हृदयांत सागराच्या..
हृदयांत सागराच्या
फेसाळतात लाटा
खडकांत फेनफुलेही
शोधित जात वाटा
खेळांत गलबताच्या
लाटांचाही झिम्मा
अस्तास भास्कराच्या
क्षितिजावरी रक्तिमा
ओठांत शिंपलीच्या
मोत्याचेच गाणे
किनार्यावरी सांडले
सोनियाचे दाणे
जातात पाऊले गं
तिरपी कोण कशी??
खेकड्याची चाल
रेतीवरी नक्षी
घेताच खोल श्वास
वारा ओशाळला
धुंदीत यौवनाच्या
क्षारात गंधाळला
रात्रीस साथ देई
खर्जातली गाज
चंदेरी पाण्यावरी
चढला रूपेरी साज..
का संथ चालला गं
हा चंद्र अस्ताकडे
प्रेमात तो ही घाली
लहरींना साकडे
उदयांस भास्कराच्या
सागर मंत्रावला
ओल्या वाळूवरी
शिंपला दवांत भिजला
- प्राजु
मिसळपाव
उदयपूरच्या 'सहेलीयोंकी बाडी' या उद्यानातुन बाहेर पडत असता अचानक भिंतीच्या वरुन तुरुतुरु पळणारी ही छोटी खारूताई दिसली. सुदैवाने तिकडे कुणाचे लक्ष न गेल्याने तिकडे गजबज नव्हती, खारूताई मस्त बागडत होती. मी दबक्या पावलांनी भिंतीच्या जवळ गेलो आणि पुढे पळणारी खारूताई अचानक मागे वळली. क्षणभर ते गोल डोळे लुकलुकले आणि कान उभे राहीले. तिला काय वाटले कुणास ठाऊक पण ती न पळता अगदी स्तब्ध झाली. मी कॅमेरा सरसावुन चौकट साधली, खार पळत नाही म्हणताना अलगद झाडाच्या पारावर चढलो.
गुवाहाटी ते कलकत्ता विमानप्रवासात काढलेला फोटो.
कलकत्त्याला पोचतानाच सूर्यास्त होत होता. मी पूर्वेकडे होते त्यामुळे मला सूर्यबिंब दिसत नव्हतं. पण ती केशरी किरणे विमानावर पडलेली होती आणि चमकत होती. बाजूला गंगेचा प्रवाह पण आहे.
कॅमेरा सेटिंग्ज सीन वर होती. बाकी काही लक्षात नाही.