Skip to main content

परतुनी येईन मी....

लेखक अजिंक्य यांनी रविवार, 29/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
परतुनी येईन मी.... जीवनाचे युद्ध चालू, कालपुरुषा जिंकण्या लागली माघार घ्यावी शस्त्र माझे टाकुनी दैव जरिही रुष्टले, आशा दिली ना सोडुनी परतुनी येईन मी उरली लढाई खेळण्या ॥१॥ कर्म माझ्या वाटचे, झाले न माझ्या हातुनी रंगुनी स्वप्नात पुढच्या, आज गमवुन बैसलो मार्ग माझा उजळण्याची वाट पाहत राहिलो भाग्य की, झालो शहाणा ठेच एकच लागुनी ॥२॥ अपयशाचा डंख जाणिव देत राही आतुनी आतल्या ज्वालामुखीची आग पेटवणार मी शस्त्र जरि गेले तरीही सोडले ना धैर्य मी जिंकण्या येईन मी ब्रम्हास्त्र सोबत घेऊनी ॥३॥ दौडुनी येईन सारी शक्ति एकवटून मी नेत्र उघडुन सज्ज होतिल दशदिशा मज पाहण्या परतुनी येईन मी उरली लढाई खेळण्या आणि मग ज
Taxonomy upgrade extras

लळा जिव्हाळा शब्दच मोठे

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 29/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
दहा वर्षाचा असताना त्याच्या बापाने आमच्या आई जवळ ह्याला आणून सोडले. "मला एव्हड्या मुलांचा व्याप आता जमत नाही.ह्याला तू तुझ्याकडे ठेव तुझ्याकडे उरेल सुरेल ते ह्याला घालून तुझ्याकडे कामासाठी ठेव आणि मला ह्या काळजीतून सोडव" असं सांगून गेल्यावर गेले सत्तर वर्ष रामा आमच्याकडे राहिला.
Taxonomy upgrade extras

खणले रे पथ

लेखक हेरंब यांनी रविवार, 29/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे प्रेरणास्थान : फुलले रे क्षण माझे ...... खणले रे पथ माझे खणले रे ड्रेनेजच्या , हो s s टेलिफोनच्या आणि गॅ s sसच्या लोकांनी तुटले रे पथ माझे तुटले रे धुळीच्या लोटात गर्दीच्या पोटात भयभीत जीव फिरे डांबरीकरण, कांक्रीटीकरण लोकांचे मरण रे या वेडाच्या, आधीन शासन झाले मिंधे रे पैशांच्या थैलीने खणले रे ............. रीत ही दरवर्षीची थांबेना रहदारीची दुर्दशा साहवेना कुणा सांगु मी काय सांगु मी निबर मनास काही उमगेना पोटाच्या खळगीने खणले रे पथ माझे खणले रे
Taxonomy upgrade extras

रासलीला

लेखक पुष्कराज यांनी रविवार, 29/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
लाख चांदण्या लखलख करीती आणि तारका दळे उतरती आज पोर्णिमा उतरुन आलि कालिंदीच्या तटी खेळतो रास सखा श्रीहरी भरल्या मेघा परि सावळा मोरमुकुट शिरी मदनची दुसरा श्रृंगाराला स्वरात भिजवी अधरी धरुनी बासरी खेळतो रास सखा श्रीहरी गोप गोपिका जमले सारे टिपरी वरती टिपरी गाजे त्या नादाला भूलूनी आले शिवही यमुनातिरी खेळतो रास सखा श्रीहरी वाळ्वंटी त्या यमुनाकाठी रास रंगता हरी संगती तनमन अवघे विसरुन जावे प्रेम भरूनिया उरी खेळतो रास सखा श्रीहरी विषय नव्हे हा ही तर भक्ती विसरूनी रमणे देहासक्ती देवांनाही वेड लावते अशी रासमाधुरी खेळतो रास सखा श्रीहरी
Taxonomy upgrade extras

अळकुळी तनु

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 29/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
weekend दिवशी चिमुकली तनुली आईला म्हणाली weekdays दिवशी असता मी सकाळी उठलेली पाहुन तुला घरात नसलेली होई मी किंचीत अळकुळी मग घेई मज आज्जी जवळी पाहुनी माझ्या डोळी म्हणे मला ती नको होवू तू अळकुळी तुजसम तुझी आई असता अशीच घेही मी पण जवळी तिला त्यावेळी पण जवळी असे मी तिच्या वेळी अवेळी पक्षिण उडे आकाशी परी लक्ष असे पिल्लाशी आहे ना मी तुझ्या जवळी मग का होतेस तू अळकुळी येइल तुझी आई संध्याकाळी श्रीकृष्ण सामंत

नको म्हणू रे मनुजा!

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 28/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
हाच ब्लॉग बरा का तोच ब्लॉग बरा ही कविता बरी की ती कविता बरी हा ज्याचा त्याचा चॉईस असतो. निर्मिती ही निसर्गाची मानवाला दिलेली देणगी आहे.निसर्गात सुद्धा व्हरायटी असते.पण कॉपी कधीच आढळणार नाही.दोन जुळ्या भावंडात सुद्धा किंचीत असा फरक असतो.हे निसर्गाकडून शिकण्यासारखं आहे. अनुवाद झाल जरी तरी तो कॉपी कॅट नसावा.
Taxonomy upgrade extras

पाऊले चालती पंढरीची वाट

लेखक आनंद घारे यांनी शनिवार, 28/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
या वर्षीच्या आषाढीच्या वारीची सुरुवात करण्यासाठी भक्तगण देहू व आळंदीला जमा झाले असल्याची बातमी आली आहे. आता त्यांच्या दिंड्यांच्या मार्गक्रमणाचा वृत्तांत 'आँखो देखा हाल'च्या थाटात पुढील पंधरवडाभर सर्व प्रसिध्दीमाध्यमांत येत राहील. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातूनच नव्हे तर शेजारच्या कर्माटकांतूनसुध्दा लक्षावधी भाविक पायी चालत पंढरपूरपर्यंत जातील. त्यातल्या अनेकांची ही पदयात्रा सुरू झालेलीही असेल. कांही लोक आपापल्या कुवतीनुसार त्यात थोडा काळ सहभाग घेऊन मिळेल तेवढा आनंदानुभव घेतील व पुण्य गांठीला बांधतील. हे सगळे संपूर्णपणे स्वेच्छापूर्वक चालत आले आहे.

संता आणी बंता

लेखक अमोल केळकर यांनी शनिवार, 28/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
सरदारजींवरचे आपण नेहमी विनोद ऐकतो इतरांना सांगतो. त्यात ही संता आणी बंता ही आपली आवडती पात्रे. त्यांचा एक विनोद गाण्यातुन सांगण्याचा एक प्रयत्न. कसा वाटला हा प्रयोग ते अवश्य सांगा. आमची प्रेरणा - सध्या माझ्या १ वर्षाच्या मुलीचे अतीशय आवडते बालगीत ससा हो ससा जसा कापुस जसा त्याने कासवाशी पैज लाविली ! वेगे वेगे जाऊ नी डोंगरावर जाऊ ही शर्यत रे अपुली !!

ही तुमचीच मुलगी का?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 28/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
कुणी तरी म्हटलंय. " एखाद्दयाला समजून घेण्यातच वेळ घातला तर त्याच्यावर प्रेम करायची वेळच निघून जाणार.