Skip to main content

एक प्रायोगिक कविता

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 16/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
परवा आम्ही जे अकलेचे दिवे लावले त्याबद्दल रामदासशेठची व्यनि करून माफी मागितली. हल्ली विडंबनांना मिळणारा प्रतिसाद त्यातच भर म्हणून वाढते विडंबनकार, ह्या सगळ्याचा विचार करता आता विडंबनाचे दुकान बंद करून दुसरे काहीतरी सुरू करावे ह्या विचारात असतानाच रामदासशेठचे उत्तर आले
माफी? कशाबद्दल? मला विडंबन फार आवडले/आवडते. आता आणखी एक गंमत करू या. मी शेवटचे कडवे देतोय.
Taxonomy upgrade extras

असावी मुलगी एक तरी

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 16/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
व्हावी एक तरी मुलगी असे आल्याने प्रत्यंतर मुली शिवाय कसले जीवन अन नसे कसले गत्यंतर करावी तिच्यावर एव्ह्डी प्रीती की जग फिरावे तिच्या भोंवती जन्माने असेल जरी ती बाई करू नका गैरसमज काही क्षणात ती हंसे अन क्षणात ती रुसे विचारपूस करण्याची करू नका घाई नाही सांगणार ती मनातले काही असे ती गोड अन प्रेमळ अन असे ती हुषार सोज्वळ मन,बुद्धी अन मृदू हृदयाची असे ती मुर्तीमंत त्रिवेणी संगमाची उमले ती कळी बनून अन फुलते ती फूल बनून बालपणाच्या बहरातून सुगंध दरवळे चोहिकडून विकसूनी होई जणू सुंदरी उमलते ती अपुली कळी होऊनी माता भविष्यातली उघडी रहस्य निसर्गाचे उरी धरूनी त्या देवदुतासी सांगे अपुल्या लोचनातूनी

(तू)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 15/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
अजब यांचे 'तू' हे मुक्तक वाचून मनात अनेक विचार मुक्तपणे आले ते असे ;) तू भयकथेगत नकोस येऊ मी त्या पालीगत थरथरतो... तू 'इतिहास' होऊन नकोस वाहू 'बे-भान'पणे मी भरकटतो... तू 'वैशाख फळ' होउन जवळ राहा मी ओरपून खाईन असा... तू 'गजल' एखादी होउन ये मी विडंबनात नाहीन असा... चतुरंग

मोघेकाकू..!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 15/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
"अहो कितीची गाडी आहे रात्री? नऊची ना? मग इथेच या की सगळे! उगाच घरी कशाला स्वयंपाक करत बसता? सामानसुमान बांधून तयार ठेवा, इथेच जेवा आणि निघा." "छे! अहो त्यात कसला आलाय त्रास? आणि ५-६ मंडळींच्या आमटीभाताला असा कितीसा वेळ लागणार आहे? केव्हाच होईल! या या, नक्की या हां!" मोघेकाकू चा़ळीतल्या कुणाला तरी आग्रह करत असतात. त्यांचा आग्रह इतका मनापासून असतो की सहसा तो कुणाला मोडवत नाही. ठरल्याप्रमाणे ती कोण ती ५-६ मंडळी रात्री मोघेकाकूंकडेच जेवायला येतात. साधा आमटीभात, मटकीची उसळ, गरमागरम पोळ्या.

स्वतःचे देवपण विसरलास?

लेखक namdev narkar यांनी मंगळवार, 15/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आता तु धनिका॑चा देव तुझी पण आता स॑स्थाने केवढी बडदास्त आता तुझी सतत राजकर्त्या॑चे येणे जाणे आषाडी - कार्तिकी तुझी पुजा म॑त्री करतात सहकुटु॑ब तासन्तास चलतो अभिषेक रा॑गेतल्या भक्ता॑चा खोळ॑ब ऊभे ताटकळ्त दर्शनास भक्त अनवानी पायपीट करत आलेले हेलीकोप्टर मधुन आले मन्त्रि त्या॑चे मात्र भाग्य फळले कुणा मिळती व्हीआपी पास कुणाचा वशिला आत वाटले नव्हते भ्रश्टाचर असा चालतो पण तुझ्या दारात पुर्वी म्हणे तु प्रल्हादास पावलास पु॑डलिकाच्या हाकेला धावलास आता कुणाच्या नादि लागलास स्वतःचे देवपण विसरलास?

(खेळी)

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 15/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातीताईं फडणीसांचीखेळी वाचून आमच्या मनात गेले कित्येक दिवस आमच्या विडंबनांना घटत चाललेल्या प्रतिसादांचे खरे कारण समजले.. (खेळी) लिहित होतो मी........ वाचक चकवत होते. वाहवा प्रतिसाद!! कधीच मला न येणारे. मग ठरवल, बास!. आता नाही लिहायचे, पुरे झाला कविता-विडंबनाचा खेळ, आणि थांबलो. एका जागी निश्चल. जिंकल्या सारखा. : : : खुप उशिरा कळलं, ती ही त्यांचीच खेळी. पुन्हा बरोबर पडलेली. ======================== केशवसुमार...................... १५-०८-२००८

खेळी.

लेखक स्वाती फडणीस यांनी मंगळवार, 15/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
खेळी. पळत होते मी........ नियती चकवत होती. तेजाळ कवडसे!! कधीच हाती न येणारे. मग ठरवल, बास!. आता नाही पळायचे, पुरे झाला उन-सावल्यांचा खेळ, आणि थांबले. एका जागी निश्चल. जिंकल्या सारखी. : : : खुप उशिरा कळलं, ती ही तिचीच खेळी. पुन्हा बरोबर पडलेली. ======================== स्वाती फडणीस......................१९-०१-२००८
Taxonomy upgrade extras

महासमर्थ : "नानासाहेब धर्मधिकारी."

लेखक रमा पेशवे यांनी मंगळवार, 15/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
"दासबोधाच्या" निरुपणाद्वारे समाजजागॄति करणार्‍या आणि तळागाळातील अशिक्षित लोकान्पर्यन्त सु-सन्स्कारान्चे बीज रोवणार्‍या , समर्थ व्यासपीठावरील महासमर्थ "नानासाहेब धर्माधिकारी" यान्ना आदरपूर्वक भावन्जली..... जय जय रघुवीर समर्थ!!!