Skip to main content

खव्वयांसाठी पुण्या मुंबईतील हॉटेले [त्यातल्या त्यात मासे]

लेखक संताजी धनाजी यांनी गुरुवार, 20/11/2008 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, सामीश भोजनासाठी [त्यातल्या त्यात मासे] पुणे आणि मुंबईत अनेक "खव्वयी" हॉटेले आहेत, समर्थ भोजनालयासारखी. माझी अश्या हॉटेलांना भेट देण्याची जाम ईच्छा आहे [नुसती नव्हे ;)]. तुम्हाला अशी कुठली हॉटेलं माहीत असतील तर सांगा ना! अशी एक मस्त यादी बनवायची आणि मग जमेल तसे एकेका हॉटेलचा आस्वाद घ्यायचा. कशी वाटली कल्पना? सुरुवातः १. समर्थ भोजनालयः गिरगाव, मुंबई बसने ठाकुरद्वार बसस्टॉपला उतरा आणि "मिरबत लेन"ची चौकशी करा. बस रुट पासुन दोन मिनिटाच्या अंतरावर आहे हॉटेल. जरा शोधावे लागते. हं करा सुरु :) -संताजी धनाजी

हिशोब

लेखक उपटसुंभ यांनी गुरुवार, 20/11/2008 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
कर्जाचे अन कर्जमाफीचे ओघ ठेवले. दान दिले पण परताव्याचे योग ठेवले. पाणी आता साधन झाले लढण्यासाठी, पिण्यास बाकी पेप्सी आणि कोक ठेवले. दर रविवारी संस्कृतिरक्षण पुरले नाही. रोज पार्वती अन तुलसीचे “सोप” ठेवले. विचार मांडायाला त्यांनी दिली मुभा पण, छातीवरती तलवारीचे टोक ठेवले. देवा तुजला नवसाचा बघ चेक फाडला. गार्‍हाणे मी मात्र आपुले “रोख” ठेवले. चित्रगुप्तही मला म्हणाला कमाल झाली. हिशोब होते मीही ऐसे “चोख” ठेवले..! – अभिजीत दाते
Taxonomy upgrade extras

माझ्यातल्या कवीला सूचना.... (माझ्या पुरत्याच इतरांनी राग मानू नये )

लेखक सागरलहरी यांनी गुरुवार, 20/11/2008 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
नाद सोड यमकाचा लेका, वजन विचारा देशील का ? पुरे शब्दांची कारागिरी, अन आतुन येई ते लिहीशिल का ? मुखड्याच्या दो शब्दांची, दोरी तू ओढसी किती ? शब्दांचे भरताडच होते, भाव दाटला त्यात किती ? सुखे बैसुनी गादीवरती, कविता जन्मा येत नसे ! पांघरुन वेदनेचे जगणे, दु:खाचे लागेल उसे ! -- आपला दळण छाप लहरी सागर
Taxonomy upgrade extras

डाएट आणि व्यायामशाळा दया सोडून

लेखक कपिल काळे यांनी गुरुवार, 20/11/2008 02:40 या दिवशी प्रकाशित केले.
कॅलरी जाळायच्या आहेत? वजन कमी करायचं आहे? स्लीम आणि फिट व्हायचं आहे? मग म.टा.मधील ही बातमी वाचा. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3733746.cms आता डाएट आणि व्यायामशाळा दया सोडून आणि ...

