Skip to main content

रिक्त

लेखक स्वाती फडणीस यांनी रविवार, 11/01/2009 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
रिक्त ========================= . . काही शब्द.. नुसते, आतल्या आत उकळत राहतात.. उतूच जात नाहीत. रटरटत्या पाण्यासारखे.. नुसती वाफ होत राहते.. साठलेल्या भावांची.. चरचरत.. शेवटचा थेंब उडून जाई पर्यंत. पात्राला फक्त जाणवत राहत.. रिक्त होण्या आधीच.. वाफाळ रटरटणं..! . . ========================= स्वाती फडणीस ..... ११-०१-२००९
Taxonomy upgrade extras

यशदा

लेखक स्वाती फडणीस यांनी रविवार, 11/01/2009 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
यशदा ============================ . . ती म्हणाली.. मी समर्पित आहे.. माझ्या इच्छा.. माझे विचार.. माझ्या स्वप्नांसकट. इतकी की आता माझी मला ही मी सापडत नाही. . ती म्हणाली.. मी सुखात आहे.. माझ्या इच्छा.. माझे विचार.. माझ्या स्वप्नांशिवाय. इतकी की आता दुःख माझ्या आसपास फिरकत नाही. . ती म्हणाली.. मी यशदा आहे.. माझ्या इच्छा.. माझे विचार.. आणि माझ्या स्वप्नांची. इतकी की आता अपयश माझ्या नजरेस पडतच नाही. . . ============================ स्वाती फडणीस ............................ १०-०१-२००९

तात्या!

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 11/01/2009 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
भिकाजी हरी पेंढारकर. म्हणजे माझे आजोबा. आम्ही त्यांना "आजोबा'च म्हणायचो, पण प्रचलित नाव, तात्या. नाव कशावरून पडलं, ठाऊक नाही. मला कळायला लागलं, तेव्हापासून मी त्यांना कष्ट करतानाच पाहत आलोय. माझ्या लहानपणी ते आमच्याजवळच रत्नागिरीला होते. काकांचा मुलगा लहान असल्यानं आजी डोंबिवलीला राहायची. अधूनमधून रत्नागिरीत यायची. आजोबा आणि आजी दोघंही कष्टाळू. आजीला स्वयंपाकाची हौस, तर आजोबांना बाहेरच्या कष्टाच्या कामांची. नारळाच्या झावळा पडल्या, की त्या तोडून पाती काढून ठेवायच्या. मग त्याचे हीर काढायचे आणि केरसुणी तयार करायची. केरसुणी बांधायला शिकावी, तर आजोबांकडून!

कलाकार

लेखक पंचम यांनी रविवार, 11/01/2009 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
कलाकार
मला कोण म्हणून विचारतात ते, मी एक कलाकार आहे.. तुमच्यातलाच एक चेहरा, तुमच्यातलाच एक विचार आहे; सर्व बंध तोडून मी, झेप घेतो आकाशात.. उरुन राहतो कोठेतरी, तुमच्या ओझरत्या स्पर्शात; मी स्वर आहे भैरवीचा, कधी मल्हाराची तान.. कधी भिजरी पायवाट, कधी रखरखणारे रान; मी स्पर्श आहे, मी भाव आहे.. मी तुमच्याच ओळ्खीचे, अनोळखी नाव आहे; मी एक रंग आहे, कधी तुम्हीच रंगविलेला.. रंगमंचाच्या शुभ्रपटावर, मुक्त उधळलेला; होउनी सात रंग, स्वतःला सांधतो
Taxonomy upgrade extras

भुकेचा आग डोंब

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 11/01/2009 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
भुकेचा आग डोंब दुपारचे १२.३० वाजुन गेले होते..गोदा जिना चढत होति. ऊन मी म्हणत होते..पोटात भुकेचा आग डोंब उसळला होता काल् रात्री १ वाजेपर्य्ंत् ति वाट् पहात् होति..गि~हाईकाचि १२ चा सीनेमा सुटला होता..वाटल् येईल् एखादा.. पण् कुणीच् फिरकल् नाहि.. कालपासुन अन्नाचा एक कण पोटात नव्हता.. राजादादाला २ महिन्याची जेल झाली अन तिचे दिवस फिरले. तो जेल जाण्या आधी हप्त्यातन ३ वेळा तरी यायचा..पैस पण बरा द्यायचा. तो सुटलाय अस कानावर आल होत..ति वाट बघत होति त्याची. गिऱ्हा‌ईक येत नव्हत...धंदा होत नव्हता...उधारी झाली होति.. कुणीच उधार द्यायला तयार नव्ह्त..घरवालीला पैसे मागयची सोय नव्ह्ती.. २हजार रु अंगावर होते...

माझा फोटोशॉप पणा...

लेखक रेवा यांनी रविवार, 11/01/2009 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
काचेचं फुलपाखरु करण्याचा प्रयत्न आहे. जमलय का? सुचनांचे स्वागत आहे.

'गिंप' सोबत खेळण्याचा एक प्रयत्न.

लेखक घाटावरचे भट यांनी शनिवार, 10/01/2009 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याकडे हे जास्वंदीच्या फुलाचे साधारण छायाचित्र होते. फारसे काही आकर्षक वाटत नव्हते. त्याच्यासोबत गिंप वापरून थोडी छेडछाड केली आहे.
कसे वाटते ते कळवावे. (हे फूल स्वेटर घातलेल्या गणपतीबाप्पाच्या चरणी अर्पण!) - भटोबा