Skip to main content

काम

लेखक निमीत्त मात्र यांनी शनिवार, 15/11/2008 07:33 या दिवशी प्रकाशित केले.
काम करणं अथवा न करणं हा ज्याचा त्याचा प्रश्‍न असतो. अर्थात काम करणारे आणि काम न करणारे असे समाजात ढोबळ मानाने दोन गट असतात. परंतु एवढ्या ढोबळ वर्गीकरणातून हा विषय पूर्ण होऊ शकतो असं मला वाटत नाही. काम करणाऱ्या गटात अनेक उपगट असतात. आवडीनं काम करणारे, मनाविरुद्ध काम करणारे, काम एन्जॉय करणारे, मन मारून काम करणारे, सदा हसतमुख काम करणारे, रडत रडत काम करणारे, वेगानं काम करणारे, हळूहळू काम करणारे, आपणहून भरपूर काम करून नंतर त्याचीच तक्रार करणारे, केलेल्या कामाचा मोठा गाजावाजा करणारे, गुपचूप कामाचा डोंगर उपसूनही हूं की चूं न करणारे, आपलं काम करून इतरांचंही काम करणारे, आपल्यापुरतं काम करणारे....

आल्प्सच्या कुशीत..

लेखक दिनेश यांनी शनिवार, 15/11/2008 03:31 या दिवशी प्रकाशित केले.
१. योहानाच्या हॉलिडेहोममधून दिसणारा नजारा २. योहानाच्या घरचा नाश्ता येथेच मिपाकर नाश्ता 'जेवले ' असे म्हणतात. ३. रोपवे साठी चढून जाताना एका वळणावरुन दिसणारे दृश्य ४.

राजकुमार (?) साठ वर्षांचा झाला!

लेखक आनंद घारे यांनी शनिवार, 15/11/2008 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
"परीकथेतिल राजकुमारा स्वप्नी माझ्या येशिल कां ? भाव दाटले मनी अनामिक साद तयांना देशिल कां ?" अशी अस्फुट लकेर नवयौवनांत प्रवेश केलेल्या मुलींच्या मनात उठत असते. बालपणी वाचलेल्या परीकथांमधले राजकुमार झगमगते चिलखत अंगावर चढवून, रत्नजडित मुकुट डोक्यावर धारण करून, अबलख घोड्यांवर स्वार होऊन दौडत येतात, हातातल्या समशेरीने दुष्ट चेटकिणीला मारून तिच्या तावडीत सापडलेल्या राजकुमारीची मुक्तता करतात आणि तिला आपल्यासोबत घेऊन जातात. हे झाले परीकथेतले राजकुमार. आजच्या जगातला एक प्रत्यक्षातला राजकुमार जन्माला आला तेंव्हा त्याचे आजोबा जगातल्या सर्वात मोठ्या साम्राज्याचे सम्राट होते.

हॅप्पी चिल्ड्रेन्स डे...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 15/11/2008 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
दुपारची वेळ. रिक्षा पकडून मी स्टेशनवर आलो, आणि गाडीची वाट पाहात फलाटावर थांबलो. पुढची हकीकत, मी जसं पाहात गेलो, तशीच्या तशी तुम्हाला सांगणार आहे... ...अंधेरीच्या गजबजलेल्या रेल्वे स्टेशनवरचा सहा नंबरचा प्लॅटफॉर्म नेहमीसारखाच गर्दीनं खचाखच भरलेला. लांबून ट्रेन येताना दिसली, आणि मी मोबाईलवरचं मुलीशी बोलणं आटोपतं घेतलं. आज तिच्या शाळेत "चिल्ड्रेन्स डे' साजरा झाला होता. खूप मजा केली होती मुलींनी. आज शाळेतल्या सगळ्या शिक्षिकांनी मुलींसाठी करमणुकीचे कार्यक्रम केले.

