Skip to main content

बटाटा हाईट्स

लेखक अरुण वडुलेकर यांनी मंगळवार, 07/10/2008 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
बोरिबंदर यायला तीनच स्टेशनच राहिली, तसा, लिमयेचा आवाज कानावर येऊन आदळला, " लिखित्या ऊठ रे. डाऊनच्या लोंढ्यात मरायचंय का? च्यायला! लिखित्या, लेका झोप कशी रे लागते एवढ्या गर्दीत." खरंच आज झोप अगदी अनावर झालेली होती. मुंबईतील महानगरपालिकेतील चांगली नौकरी आणि भरभक्कम पगार केवळ या दोनच दोन जमेच्या बाबी वगळता सध्याचे बाकी सारे जीवन जीवघेण्या धकाधकीचे होते. चांगल्या नौकरीचा प्रश्न मुंबईने सोडवला होता तरी निवासाचा प्रश्न खर्डी सारख्या दूरवरच्या गांवात येऊन सुटला होता. प्रवासातच रोज जाऊन येऊन किमान तीन तास जात होते. विश्रांतीही जेमतेमच होत होती. त्यातून वाचनाचे व्यसन लागलेले.

(जाणिव)

लेखक राघव यांनी मंगळवार, 07/10/2008 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या जाणिवेचा प्रेरणास्त्रोत - जाणिव
कुठेतरी पोट माझं कण्हत राहतं थंड सुस्कारांना वाट देत राहतं जेवण ओरपलेलं चवीनं ''जाणीवे''च्या टोकांनी बोचत राहतं नेहमीच आधी केला विचार अधिकाचा समोर नसलेलं सारं जणु माझंच होतं प्रत्येक घासासवे उदराचा घेर वाढलेला आणि सफाईसाठी नको तिथे बोळं अडलेलं असतं नजरांचे ते असंख्य वार अन मुठीतल्या नाकांचे वेडगळ दृष्य सहन करून, अवघडलेलं पोट गुरगुरत राहतं आता कसली तक्रार आणि चिंता कशाची? "ईनो" घेतल्यानंतर जे व्हायचं ते होऊनच जातं "यातनां"नी मात दिली माझ्या "

धनाढ्य एकवीशी

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 07/10/2008 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
धनाढ्य एकवीशी (प्रेरणा- हनुमान चालीसा) जय धन मान सकळ सुखसागर माया वसत त्रीखंडी निरंतर पैसा पैसा पैसा पैसा दिसतो ऐसा, आहे कैसा? लपविला जर टॅक्सची खासा काळा शार बने मग पैसा भरता सरकाराऽचे देणे शुभ्र धन नांदे अभिमाने हिरवा रंग नोटांचा तुमच्या नयनी दिसे झणी लोकांच्या काळ्या नोटा, दिली सुपारी लाल रंग मग धन ते धारी रंगबिरंगी अती पैसा वरचा परीटाकडून शुभ्र करायचा पैसा अपुला रोड भासतो दुसऱ्याचा तो लठ्ठ जाहतो खोटी नाणी, चपळ फ़िराई तांब्याची मोडीत विकाई पेटीत ठेवून कोऱ्या नोटा तुकडेवाल्या जोडून वाटा पैसा नश्वर, आरोप खोटा! शाश्वत आहे प्लास्टीक नोटा उधारीचा तो पैसा प्लास्टीक जपून ठेवती पैसा बॅन
Taxonomy upgrade extras

अमेरिकास्थित भारतीय वंशाच्या कुटुंबातील हत्याकांड

लेखक मुक्तसुनीत यांनी मंगळवार, 07/10/2008 07:19 या दिवशी प्रकाशित केले.
सीएनएन मधील बातमी : http://www.cnn.com/2008/CRIME/10/06/california.murder.suicide/index.html बातमीतील महत्त्वाची वाक्ये :
महिनोन् महिने नोकरी न मिळाल्याच्या नैराश्यातून लॉस एन्जल्स भागातल्या "सान फर्नांडो" या सधन लोकवस्तीत रहाणार्‍या माणसाने आपली सासू , पत्नी व तीन मुले यांची गोळ्या घालून हत्या केली. नंतर त्याने आत्महत्या केली. ..... ...... कार्थिक राजाराम या ४५ वर्षे वयाच्या माणसाचे हे कृत्य आहे असे सकृद्दर्शनी दिसते. ... .... मृतांमधे एका १९ वर्षे वयाच्या मुलाचा समावेश आहे.

माझी कविता

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी मंगळवार, 07/10/2008 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या कवितेवर नाही संस्कार भाषेच्या व्याकरणाचा, प्रतिभा अलंकारांचा, तो आहे केवळ उदगार माझ्यातल्या अनुभूतिचा. कुणाला तरी आई म्हणाव इतका संस्कार आईग! म्हणायला पुरेसा आहे, कुणाला तरी बाप म्हणाव इतका संस्कार बापरे!! म्हणायला पुरेसा आहे कुणापुढेतरी नतमस्तक व्हाव इतका संस्कार अरे देवारे!!! म्हणायला पुरेसा आहे आईग! बापरे!! अरे देवारे!!! इतक आणि इतकच माझ्या कवितेच आयुष्य बाकी शब्दांपेक्षा महत्वाच आहे ते अनुभूतिच विश्व......!

