Skip to main content

असावी मुलगी एक तरी

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 16/07/2008 02:53 या दिवशी प्रकाशित केले.
व्हावी एक तरी मुलगी असे आल्याने प्रत्यंतर मुली शिवाय कसले जीवन अन नसे कसले गत्यंतर करावी तिच्यावर एव्ह्डी प्रीती की जग फिरावे तिच्या भोंवती जन्माने असेल जरी ती बाई करू नका गैरसमज काही क्षणात ती हंसे अन क्षणात ती रुसे विचारपूस करण्याची करू नका घाई नाही सांगणार ती मनातले काही असे ती गोड अन प्रेमळ अन असे ती हुषार सोज्वळ मन,बुद्धी अन मृदू हृदयाची असे ती मुर्तीमंत त्रिवेणी संगमाची उमले ती कळी बनून अन फुलते ती फूल बनून बालपणाच्या बहरातून सुगंध दरवळे चोहिकडून विकसूनी होई जणू सुंदरी उमलते ती अपुली कळी होऊनी माता भविष्यातली उघडी रहस्य निसर्गाचे उरी धरूनी त्या देवदुतासी सांगे अपुल्या लोचनातूनी तिच करीते जीवनऊत्पत्ती म्हणून वाटे असावी एक तरी मुलगी करावी तिच्यावर एव्ह्डी प्रीती की जग फिरावे तिच्या भोंवती श्रीकृष्ण सामंत
लेखनविषय:

वाचने 19131
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

उमले ती कळी बनून अन फुलते ती फूल बनून बालपणाच्या बहरातून सुगंध दरवळे चोहिकडून हे तर मस्तच जमले आहे.

असावी मुलगी एक तरी
अगदी खरं! मुलगी असणं ही अतिशय आनंदाची गोष्ट!! असे ती गोड अन प्रेमळ अन असे ती हुषार सोज्वळ मन,बुद्धी अन मृदू हृदयाची असे ती मुर्तीमंत त्रिवेणी संगमाची अगदी! कविता आवडली. (आनंदी) प्रियाली

माझ्याही अशाच भावना आहेत. मुली म्हणजे elegance. मुली म्हणजे मानवी मने सांधणारे पूल. स्त्री जेवढे effective networking मानवी दृष्टी न विसरता करू शकते तेवढे पुरूषाला कधीच जमणार नाही. असे असतांनाही पुरूषांनी जे इतिहास लिहीलेत त्यात पुष्कळदा स्त्रीलाच लढायांसाठी, भांडणासाठी अकारण दोष दिलेले आढळतात. आनंदीबाईंना पुरूषी कारस्थानानेच ध चा मा केल्याचा डाग लावण्यात आला.

अतिशय सुरेख कविता....!

काका, कविता छानच आहे. उमले ती कळी बनून अन फुलते ती फूल बनून बालपणाच्या बहरातून सुगंध दरवळे चोहिकडून (डब्बल आनंदी) बिपिन.

काका, माझ्याबाबतीत माझ्या बाबांचं काय मत होतं काय माहित! पण कविता छानच आहे. म्हणून वाटे असावी एक तरी मुलगी करावी तिच्यावर एव्ह्डी प्रीती की जग फिरावे तिच्या भोंवती आपल्यावर एवढं प्रेम करणारे (आई आणि) बाबा आहेत ही भावना किती सुखावणारी आहे. इंग्लिशमधे म्हणतात ना त्याची आठवण झाली: "A son is a son till he gets him a wife, but a daughter’s a daughter the rest of your life." संहिता

सामंत काका, सुंदर आहे कविता... असे ती गोड अन प्रेमळ अन असे ती हुषार सोज्वळ मन,बुद्धी अन मृदू हृदयाची असे ती मुर्तीमंत त्रिवेणी संगमाची मस्तच. मुलगी असणं म्हणजे खरंच भाग्याचं आहे. एक मुलगीच, - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

काव्य सुरेख आहे! (मुलगी/स्त्री ही बर्‍याचवेळा अत्यंत लवचिक मनोवृत्तीची, सर्वांना बरोबर घेऊन जाण्यात वाकबगार अशी असते. कठिण परिस्थितीत पुरुष व्यसनाधीन होतात, आत्महत्या करतात (स्त्रियाही हे करतात पण फार क्वचित), परिस्थितीला तोंड देऊन, टक्कर देऊन उभे रहाण्याचे बळ हे स्त्रीच जास्तवेळा दाखवून देते. अशा वेळी 'अबला' हा शब्द किती चुकीचा आहे हे कळते.) चतुरंग