हे वेड माझे सांग रे! साजणा
लेखनविषय:
(अनुवादीत. कवी--मलिक)
झाली जर प्रीति तुजवरती
राहूनी बाहुपाशात तुझ्या
निद्रेत जाईन मी सत्वरी
हे वेड माझे सांग रे! साजणा
कमी कसे होईल याउप्परी
सांगती ह्या नशाधुंद नजरा
अन फूलांचे ते ताटवे
क्षण एक ही घालवू कसे
तुझ्या विना रे! एकटे
सारीच प्रीत उधळून तुजवरी
जादू करूनी जाईन तुजवरी
विसरूनी ती सर्व संकटे
क्षण ते पळ ते जाईन
स्वपना सम विसरून
परतव माझी सारी स्मृती
मलाच तू फिरून
जाईन दूर तुझ्या दुनियेतून
स्मरूनी तुला मन जाईल क्षीणून
हे वेड माझे सांग रे! साजणा
कमी कसे होईल याउप्परी
श्रीकृष्ण सामंत
वाचने
1780
वाचनखूण
प्रतिक्रिया
2
???
In reply to ??? by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे