Skip to main content

राव गेले

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 27/09/2008 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
"रावसर" म्हणून प्रसिद्ध असलेला हा माणूस खरच मनाने आणि ह्र्दयाने पण "राव" होता.

सर्किटची मेख (अर्थात लघुकथास्पर्धा)

लेखक आंबोळी यांनी शनिवार, 27/09/2008 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
हे विडंबन नाही. आम्ही फक्त प्राजुच्या संयमाची रेघ या सुंदर कवितेवरुन प्रेरणा घेतली आहे. आदितीचा 'पाय' होता 'ब्रह्मकुमारी' विप्रंची आंबोळ्याची 'नाडी' होती मनिषची 'लक्ष्मी' कर्णाची 'थंडी' होती होती जरी अजब ती धनंजयाचा 'कंस' तो करी किती 'हाराकिरी'! आत्महत्या करुन गेला ऋषिकेशाचा शेतकरी आयुष्यातून उठून गेला पेठकरांचा टॉमीही मासेमारीचे गूज सांगे टारु हा माउंटब्युकी मारतो माणसे आता चतुरंगाचा बिबटाही! बाजी मारली पार्टनरनी पुरस्कारही घेतला मिपाकरांची परिक्षा घेत आहे सर्किटही! ------------------------------------------- कंदीलसुमार २७-०९-२००८
Taxonomy upgrade extras

साधा माणुस

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 27/09/2008 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
साधा माणुस हे बरं आहे कि लोकं मला साधा म्हणतात साधे असण्याचे बरेच फायदे असतात मी मुद्दामुनच साधा रहातो येडा बनुन बरेच पेढे खातो आहो लोकं माझ्या साध्या बोलण्याला फसतात माझ्या बेशरम कबुलीला ते प्रांजळपणा म्हणतात मी स्वत:वरच टीका करतो लोकं म्हणतात किती प्रामाणिक आहो सांगुन फसवता येतं काय पाहिजे आणिक..? लबाडांचे पाय घेउन मी साधेपणाने वावरतो लबाडांच्या दुनियेत मी असाच रहातो मी असा रहातो म्हणुन पोट भरतो तुम्हिही भरा नाहीतर मरा

डोक्यात जाणार्‍या जाहिराती

लेखक सुचेल तसं यांनी शनिवार, 27/09/2008 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
शितलनी मला आवडलेल्या दूरदर्शन संचावरील जाहिराती हा धागा सुरु केला. त्याचबरोबर अशाही काही जाहिराती असतात ज्या अगदी डोक्यात जातात. समोरचा प्रेक्षक मुर्ख आहे, त्याला काही समजत नाही हे गृहीत धरून केलेल्या जाहिराती. मी मला आठवणार्‍या अशा जाहिराती सांगतो; तुम्ही पण तुमच्या डोक्यात जाणार्‍या जाहिराती सांगा. १) हार्पिकः अक्षरशः पिवळं पडलेले टॉयलेट दाखवून (एवढं पिवळं होऊस्तोवर कोण ठेवेल तसच) डोकं फिरवतात. नेमकी ती जाहिरात जेव्हा जेवायला बसलेलो असतो तेव्हाच लागते २) विसा पॉवर: शंकर-एहेसान-लॉयनी केलेली अतिशय टुकार जाहिरात.

(आज मी बसून आहे _)

लेखक अमोल केळकर यांनी शनिवार, 27/09/2008 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
आज मी बसून आहे, बायको जेवू घाले ना राहिले तसेच काम, की भाकरी फुगे ना ! केरसुणी मी धरावी, नुसतेच तू बघावे ! मी काम करताना , रोजचेच तू नटावे ! ते काम का करावे, समजूनही कळे ना दमलो अती श्रमाने, की पाय चालवेना ! ना घेतली विश्रांती, कामात व्यस्त आहे घरातला नेहमी चा नोकर दूर राहे? धुणे अटीतटीचे, घासता भांडी संपेना चुकवीन बायकोला, ऐसी युक्ति मिळे ना ! की सूड घेई काळ, भलता च हा तुरुंग देण्यास खोल घाव, छळण्यात गुढरंग ? फसलो असा कसा हा, ते आजला कळेना ? आज मी बसून आहे, बायको जेवू घाले ना राहिले तसेच काम, की भाकरी फुगे ना ! --------------------------------------------- मुळ गाणे - अजुन

समुद्रपक्षी (प्रकाशचित्रे)

लेखक लिखाळ यांनी शनिवार, 27/09/2008 02:55 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी ! मध्यंतरी जर्मनीच्या उत्तर किनार्‍यावर फिरायला गेलो होतो. त्या बाजूला लहान लहान अशी काही बेटे आहेत आणि त्या बेटांवरील खारी हवा श्वसनाच्या आजारांवर लाभदायी असल्याने बरेच लोक मुक्कामासाठी येत असतात. तेथे फिरताना सर्वप्रथम आपले स्वागत करतो तिथला दीपस्तंभ.
मला तिथे समुद्रपक्ष्यांची काही चित्रे काढता आली. या पक्षाचे सामान्य इंग्रजी नाव आहे हेरिंग गल.

सोलापुरची आणखी एक खासीयत

लेखक पांथस्थ यांनी शनिवार, 27/09/2008 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
भाजलेले मटण सोलापुरला भाजलेले मटण म्हणुन एक खाद्य प्रकार मिळतो. खाटिका कडुन मटण विकत घ्यायचे. त्याला सांगायचे की भाजुन घेण्यासाठी हवे आहे. म्हणजे तो मटणाचे थोडया वेगळ्या प्रकारे तुकडे करतो आणि चिरा मारुन देतो. बोनलेस पाहिजे असल्यास तसे सांगावे. हे मटण घेउन भाजणार्‍याकडे जायचे. ते लोक मटणाला त्यांचा पारंपारिक घरगुती मसाला लावुन काहि वेळ मुरत ठेवतात (मटणाला चिरा मारल्यामुळे मसाला आतपर्यंत जाण्यास मदत होते - अर्थात खाल्ल्यावर आग किती लागली पाहिजे हे सांगितल्यावर त्यानुसार मसाला लावला जातो).

छोटीची आई

लेखक स्वाती फडणीस यांनी शनिवार, 27/09/2008 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
छोटीची आई ========================= समस्या खूप आहेत.. अगदी सकाळी उठल्यावर; दात घासण्यापासून.. रात्री झोपताना; शू करून आणण्यापर्यंत. हात थकतात ! पाय लटपटतात! डोळ्यापुढे अंधार.. तरी होती उभारी!!! तिच निरागस असणं.. तिच निष्पाप हसणं.. बघितलं की; सार भरून पावायचं! आजही ती तशीच असते.. आ़जही ती तशीच हसते.. बघितलं की;रडूच फुटत! म्हातार्‍या डोळ्यांना.. तापदायक असती.. कंटाळता आलं असत! सोडव विनवता आलं असत! पण नाही... हात जोडले तरी .. ओठ हालत नाहीत..! डोळे मिटायला आलेत.. आणि झोपच येत नाही..!! माझी लाडी अजून छोटीच आहे. देवा तिला गोठवलंस..
Taxonomy upgrade extras