अपवाद

लेखक सर्वसाक्षी यांनी मंगळवार, 07/10/2008 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
वोक हार्ड रुग्णालयातील वैद्यकिय तपासणीचा दिवस. आमच्या आस्थापनेत सर्व कर्मचार्‍यांना वर्षातुन एकदा वैद्यकिय तपासणीचा आग्रह असतो, न गेलात तर तुमची मर्जी. साहेब म्हणाले, जा; आम्ही गेलो. एकट्याला फार वैताग येतो तेव्हा बरेचजण दोघे-तिघे ठरवुन एकत्र जातात. मीही माझ्या एका वरिष्ठ सहकार्‍यांबरोबर संधान साधले होते आणि आम्ही सकाळीच दाखल झालो.

विज्ञानशास्त्र, आपलं मन आणि जीवन विकसित करतं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 06/10/2008 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रो.देसाई बरेचसे मुडमधे दिसले.तळ्यावर जाता जाता ते मला वाटेतच भेटले.तिथूनच आम्ही अशा विषयावर बोलायला सुरवात केली,की मला वाटलं भाऊसाहेब आपल्या कॉलेज मधल्या जुन्या आठवणी न काढता काही तरी नवीन माहिती देतील.पण झालं उलटंच. मी त्याना म्हणालो, "भाऊसाहेब,आजकाल मुलांना नुसतं वर्गात शिकवत नाहीत.त्यांना जे वर्गात शिकवतात,त्याचं प्रॅक्टीकल दाखवण्यासाठी बाहेर पण घेऊन जातात.आणि अलीकडे सायन्स म्युझीयम,प्लॅनेटेरीयम,मुलभूत संशोधन करणार्‍या संस्था अशा ठिकाणी नेऊन त्याना माहिती देतात.त्यामुळे विज्ञानाचा प्रसार परिणामकारक होतो.तुम्हाला नाही का वाटत?" मी एव्हडं बोलायचीच फुरसत,प्रो.देसायानी आपल्या लहानपणातल्

जाणीव

लेखक मनीषा यांनी सोमवार, 06/10/2008 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
कुठेतरी दुःख माझं कण्हत राहतं अश्र्रुंना वाट देत राहतं आयुष्य संपलेलं कणाकणांनी जाणीवेच्या टोकांनी बोचत राहतं नाही कधी केला विचार अधिकाचा जे सामोरं आलं तेच माझं होतं एकेक धागा उकलून आयुष्याची वीण उसवलेली आणि सांधण्यासाठी सुईचं टोक मोडलेलं असतं नजरांचे ते असंख्य वार अन बोचर्‍या शब्दांचे आघात सहन करून, भावनांचं तळं गोठत राहतं कशाची तक्रार? चिंता ही कसली? दुसरं टोक आयुष्याचं आपणहून जवळ येत जातं यातनांनी मात दिली माझ्या जाणीवांना आणि मानलं मी की आभाळच माझं तितकंसं मोठं नव्हतं

नवी बाटली, जुनी दारु ...

लेखक अभिजीत यांनी सोमवार, 06/10/2008 06:16 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा एक कोंबडा उंच झाडावर आरामात शीळ घालत मजेत बसला होता. एक भुकेलेल्या कोल्ह्याने ते पाहिले. आता ह्या कोंबड्याची शिकार करून टाकू असा विचार करीत कोल्हा त्याला म्हणाला, "मित्रा, तुला जंगलातला 'सर्वंकष शांती आणि एकोपा' हा नवा नियम कळला का? अरे, आता नव्या तहानुसार, कोणीही कोणाची शि़कार करणार नाही आणि या जंगलातील सर्व प्राणी गुण्यागोविंदाने राहतील. आता तू मला तुझा मित्रच मान आणि इथे खाली ये. आपण एकत्र इथेच गप्पा मारू." कोंबडा यावर काहीच बोलला नाही. त्याला कोल्ह्याच्या लबाड स्वभावाची कल्पना होती. कोंबड्याने मान उंच करून दूरवर बघत असल्याचा बहाणा केला.

उमेद

लेखक फटू यांनी सोमवार, 06/10/2008 06:12 या दिवशी प्रकाशित केले.
जर तुझ्या जगात उलथापालथ होताना कुणी तुझ्या हाकेला ओ दिलीच नाही, तुला आधाराची नितांत गरज असताना निसटत्या क्षणी मदत मिळालीच नाही, कातरवेळी दूर जाणा‍र्‍या वाटेकडे पाहूनही मायेचा स्पर्श करणारं कुणी आलंच नाही, नजरेमध्ये गगनभरारीचं स्वप्न असताना तुझ्या पंखांना कुणी जर बळ दिलंच नाही, जर कधी झाकोळून गेलं निळं आभाळ सारं तू भर दर्यात अन कधी बेईमान झालं वारं, निरव एकाकी वाटेत तू अडखळत असताना कुणीच नसेल बाजुला तुला आधार देणारं, माझ्या खांद्यावर विश्वासाने डोकं ठेव अन तुझ्या आसवांना तू वाट मोकळी करुन दे विसरुन जा जिवलगा सार्‍या जगाला अन मनामध्ये नवी उमेद पुन्हा एकदा भरू
Taxonomy upgrade extras