"चैत्र"

लेखक मुक्तसुनीत यांनी गुरुवार, 20/11/2008 01:22 या दिवशी प्रकाशित केले.
कै. जी ए कुलकर्णी हे नाव मराठी वाचकांना एक महत्त्वाचे कथालेखक म्हणून चांगले परिचित आहे. त्यांनी लिहीलेल्या सुमारे शंभरेक मराठी कथा हा , आजही वाचक आणि अभ्यासकांकरता वाचनाचा , चिंतनाचा , अभ्यासाचा, विषय आहे. जीएंनी त्यांच्या सुरवातीच्या काळात लिहिलेली एक कथा म्हणजे "चैत्र". या कथेवर बनविलेला एक छोटासा चित्रपट बघण्याचा योग अलिकडे आला. या चित्रपटाबद्दल थोडे आपल्या मित्रमैत्रिणिंना सांगावे म्हणून या लिखाणाचा प्रपंच. सुरवातीला मूळ कथेबद्दल. पुढील परिच्छेदांमधे आणि त्यानंतरच्या विवेचनामधे कथानक आणि त्याचे प्रमुख धागेदोरे उघड करत आहे.

निर्गुण निराकार.......

लेखक अनंत छंदी यांनी बुधवार, 19/11/2008 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
छ्या! आता डोकं ऊठणार! या कमलेश आणि शिरीषचं भांडण कसं मिटवावं बुवा? अरेरे... पलिकडच्या गायन क्लासातही आज पोरं नुसती विव्हळतायत.. एकाचा सूर धड लागेल तर शपथ.. आजचा दिवसच बेकार दिसतो... ए, थांबारे जरा.... कमलेश आणि शिरीष.. जरा धिरानं घ्या की... तुमची दोघांची फ़्रिक्वेन्सी साली कधी जुळतच नाही कारे? कायम आपले शॊर्टवेव्हवर दोन रेडिओ स्टेशन्स एकाच वेळी लागल्यासारखे काय बडबडताय? ए गप...गप्प बस जरा... हे काय? गायनक्लासवाल्या मॆडमनी हा कुठला सूर लावला? हिरना....हिरना... अरे ही तर कबिराची रचना दिसते....बरेच दिवसांपूर्वी कधीतरी कुमारजींच्या आवाजात ऐकलं होतं हे निर्गुणी भजन...

प्रतिसाद वाद विवाद संवाद

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी बुधवार, 19/11/2008 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
या काव्यासाठी प्रेरणा {आधीच अवांतरः}हे विडंबन नाही{अवांतर संपलं} हे जीवन आहे नश्वर हे जगत आहे नश्वर आधार एकच असतो नाम त्याचे (विसोबा) खेचर आयई असो वा फाफॉ क्लिक मिपालाच मिळत असते लेखाकडून प्रतिसादाची वाट चालत असते प्रतिसादातून माणसांची ओळख होऊन जाते त्यांची असलेली ओळख सदा मित्र नामे रहाते मैत्रीतूनच रट्टे-कट्टे स्त्रावित होत जातात मगच त्यातून संवाद आकार घेत जातात आता मिसळ हापसण्यातच वैराग्य माझे संपले पण अवांतराचे बीज डोक्यात माझ्या उरले आता व्यस्त अदिती संगणकाशी जाईल प्रतिसाद द्या वर क्लिक करुन पुन्हा शांत राहिल.

पाठीराखा (ही नवीन कविता आहे)

लेखक द्विज यांनी बुधवार, 19/11/2008 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
पाठीराखा हे जीवन आहे नश्वर हे जगत आहे नश्वर आधार एकच असतो नाम त्याचे ईश्वर कुठे ना कुठे हा आत्मा त्यालाच मिळत असतो शून्यातून शुन्याकडची वाट चालत असतो विश्वातून परमातीताची ओळ्ख होऊन जाते त्याच्या हाकेशी दिलेली साद 'जीवन' नामे स्फुरते विवेकातूनच चैतन्य स्त्रावित होत असते मगच "अह॑ ब्रम्हास्मि " बोधाने मन प्लावित होत असते पदकमला॑मधेच त्याच्या सुख माझे उरले भौतिकतेचे तामस मनातूनी सरले आता मुक्त आत्मा परब्रम्हापाशी जाईल प्रभू माझा पाठीराखा मला घ्यावयासी येईल....
Taxonomy upgrade extras