प्रत्येक व्यक्ती सन्मानाला पात्र असते.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 14/11/2008 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रो.देसाई खूप दिवसानी आपल्या नवीन मित्राबरोबर तळ्यावर आले होते.माझी ओळख करून दिल्यानंतर आम्ही नेहमी प्रमाणे इकडच्या तिकडच्या गप्पा करायला सुरवात केली.त्यांचा हा माझा नव्याने ओळख झालेला मित्र आपली नोकरीत असतानाचे काही अनुभव सांगण्याच्या ओघात एका मजेदार किस्याला त्यानी हात घातला.ते एका सॉफ्टवेअर कंपनीचे सि.इ.ओ होते ते ओघाओघाने मला कळलं. ते म्हणाले, "कामानिमीत्त मी एका शहरातून दुसर्‍या शहरात जाताना बरेच वेळा त्या कंपनीची गाडी येऊन मला त्यांच्या मिटींगच्या जागी घेऊन जायची.पण कधी कधी मला एअरपोर्टवरचीच टॅक्सी करून जावं लागायचं.असंच एकदा बंगलोर एअरपोर्टवर टॅक्सीत बसल्यावर ड्राईव्हर बरोबर हलो-ह

मसूराची आमटी

लेखक चित्रा यांनी शुक्रवार, 14/11/2008 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
टीप -ही आमटी एकदा आमचे एक घराचे स्नेही श्यामराव म्हणून होते त्यांनी माझ्या लहानपणी हौशीने आमच्या घरी येऊन केली होती असे आठवते. आमच्या आजीचे अनेकांशी घरातल्यासारखे संबंध होते, त्यातील हे एक. त्यांच्याबरोबर त्यांच्या घरची मंडळीही कधीकधी येत. बाहेरची बरीच मंडळी आली की घाउक प्रमाणावर करता येतील असे पदार्थ आमच्या घरी होत. तेव्हा मी फारच लहान होते (८-९ वर्षांची) त्यामुळे सर्व जिन्नस माहिती करून घेतले नसणार याची खात्री आहे. त्यानंतर त्या आमटीत थोडेफार बदल करून आमच्या घरी ती होतच राहिली. पूर्वी आमच्या गावी घरोघरी सायकलवर ब्रेड विकायला एक ब्रेडवाला येत असे.

शीर्षक

लेखक ब्रिटिश यांनी शुक्रवार, 14/11/2008 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
मीपावरच्या काही लेखांची मी वाचलेली शीर्षके १. माझा बाप नवीन २. नंदावैनी नवीन ३.मीसळपावचा सेवाप्रदाता नवीन ४. शिवरायांची वंशावळ नवीन ५. कोणी आहे का नवीन ६. छंदशास्त्र नवीन ७. ओबामा अध्यक्ष झाले नवीन ८. बरेच काही नवीन ९. मुलीला आपली आई माहित असायला हवी नवीन १०.माझी विठ्ठ्ल माऊली नवीन ११.विप्रना एक प्रश्न नवीन १२.लक्ष्मी नारायण नवीन १३.भोक नवीन मिथुन काशिनाथ भोईर नवीन

गुन्हा आणि शिक्षा

लेखक लिखाळ यांनी शुक्रवार, 14/11/2008 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, गुन्हा आणि शिक्षा यावर गेले काही दिवस माझ्या मनात विचार येत आहेत. मिपाकर या विषयी त्यांची मते मांडतील तर मला मदत होईल. श्री. बिपिन कार्यकर्ते यांनी लिहिलेल्या त्यांच्या एका अनुभवकथना नंतरच्या प्रतिसादांत 'ऑनर किलिंग' बद्दल प्रतिसाद आले. एखाद्या स्त्री अथवा पुरुषाला समाज दोषी ठरवून अतिशय कठोर अशी शिक्षा देतो. त्या शिक्षांचे प्रकार वाचून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते प्रकार अमानुष, असंस्कृत आहेत असे म्हटले. खरोकरच माणसाला मारण्याचे ते प्रकार वाचून मन सुन्न होऊन जाते.

इयत्ता ३री ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्याना गणित विषयासाठी उपयुक्त वेब लिंक

लेखक शनआत्तार यांनी शुक्रवार, 14/11/2008 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
इयत्ता ३री ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्याना गणित विषयासाठी उपयुक्त अशा ६० वेब लिंक प्रकरणानुसार या लेखात दील्या आहेत You mentioned yesterday your high workload having taken up 3 Std 10tth classes of 0ver 160 students. You had asked for help with relevant website content. There are over 60 links below from my research on math related content on the internet. This could give you MUCH MORE than you really need, but I think you should have it.

पत्र मिळेल काय?

लेखक सुनील यांनी शुक्रवार, 14/11/2008 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या मटामधील प्रकाश बाळ यांचा लेख. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3710606.cms यात व्यक्त झालेल्या मतांवर चर्चा करता येईलच परंतु सध्या मला इच्छा आहे ती यात उल्लेखलेले सरदार पटेल यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांना लिहिलेले पत्र. कुणाकडे याचा दुवा / प्रत आहे काय?