Skip to main content

गुळाच्या पोळ्या

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 12/01/2009 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
संक्रान्ति निमित्त गुळाच्या पोळ्या केल्या पण त्या कडक न होता..मऊ झाल्या..कडक होण्यासाठि काहि खास टिप्स मिळु शकतिल का?..कुठे नेमके चुकले तेच कळत नाहि

हंस उडू पाही...

लेखक नीधप यांनी सोमवार, 12/01/2009 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्राचा पहारा आभाळाचे कायदे हंस उडू पाही अवघड इरादे अशी दरी खोल असे उंच कडे आभाळापल्याड झेपावती झाडे वारा सैरभैर, वेडी लाट फुटे धिटाईने घुसे कुणी एकटे एकटे लावले कुलुप, बंद केली दारे आतला हुंकार तरीही थरारे
Taxonomy upgrade extras

छोटु

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 12/01/2009 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळचे साडे सात वाजले होते. मी आणि चिरंजिव दोघेही जायच्या गड्बडीत होतो. बायकोने द्रोणाच्या इड्ल्या केल्या होत्या. बेल वाजली. मी टी पॉय वरचा ब्रेकफास्ट न आवरताच चुकुन दरवाजा उघडला. बघतो तर समोर दरवाजात शेजारीण उभी. बरोबर अडीच वर्षाचा छोटू. दरवाजा उघडताच छोटुने लगेच आक्रमण केले. आणि सोफावर विराजमान झाला. प्लेट मधील द्रोण बघताच 'माला पन पाय्जे' चा घोष सुरु झाला. बायको बाहेर आली. "एवढ्या सकाळी आजोबा जेवतात" शेजारणीने बॉम्ब टाकला. आता सहा द्रोण अधिक वाटीभर चटणी आणि चवीला सांबार व ताजे लोणी ह्याला काय जेवण म्हणतात. असो. बायकोने छोटुला सुद्धा एक द्रोण आणला. 'माला पण आजोबा एवदे पायजे' इती छोटू.

विश्वजाल आणि कर्बवायूचे उत्सर्जन

लेखक लिखाळ यांनी सोमवार, 12/01/2009 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आजच सकाळी पेपरात वाचले की गुगल मुळे कर्बवायुच्या उत्सर्जनात भर पडते आणि एकदम अश्चर्य वाटले. ती बातमी बीबीसीच्या स्थळावर वाचता येईल. एका अमेरिकन शास्त्रज्ञाने केलेल्या पाहणीनुसार आपण एकदा गुगलवापरुन शोध घेतला की ७ग्रॅ कर्बवायूची भर वातावरणात पडते. गुगलच्या प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार सांगीतला गेलेला हा आकडा फार मोठा असून तो वास्तवात केवळ ०.२ग्रॅम इतकाच आहे. बातमीमध्ये, अमेरिकन संशोधकांच्या मते सध्या आयटीचा जागतिक कर्बवायू उत्पादनात २ टक्क्याचा वाटा आहे. तो आकडा वास्तविक काहिही असो.

नेहरू

लेखक नितिन थत्ते यांनी सोमवार, 12/01/2009 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
नेहरूंबद्दल लिहावे अशा सूचनेवरच इतके प्रतिसाद आले तर प्रत्यक्ष लिहिल्यावर काय होईल कोण जाणे. काही मिपाकरांनी प्रतिसादांचा रोख स्पष्ट केलाच आहे. काहींनी गुगळून चित्रेही मिळवली आहेत. असो... मी जे लिहिणार आहे ते त्यांच्यावर गांभीर्यानॅ घेतल्या जाणार्‍या आक्षेपांच्या सन्दर्भाने लिहिणार आहे.

( निवडणुकीचा एक दिवस )

लेखक अमोल केळकर यांनी सोमवार, 12/01/2009 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
ज्ञानदा कुलकर्णीं यांची एक दिवस ही सुंदर कविता नव्या रुपात निवडणुकीचा एक दिवस ... लढु द्या मला मतांसाठी... तो दिवस राखून ठेवलाय मी माझ्या प्रभागातले बुथ लुटण्यासाठी तो दिवस राखून ठेवलाय मी माझ्या विरोधकांवर कुरघोडीकरण्यासाठी मी नसेन आता एकटा काही पाचेक वर्षांसाठी दुसरे कोणीही असले सोबत 'ते' मंत्रीपद उपभोगान्यासाठी इच्छा नाही मला त्या नंतर समाजसेवा करण्याची इतरांसाठी इच्छा नाही मला share करण्याची ते टेंडर कोणाही सोबत जे मी lock केले असतील बिल्डरांसाठी पण आता थोडीच वाट पहायची मला त्या दिवसाची आता प्रत्य

मेरीची डायरी

लेखक मूखदूर्बळ यांनी सोमवार, 12/01/2009 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
डीसूजाने सिगारेट विझवली. कंटाळा आला म्हणून. देवापूढे मेणबत्ती लावली. ते सुद्धा एक कर्तव्य म्हणून. मेरी लावायची म्हणून. मेरीला आपण भकाभका सिगारेटी ओढतो ते बिलकूल आवडायच नाही. आणि ती चिडते म्हणून आपण मुद्दाम ओढायचो तिच्या समोरच. तिच्या अंगावर धूर सोडत. मग तिला खोकल्याची उबळ यायची. डोळ्यातून पाणी काढत खोकायची. रागावून लटकी चापट मारायची. आपण तिला जवळ घ्यायचो तिच्या खोकून ताज्या मधासारख्या गालावर हात फिरवायचो. ती झिडकारायची पण तीला ते आवडत असणारच. डीसूझाला अप्र्रूप वाटल. चांगला ३ वर्ष संसार केला आपण मेरी बरोबर. पण तिचा एकही गुण आपल्याला कसा लागला नाही.

काही टीप्स....

लेखक पर्नल नेने मराठे यांनी सोमवार, 12/01/2009 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
काही टीप्स.... १) इड्ल्या उरल्या असतील तर दुसरया दिवशी त्याना तिखट, मीठ लावुन फ्रायपॅन वर तेल घालुन फ्राय कराव्यात. सॉस बरोबर खायला द्याव्यात. सुन्दर लागतात. २) शिळा भात फ्रिज मधे ठेवुन कडक होतो. ताजा भात कुकरला लावताना हा कडक झालेला भात मोकळा करुन त्यावर पेरावा.

पांडवकडा अन्‌ आम्ही..

लेखक दिपक यांनी सोमवार, 12/01/2009 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
माझे मिपावरचे पहिलेच लिखाण आहे. चुका सांगाव्यात सुधारणा सुचवाव्यात. पहिलावाहिला प्रयत्न आहे सांभाळुन घ्या :) कालच लोकसत्तेत "नायगरा फॉल्समधुन सुटका" ही लघुकथा वाचली आणि पांडवकड्यावर आलेल्या भयानक प्रसंगाची आठवण झाली. चार वर्षापुर्वीची गोष्ट आहे. पावसाळ्यात कुठेतरी भटकंतीला जायचं हा आमचा मित्रमंडळीचा ठरलेला कार्यक्रम. माथेरान, लोणावळा अशी ठिकाण करुन कटांळा आला होता. वॉटरफॉलला जायचं हे नक्की ठरलेलं. त्यामुळे लोणावळ्याच्या किंवा खडवलीच्या कुठल्यातरी वॉटरफॉलला जाऊ असा वाद चालला असता एकाने खारघरच्या पांडवकड्याचे नाव सुचवले. आमच्यापैकी तिथे कुणी गेलं नव्हतं.