अंतर
ओळींमधलं....मधलंही वाचता आलं पाहिजे
बोलणं अन अबोलणंही...ऐकता आलं पाहिजे
मौनं सर्वार्थसाधनं की स्वार्थसाधनं..जोखता आलं पाहिजे
खरं तर "अंतर"च वाचता आलं पाहिजे
वळू पाहणार्या पावलाला थांबता आलं पाहिजे
पण थांबू पाहणार्या पावलालाही चालता आलं पाहिजे
मोहाच्या नशेत झुलतानाही जागता आलं पाहिजे
खरं तर "अंतर"च वाचता आलं पाहिजे
आसुसल्या मनालाही वाट पहाता आलं पाहिजे
अजाणत्या वेडेपणातही भान राखता आलं पाहिजे
व्यक्तापेक्षा अव्यक्तच समजून घेता आलं पाहिजे
खरं तर "अंतर"च वाचता आलं पाहिजे
वाचने
4138
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
मस्त कविता
अगदी खरं आहे तुझं...
छान
वाह!
वा!