Skip to main content

भूपाळी (देवद्वार छंद)

लेखक घाटावरचे भट यांनी शनिवार, 08/11/2008 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही नुकतीच धोंडोपंतांची नव्याने सुरु झालेली छंदशास्त्राची शिकवणी लावलेली आहे. हा पहिल्या धड्यावरचा गृहपाठ. उठा हो दयाळा प्रभात जाहली पाहा उजळली पूर्व दिशा भेटीसाठी झाले जन सारे गोळां भक्तांचा हा मेळां वाट पाहे दाखवा हो रूप सावळें सुंदर अति मनोहर आम्हालागीं तुम्ही राम आम्हा तुम्ही कृष्ण आम्हा विठ्ठलही आम्हा तुम्हाठायी द्या हो सर्वां सुख आरोग्य सावली करा ब्रीदावली काही सार्थ भटू म्हणे नाही मजला कवित्व केवळ ममत्व ईश्वराचे अजाणतेपणी काही केला यत्न दगडच रत्न माना ऐसे

चान्द्रयान चंद्राच्या कक्षेत पोहोचलं!

लेखक बहुगुणी यांनी शनिवार, 08/11/2008 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
टी ऑफ आय मधील बातमी पुढे काय? कुणी माहिती सांगितली तर वाचायला आवडेल. चिनी ब्लॉग्स वर मात्र या मोहिमेच्या यशाविषयी बर्‍याच कुशंका व्यक्त केल्या जाताहेत असं वाचण्यात आलं, वस्तुस्थिती काय आहे?

नेपाळी बटाटा

लेखक स्वाती दिनेश यांनी शनिवार, 08/11/2008 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
माझे आजोबा आटगांवला असताना त्यांच्या कडे एक नेपाळी गुरखा खानसामा होता,तो अशी भाजी करायचा. अशी बाबा त्यांच्या लहानपणीची आठवण सांगतात.

देवद्वार छंद

लेखक धोंडोपंत यांनी शनिवार, 08/11/2008 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, वृत्तबद्ध काव्य ज्यांना लिहायचे आहे त्यांनी एक एक वृत्तावर प्रभुत्व मिळवावे. एकदम भाराभर वृत्ते समोर घेऊन बसू नये. त्यातही तीन पायर्‍या आहेत. सर्वप्रथम १) छंदांवर प्रभुत्व मिळवावे. त्यानंतर २) छंदात लिहिणे जमू लागले की जातींमध्ये लिहायला सुरूवात करावी. आणि शेवटी ३) जातींमध्ये लिहिता यायला लागले की मग अक्षरगणवृत्तात लिहिण्याच्या पायरीवर जावे. एकदम सुरूवातच मालिनी किंवा शार्दूलविक्रीडित सारख्या वृत्तांची निवड केल्यास जमणार काहीही नाही आणि त्यातून फ्रस्ट्रेशनमात्र भरपूर येईल. एवढं येईल की ते आयुष्यभर पुरेल.
Taxonomy upgrade extras

छंदशास्त्र

लेखक धोंडोपंत यांनी शनिवार, 08/11/2008 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, कळविण्यास अत्यंत आनंद होतो की मिसळपाव वर लवकरच आम्ही छंदशास्त्राचे सदर सुरू करीत आहोत. मिसळपाववर काव्यलेखनाची उर्मी अनेकांना आहे. त्यांची प्रतिभाही चांगली आहे. पण आमच्या पाहण्यात असे आले आहे की, अनेक नवोदित कवींची वृत्तांवर पकड नाही. वृत्तात निर्दोषपणे लिहिता येणे अत्यंत आवश्यक आहे. वृत्तात कविता फसली की भातात खडा आल्यासारखे ते काव्य खटकते. परिणामी त्यातील रंजकता निघून जाते. मराठीत अनेक उत्तमोत्तम वृत्ते आहेत. पण आज दुर्दैवाने मुक्तछंदाच्या नावाखाली पाडल्या गेलेल्या तथाकथित काव्याकडे अनेकांचा ओढा आहे. वृत्तात लिहायचे म्हणजे ते वृत्त अंगवळणी पडेपर्यंत श्रम घ्यायला लागतात.

