लाल निळा शेपूटवाला
पतंग उडवू चला चला
खाऊचे पैसे देऊन
रीळ आणले वाण्याकडून
केला मांजा काचा कुटून
हात काचले घोटून घोटून
...........
दादाने मग ताव कापला
कमच्या बांधुन पतंग केला
झिरमिळी शेपट्या बांधल्या
मैदानावर जाउ चला
लाल निळा शेपूटवाला
पतंग उडवू चला चला
...........
ताणुन दोरी उंच फ़ेकला
सरसर भरभर हवेत चढला
गिरक्या घेता नाच नाचला
पक्षासंगे मजेत फ़िरला
.............
आणा खाली ढील सोडुनी
घ्या बाजुला हिसका देऊनी
चढवा दुसऱ्या मांजाखालुनी
वळसे घाला गोल फ़िरवुनी
लाल निळा शेपूटवाला
पतंग उडवू चला चला
.........
दोन पतंग असे गुंतले
डावी उजवी करू लागले
एकमेका खूप खेचले
दमली ओरडुन मुले
............
बघा बघा तो खाली आला
हा तर आहे पतंग अपुला
कसा तरंगत दूर चालला
पळा पकडुया चला चला
लाल निळा शेपूटवाला
पतंग उडवू चला चला
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2301
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच
पतंग
उत्तम बालगीत शोभावे अशी कविता
उत्तम बालगीत
In reply to उत्तम बालगीत शोभावे अशी कविता by बेसनलाडू
पतंग
सुंदर
आवडली