Skip to main content

तात्या शिंचा अमेरीकेला निघाला...! :)

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 18/11/2008 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
पासपोर्ट, व्हिसा दाखवून आता अगदी विमानतळाच्या आतल्या कक्षात शिरणार तो मायभूत खाल्लेल्या शेवटच्या जाफरानी १२० पानाची पिचकारी विमानतळावरच्याच त्या छान छान नी सुंदर सुंदर फ्लोअरवर पऽऽचाककन मारावी की काय असं तात्याला वाटत होतं, पण दारावरच्या करड्या अधिकार्‍यामुळे ते शक्य झालं नाही.. तात्याला अपमान गिळावा तसा तो मुखरस गिळून टाकावा की काय, असंही क्षणभर वाटून गेलं! छ्या! अमेरीकेला जायच्या आधीच अपमान सुरू? 'नाही!

अमुची चिमुकली गादी

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 17/11/2008 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
हेमू अधिकारी काल बाजारात भेटला.थोडा चिंतेत दिसला.त्याच्या थोरल्या मुलीला गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याने डॉक्टरने तो काढून टाकण्याचा सल्ला दिला. हेमूच्या पंचवीस वयाच्या नातवाला,आईची मनस्थिती पाहून दया येत होती.ह्या विषयाकडे तो भावनाप्रधान होऊन विचार करीत होता.रोज रोज शस्त्रक्रियाकरून डॉक्टरना काय? एखादी फाटकी पिशवी काढून टाकल्यासारखी वृत्ती त्यांच्यात आली होती.डॉक्टरांची चूक नाही म्हणा.संवयीचा परिणाम. हे सर्व हेमूकडून ऐकून त्यांच्या नातवाच्या मनातली भावना कवितेत सुचली. कळला गे आई! तेव्हा खरा जीवनाचा आशय काढतील तुझा जेव्हा तो अमुल्य गर्भाशय गे!
Taxonomy upgrade extras

हे काव्य कुणाचे आहे ?

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 17/11/2008 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
हे काव्य कुणाचे आहे ? वंदना विटणकर की कुणी ? हिरवा हिरवा ऋतु s s s हिरवा हिरवा ऋतु s s s || कड.|| अधिकच हे मन हिरवे s s जवळी असता तू || हिरवा हिरवा ऋतु s s s हिरवा हिरवा ऋतु s s s हिरवा हिरवा ऋतु s s s हिरवा हिरवा ऋतु s s s || कड.|| (क्रूपया चेष्टा करु नये.)

जुवळ- भाग २( अंतिम)

लेखक कपिल काळे यांनी सोमवार, 17/11/2008 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
जाउया की नको वरती, काय असेल......? >> पहिला भाग इथे वाचा चलबिचल होउन शेवटी वरती जाउन काय ते बघायचं ठरवलं. पहिली छोटीशी चढाई करुन वर गेलो. समोर बघतो तर काय, एक विलक्षण दॄश्य दिसत होतं. आम्ही देहभान हरपून बघतच उभे राहिलो. शेजारी कोणी उभं आहे ह्याची सुद्धा जाणिव झाली नाही. नजरबंदी झाल्यागत होउन गेलं. त्या छोट्याश्या सपाटीवर दोन तीन बांबूची बेटं होती. दोन तीन वीत भर उंच गवत माजलं होतं.

जुवळ- भाग-१

लेखक कपिल काळे यांनी सोमवार, 17/11/2008 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
मी नववीत होतो तेव्हा पावसाळ्यात ट्रेक करायचा ठरवला. तेव्हा काही बाही पुस्तकं वगैरे वाचून, नॅट-जिओवर काही फिल्म्स बघून ट्रेकबद्दल एकदम आकर्षण निर्माण झालेलं.आम्ही सगळे मित्र तसे पावसात क्रिकेट खेळता येत नाही म्हणून डोंगरउतारावरुन घसरगुंडी खेळायचो. पावसाळ्यात उतार निसरडा झाला की खाली सरकत यायचं. त्यामुळे दर पावसाळ्यात घसरुन उतरुन पहिली चड्डी फाटली की तो खेळ बंद. पण त्या वर्षी गावातल्या व्हाळातून* चालत ट्रेक करण्याचा घाट घातला. ते भाद्रपदातले दिवस होते. शाळेला गणपतीची सुट्टी नुकतीच लागली होती. ह्या दिवसात कोकणात पाउस जरा खळावतो* आणि थोडी ताप* पडते. त्यामुळे जनावरं* बिळातून बाहेर येतात.

कोकोनट-चॉकलेटच्या वड्या.

लेखक शितल यांनी सोमवार, 17/11/2008 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य. - २- छोटे मारी बिस्कीटचे पुडे २- चमचे चॊकलेट पावडर २- वाट्या बदाम पुड १- वाटी काजु पुड २- वाटी सुक्या नारळाचा चव दीड वाटी पिठी साखर. १- टीन कंडेन्स मिल्क अर्था वाटी दुध. कृती - १. मारी बिस्कीट मिक्सरवर फाईन बारीक करून घ्यायचे, एका प्लेट मध्ये ओतुन त्यामध्ये दोन चमचे चॊकलेट पावडर, एक वाटी बदामाची पुड पाऊन टीन कंडेन्स मिल्क घालुन ते पिठ मळतात तसे मळुन घ्यायचे, मळताना थोडे- थोडे दुध ही घालायचे, ( पुरीला जेवढे घट्ट मळतो तेवढे घट्ट मळायचे ) आणि साधारण त्या पिठाचे तीन गोळे करायचे. (चॊकलेटी कलरचा गोळा तयार होतो.) २.

अज्जे अज्जे ऐक जरा..

लेखक स्वाती फडणीस यांनी सोमवार, 17/11/2008 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
अज्जे अज्जे ऐक जरा.. ======================== अज्जे अज्जे ऐक जरा.. तुझा आशीर्वाद असूदे! रूप तुझे मिळूदे.. सुंदर मला बनूदे.. नाक डोळे नाही गं! तुझ्या सारखं हसूदे..!! अज्जे अज्जे ऐक जरा.. तुझा आशीर्वाद असूदे! तुझ्या इतकं मोठ्ठेपण मलाही मिळूदे.. वय वर्ष नाही गं! आकाश बनता येऊदे..!! अज्जे अज्जे ऐक जरा.. तुझा आशीर्वाद असूदे! तुझ्या सारखी एक पोटली माझ्या कडे असूदे.. धन दौलत नाही गं! थेंब बनून बरसूदे..!! अज्जे अज्जे ऐक जरा.. तुझा आशीर्वाद असूदे! तुझ्या हातातलं तिकिट मलाही मिळूदे.. विमान बिमान नाही गं! मन पिसाच होऊदे..!!! ======================== स्वाती फडणीस..... १३-११-२००८
Taxonomy upgrade extras