Skip to main content

मामाच्या गावाला

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 01/07/2008 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
जायचेना आपल्याला, मामाच्या गावाला आगगाडीत बसून, गंमत बघायला
गाडीच्या प्रवासात, मी जागाच रहाणार बर्थवरून सारखा, खालीवर खेळणार
मला नको टिफीनचा, चिवडा लाडू कोरडा बोलाव फेरीवाल्याला, घे गरम वडा
इतका वेळ इथे, गाडी थांबली कशाला? उतरून खाली धक्का, मारू मी डब्याला?
पुलावरून जातांना, धडधड आवाज होती पडणार नाही ना खाली, मला वाटते भीती
पुन्हा बोगदा आला, हा पण जाईल संपून बोगद्यातच का आई, बांधले नाही स्टेशन?
अजून किती गावे राहीली, मला मोजायचीय सगळी पण आई मला आता, झोप खूप ग आली
तूच मोज ना गावे सगळी, सांग उद्या मला उठव सकाळी पोचल्यावर, मामाच्या गावाला!
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 5993
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

>>पुन्हा बोगदा आला, हा पण जाईल संपून >>बोगद्यातच का आई, बांधले नाही स्टेशन? उत्तम !!

छान! मीही आज दोन दिवस मनातल्या मनात रेल्वेप्रवासात गुंगलेलो आहे.

अरुण मनोहरजी, खुप छान कविता. सहज आणि सुंदर अशी. पुन्हा बोगदा आला, हा पण जाईल संपून बोगद्यातच का आई, बांधले नाही स्टेशन? ---हे तर खुपच मस्त. -ह्रषिकेश http://sucheltas.blogspot.com

माझंही मत वरील सर्वांप्रमाणेच. अतिशय सुरेख कविता. वाचून दिल खुश झाला! :) अरूणराव, जियो..! :) तात्या.