Skip to main content

तत्व माझे सोडणार नाही

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 27/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मोडेन पण वाकणार नाही तत्व माझे सोडणार नाही दारु न पिता झिंगणार नाही झोप न येता पेंगणार नाही कसल्या आल्या भावना शिस्ती शिवाय रहावेना मोडेन पण वाकणार नाही तत्व माझे सोडणार नाही दुःखाची नाही कसली खंत परिणामाची नाही मुळीच भ्रांत पुरूषगीरी सोडणार नाही स्त्रीचा अवमान टाळणार नाही मोडेन पण वाकणार नाही तत्व माझे सोडणार नाही करून करून भागले देवपूजेला लागले नैवेद्दया शिवाय पूजा नाही प्रसाद मागल्यावर देणार नाही मोडेन पण वाकणार नाही तत्व माझे सोडणार नाही वय झाले तरी आढ्य रहाणार आपले तेच खरे म्हणणार लाकडे स्मशानात गेली तरी वाद घातल्या शिवाय रहाणार नाही. मोडेन पण वाकणार नाही तत्व माझे सोडणार नाही श

संकेतस्थळांचे उपयोग - मिपा सदस्यांना विनंती

लेखक विकास यांनी शुक्रवार, 27/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, सर्वप्रथमः "मिपाचे मालक/विश्वस्त तात्या यांच्याशी चर्चा करूनच मी हा प्रस्ताव मांडत आहे व सदर चर्चाप्रस्तावास मिसळपाव डॉट कॉम या संस्थळाचा पूर्ण पाठिंबा आहे. सबब, सदर प्रस्ताव ही मिपाचीच अधिकृत घोषणा आहे असे समजावे!" आपण सर्वचजणं मिपावर येण्याचा आणि गप्पाटप्पा मारण्याचा आनंद मनापासून घेत आहोत. प्रत्येकाचे प्रत्येकाशी पटत नसेल, वादविवाद घडत असले अगदी तात्यांच्या हाताच्या टपल्यापण खाल्या तरी बहुतांशी सर्वजण पुन्हपुन्हा येत राहतात.

फुक्कटचे पाटील

लेखक टारझन यांनी शुक्रवार, 27/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मित्रांनो, "पाटील" .... खेड्या-पाड्यातली एक मानापानाची पदवी. आपल्या महाराष्ट्रातील खेड्यांत 'पाटलां'ना फार आदराने संबोधलं जातं. लग्न असो वा मयत, शालेय समारंभ किंवा गावची जत्रा..." पाटील" लोक नेहमी पूढाकार घेत अलेत आणि जनताही हेच अपेक्षित करते. थोडक्यात काय तर "पाटलां"शिवाय पान हालत नाही. पण हे झाले मानाचे 'पाटील' ..... पाटलांची अजुन एक जमात आहे . हे आपल्या कर्माने 'पाटील' होतात.

मिपा संपादकीय...! जाहीर आवाहन..

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 27/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मायबाप मिपाकरांना माझा दंडवत...! राम राम मंडळी, मिपा हे एक साप्तहिक आहे किंवा पाक्षिक आहे असे मानून 'मिपा संपादकीय...' हे एक सदर दर आठवड्याला किंवा पंधरवड्याला सुरू करावे असे मनात आहे. आपल्याकडे सामाजिक, राजकीय भान असणारे, वाचन असणारे, उत्तम विचार असणारे बरेच जण आहेत. या मंडळींचे वृतपत्रीय/आंतरजालीय वाचनही चौरस असते असे माझ्या निदर्शनास आले आहे. या मंडळींनी 'मिपा संपादकीय' या सदरात दर सप्ताहात/पाक्षिकात एक अग्रलेख लिहावा असे वाटते. हा अग्रलेख बहुतकरून भारतातील किंवा भारताबहेरील राजकीय, सामाजिक विषयांवर, ताज्या घडामोडींवरच असेल. त्यातली मते अर्थातच संपूर्णपणे त्या संपादकाचीच असतील.

हास्यतुकडे-२

लेखक आगाऊ कार्टा यांनी गुरुवार, 26/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
बोलणारा (उघड): साहेब आपल्या रेश्मा मॅडम आज येणार नाहीत असा त्यांचा फोन आला होता. ऐकणारा (मनात): (कशी येणार? काल संध्याकळीच तर तिला जोश्याबरोबर बागेत रेडहॅंड पकडले होते.) बोलणारा (उघड): साहेब त्या सुंदर बाई आपल्या ऑफिसमध्ये का आल्या होत्या? ऐकणारा (मनात): (तुला कशाला पाहिजेत नसत्या चांभारचौकशा?) बोलणारा (उघड): साहेब देवाच्या कृपेने एकदाचा माझा मुलगा पास झाला. ऐकणारा (मनात): (मग काय गावभर पेढे वाटू?) बोलणारा (उघड): साहेब आज मी नवीन मोटरसायकल विकत घेतली. ऐकणारा (मनात): (बाकीचे काय फुकट घेतात की काय शिंच्या?) बोलणारा (उघड): साहेब ५ वर्षे झाली.