आमची बायको कुत्रा पाळते

लेखक अरुण मनोहर यांनी शनिवार, 08/11/2008 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
आमची बायको कुत्रा पाळते तुम्ही पाळून देऊ नका आमच्या पायाखाली जळते तुम्ही पोळून घेऊ नका.
कुत्रे पाहून मैत्रीणीकडे वेडे खूळ मनात भरले आपण पपी घेऊ गडे लाडे लाडे फर्मान सुटले
भलतीच पपी वाटली मला घेऊ ग लवकर, म्हटले पपी नव्हे, घात झाला कुत्रे शोधणे सुरू झाले.
अल्सेशियन, बव्हेरियन डोबरमॅन, चिव्हावा सारे कनाईन धुंडून पामेरोरियन ठरला घ्यावा
नकद चार हजार मोजून शुभ्र कुत्रा हिने खरिदला सतत लाड त्याचे पाहून माझा भाव खाली उतरला
पपीची खेळणी आणि खाऊ रोज हिची धावपळ बघून वाटे पपीला गिळू की खाऊ सारखा
Taxonomy upgrade extras

आप्पा आणि बाप्पा

लेखक मूखदूर्बळ यांनी शनिवार, 08/11/2008 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
" काहीतरी उद्योग काढ बघू" आप्पा प्रधान " आता गुपचूप झोप " बाप्पा सरमळकर " अरे बाप्पा मनाला काहीतरी चाळा हवा ना" " खरच नको रे आप्पा. गेल्यावेळेला काय गोंधळ झालेला. आठवतय ना? त्यांनी आपल्याला सरळ बाहेरचा रस्ता दाखवला असता. आपण बाबा-पूता केल म्हणून थोडक्यात निभावल " " आता त्याची आठवण कशाला ? " " मग आता का चिडतोस ? " " चिडत नाही. पण आत्ता काय करायचय बोल ?" " ठीक आहे. तूझा जर एवढा आग्रहच असेल तर..." . *************************************************************************************** आप्पा सबनीस आणि बाप्पा महाले हे दोघ जीवश्च कंठश्च मित्र. आप्पा थोडासा घाबरट. तूमच्या आमच्या सारखा.

सदू आणि दादू

लेखक मूखदूर्बळ यांनी शनिवार, 08/11/2008 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
सदू आणि दादू नेहेमी प्रमाणेच गोदू ची वाट पहाताहेत. पण ह्यावेळी ते प्रत्यक्ष भेटत नसून मिसळ पाव वर भेटताहेत ) सदू : नमस्कार मंडळी. कोणी आहे का इथे (हसणारी बाहुली) दादू : नमस्कार सदू. मी आहे (हसणारी बाहुली) सदू : तू आहेस का मला वाटल कुणीच नसणारै (मनात : कशाला उगवलास रे अवेळी. चांगला एकांतात भेटणार होतो गोदूला) दादू : अरे पण तू ह्या वेळी कसा काय (मनात: चल कट बर लवकर) सदू : अरे थोड कंपनीच काम करत होतो. आता आटोपल.

चमचमीत भरली वांगी

लेखक आकांक्षा यांनी शनिवार, 08/11/2008 03:12 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः ४ लहान वांगी, १ मोठा बारिक चिरलेला कांदा, बारिक चिरलेली कोथिंबीर, तेल, तिखट, हळद, मोहरी, गोडा मसाला, कांदा लसुण मसाला, चवीपुरती साखर (आवडीनुसार), मीठ, दाण्याचा कुट (साधारण पाउण वाटी), ताज दही अथवा लिंबू कॄति: प्रथम वांगी भरण्याचा मसाला तयार करुन घेणे. त्यासाठी दाण्याचा कुटामध्ये दही किंवा लिंबू घालावे, मग कांदा लसुण मसाला, तिखट, गोडा मसाला, मीठ आणि चवीपुरती साखर घालावी व ते व्यवस्थित मळुन घेणे. हे सईल नसावे. आता वांग्याना उभी चिर देऊन त्यात हे मिश्रण भरावे. आता कढईत २ चमचे तेल घ्यावे. गरम झाले की मोहरी घालावी व थोडी कोथिंबीर घालावी. कोथिंबीरीचा सुगंध दरवळला की वांगी सोडावीत.