Skip to main content

मी संवेदनशील कवि

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी रविवार, 12/10/2008 08:40 या दिवशी प्रकाशित केले.
चार भिंतींच्या आड लावून कवाड मी करतो कविता .. विद्रोहाच्या...! खिडकीतून पाउस बघत आजिबात नाही भिजत मी करतो कविता.. पावसाच्या...! टेबल ल्यांम्पचा प्रकाश पंखा डोक्यावर मी करतो कविता लोडशेडिग वर...! अशी माझी संवेदना मी परीट घडीत जपतो अन् संवेदनशील कवि म्हणुन नावारुपास येतो.....!
Taxonomy upgrade extras

आम्ही मराठी

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 11/10/2008 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
शिवसेनेचा दसरा सोहळा निमित्ताने छोटा डॉन यांनी लिहीलेल्या लेखा वर अनेकांनी उद्धव आणि राज यांनी एकत्र काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्या सर्वांसाठी ही कविता समर्पित........!
त्यांने करून ताठ कणा हुंकारला मराठी बाणा झक मरून मग याने केला मराठी बहणा दे माय धरणी ठाय दुभंगली माझी मराठी माय सूचत नाही करू मी काय......? अरे! रक्ताची नाही.. पण ..मराठीची तरी चाड ठेवा..! एक व्हा.. बाबांनो..
Taxonomy upgrade extras

एका मनीमाऊचा किस्सा

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 11/10/2008 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रो.देसाई एका गृहस्थाना घेऊन आले होते आणि माझी ओळख करून देताना म्हणाले, "हे गंगाधर अधिकारी,गेली वीस वर्ष हे कैदी म्हणून तुरंगात होते.साध्याश्या गुन्हाचं पुराव्याच्या आभावी,गाढव कायद्दाने आणि नियतीने त्यांच्यावर हा अत्याचार कला होता.सुटून आल्यावर ते स्वतः आता असिस्टंट जेलर म्हणून काम करीत आहेत.त्यांच्या शिक्षेच्या काळात त्यानी मानसशास्त्रावर अभ्यास करून पीएचडी मिळवली आहे. आमच्या शेजार्‍यांचे ते नात्याचे आहेत.तुमच्या बरोबर ओळख करून देण्यासाठी मी मुद्दामच याना तळ्यावर घेऊन आलो." त्यांच्याकडे पाहून मला खरोखरंच कुतुहल वाटत होतं. पिळदार मिशी, घोगरा आवाज,मोठाले डोळे आणि चेहर्‍यावर किंचीतसं स्मित

नावात (असे) काय आहे?

लेखक भोचक यांनी शनिवार, 11/10/2008 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीत लिहिताना काही गावांची किंवा काहींची नावं, आडनावं तशी का लिहितात हा प्रश्न पडतो. उदा. हिंदी भाषेत 'ळ' नाहीये तरीही भोपाळ असं आपण का म्हणतो? आख्ख्या हिंदी प्रदेशात ग्वालियर म्हणतात मग आपणच ग्वाल्हेर का म्हणतो? बडोद्याला तिथे वडोदरा म्हणतात. मग आपणच बडोदा का म्हणतो? शंकर दया'ळ' शर्मा कसे होईल? मग 'कमल' किशोर कदमचे 'कमळ' किशोर कदम असे का लिहिले जात नाही? अशी बरीच उदाहरणं देता येतील. तुम्हाला काय वाटते?

आम्ही कोण........ ?

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 11/10/2008 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
कणा मोडलेली माणसे आम्ही, कुणा पुढेही वाकणारी माणसे आम्ही, पोटासाठी होतो लाचार आम्ही, खोट्यासवे करितो व्यभिचार आम्ही, टांगू नकाहो आरसे भिंतिवरी आमुच्या, आमुचाच चेहेरा बघूनी भयभीत होवू आम्ही,
Taxonomy upgrade extras

लोस बुक करु? भविश्यात होनारा अधिक लोस वाचवु कि काय करु?????

लेखक उम्मि यांनी शनिवार, 11/10/2008 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
सध्याचि सिचुवेशन मध्ये माज्यासारख्या गुतवनुकदाराने काय करावे?? लोस बुक करुन शेअर विकु???? आनि कापितल वाचवु???? भविश्यात होनारा अधिक लोस वाचवु कि काय करु????? तात्या, नाना,जेनान्च कार्त मार्गदर्शन करा.....................

एक कविता

लेखक रामदास यांनी शनिवार, 11/10/2008 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
येणार आज म्हणूनी, डंका पिटून गेले ते मेघ पावसाळी चोरून अंग गेले. चकवे दहा दिशांचे उसने हसून गेले वेळूत रानवारे फुंकून दंभ गेले. दिनरात वंचनेचे पेले भरून प्याले हिरवे पडाव त्यांचे करपून खाक झाले. कमळात सावल्यांच्या अडकून भृंग झाले कित्येक रामदासी कुळवंत रंक झाले.
Taxonomy upgrade extras

मिसळपाव चे मालक, संचालक मंडळ कोण?

लेखक येडा खवीस यांनी शनिवार, 11/10/2008 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मी तसा मिसळपाव वरचा एक नवा सदस्य आहे. एकंदरीत हे उपहारगृह मला मनापासुन आवडते. पण माझे काही प्रश्न जे अजुनही अनुत्तरीत आहेत ते असे १) मिसळपाव ह्या वेबसाईटचे मालक (ओनर) कोण आहेत? २) संचालक मंडळ( मॉडरेटर्स) आहेत का? ३) ह्या वेबसाईटची अर्थव्यवस्था कशी आहे? ( जाहीरातीमधुन वगैरे उत्पन्न आहे का?)

रत्न, खडे, गंडे हे प्लासिबो आहेत काय ?

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 11/10/2008 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
लिखाळ या ठिकाणी म्हणतात" ज्योतिषाकडे गेले असता तोडगे ऐकण्याची अनेकांची ईच्छा असते. त्याशिवाय लोकांना चैन नसते. चार महिन्याने दिवस बदलतील असे म्हटले तर समाधान होत नाही. सोळा सोमवार करा, दिवस बदलतील, भाग्य उजळेल हा उपाय मात्र भारी वाटतो. रत्न, खडे, गंडे हे सुद्धा असेच प्लासिबो आहेत की काय असे मला वाटते. " लिखाळ साहेबांनी महत्वाचा प्रश्न उपस्थित केला आणि उत्तर ही दिले आहे. त्याची दखल आम्ही ज्योतिषाकडे जाण्यापुर्वीत घेतली आहेच.