या), ताजं खोबरं (एक वाटी),बडीशोप (एक चिमूट), मीठ , लाल तिखट , हळद , हिरवी मिरची ,कढीपत्ता ३ कांदे , १ बटाटा , २ टमाटो , तेल ,जिरं ,मोहरी. कृति : १कांदा ,बटाटा व टमाटो च्या फोडी करून घेणे. दोन्ही डाळी नीट धुवून गरम पाण्यात शिजण्यास ठेवणे.डाळ शिजत आली की त्यात थोडा कढीपत्ता (कच्चा) घालणे. २ कांदे लांब चिरून घेणे ; लसूण फक्त ठेचून घेणे ; पाऊण वाटी खोबरं व बडीशोप मिक्सरमधे वाटून घेणे ; तेलावर जिरं ,मोहरी ची फोडणी करून त्यात हिरवी मिरची (तुकडा),कढीपत्ता घालून त्यात चिरलेला कांदा घालणे. कांदा चांगला लाल ह

मिपा दंगल भाम्बुर्डा(पुणे) वृत्तान्त

लेखक धमाल बाळ यांनी शुक्रवार, 27/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या वार्ताहाराकडुन दिनांक २२ जुन स्थळ : भांबुर्डा २२जुन हा उभ्या महाराष्ट्राला एक अविस्मरणीय दिवस. बर्रोब्बर एकशे दहा वर्षापूर्वी याच भांबुर्ड्याच्या गणेश खिंडीत एक ऐतिहासीक प्रसंग घडला होता. या प्रसंगाची पुन्हा बरोबरी होणे नाही. याच दिवसाचा पूर्व दिन भाम्बुर्डा दंगलीसाठी म्हणुन मुक्रर झाला करण्यात आला होता.दंगलीचा काळ ठरला होता पण स्थळ काही ठरत नव्हते.विजुभौ नी लैच टीमकी बडवली म्हणुन शांग्रीला अशा नेपाळी नावाच्या म-हाठी हाटीलात ( पहा एकविसाव्या शतकात देशांच्या सीमा कशा लहान होत चालल्यात ते)दंगल ठरवली.

फिल्ड मार्शल माणेकशॉ कालवश

लेखक मानस यांनी शुक्रवार, 27/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
फिल्ड मार्शल माणेकशॉ यांचे १९७१ च्या युद्धातले योगदान कायम स्मरणात राहील. माझ्या आयुष्यात एकदा त्यांना पहाण्याचा/भेटण्याचा योग आला होता. एका खाजगी समरंभाला ते आले होते, बरीच वर्ष झाली, आता नक्की आठवत नाही पण सुमारे पंचवीस एक वर्षांपुर्वी असेल. अत्यंत भारदस्त व सुरेख असं व्यक्तीमत्व, अजुनही आठवतय. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना. त्यांच्या निधनाची सविस्तर बातमी येथे वाचा.