हास्यतुकडे - १

लेखक आगाऊ कार्टा यांनी गुरुवार, 26/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
स्वगत म्हणजे मनातल्या मनात विवाहाची निमंत्रण पत्रिका आल्यावर आपण हळुच "अहेर आणू नये" हे वाक्य बघतो बघतो व सर्वांनी फुकट जेवण हादडायला जायचं असं मनात ठरवतो, तश्यागत. ऐकणारा समोरच्याचे खोटेच कौतुक करत असतो. पण मनातल्या मनात काय म्हणतो ते पुढे पाहाच. बोलणारा (उघड): (आनंदाने) साहेब पेढे घ्या. ८ वर्षांनी पोर झालं.

तारीफ करू का त्याची

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 26/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवादीत.कवी-एस.एच.बिहारी) हा चंद्रमुखी चेहरा केसाचा रंग सुनेहरा हे नीळसर नीळसर डोळे हे लक्षण असे वेगळे तारिफ करू का त्याची कलाकृती ही ज्याची कथा पुराणी तुझी जाते ऐकवीली सदाची तुला पाहूनी मानिले योग्य असे जे ऐकले ते मुरडत मुरडत चालणे ते जादू टोणा करणे शतदा मी संभाळणे मन काबूत नसणे तारिफ करू का त्याची कलाकृती ही ज्याची लाली सकाळच्या किरणाची रंगीत शोभा गालावरची संध्याकालीन अंधाराची जणू छाया केसाची तू तूडूंब नदी पाण्याची दुधाळलेल्या फेसाची मजा असे डुबण्याची तारिफ करू का त्याची कलाकृती ही ज्याची मी शोधीत असे मंदीर मंदीर माझ्या समोर दूर कर हा पडदा निघू दे हा अंधार हे लाडीक लाडीक वागणे करिते

आतला आवाज

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 26/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
"मला वाटतं,आपल्या आतल्या आवाजाची जी शक्ति आहे ती आपल्याला आपल्या कठीण प्रसंगात मदतीला येते.मला वाटतं,लोक सुखासुखी कुठचीच गोष्ट जावू देत नाहीत.काही किंमत पडली तरी ते दुसऱ्याला पण मदत करतात.

चकोल्या (वरणफळं )

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी गुरुवार, 26/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : तयार साधं वरण ; चिंच,गुळ,गोडामसाला,मीठ,लाल तिखट, कणिक , ओवा , कोथिंबीर , तेल , साजुक तूप , लसुण कृति : कणिक भिजवताना त्यात थोडं मीठ,लाल तिखट ,ओवा , कोथिंबीर घालणे. थोडं जाडसर लाटून त्याचे शंकरपाळे करणे. तयार वरण उकळायला ठेवून त्यात चिंच ,गुळ,गोडामसाला,मीठ,लाल तिखट घालणे. वरणाला साजुक तूपाची लसणाची फोडणी देणे आणि ते शंकरपाळे कच्चेच त्या उकळत्या वरणात सोडणे. शंकरपाळे वरणात नीट शिजल्यानंतर उतरवून भाताबरोबर किंवा नुसतं खायला सुद्धा खूप छान लागतं यात चिंच आणि गुळ जरा जास्तंच घालावे.

एक खटकलेली बातमी ...

लेखक भडकमकर मास्तर यांनी गुरुवार, 26/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्याच महिन्यात वर्तमानपत्रात एक बातमी वाचली... मथळा होता " लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार" ......... असल्या बातम्या सतत वाचनात येतात... ही सुद्धा वाचली , त्यात नेहमीप्रमाणेच ..." एक गावाकडची मुलगी होती, कॉलेजात जाणारी , सज्ञान ..तिथे हा एक ओळखीचा मुलगा / बाप्या आला...तिला तो आवडला, प्रेम निर्माण झालं ... घरच्यांची परवानगी मिळणार नाही म्हणून मग त्याने तिला शहरात (पळवून !!! )आणलं... ते दोघे सहा महिने वेगवेगळ्या लॉजवर राहिले, वेगवेगळ्या शहरात राहिले, फिरले...