Skip to main content

संक्रांत कशासाठी

लेखक भास्कर केन्डे यांनी बुधवार, 14/01/2009 07:36 या दिवशी प्रकाशित केले.
संक्रांत म्हटलं की तीळ-गुळ, तिळाचे लाडू, तीळ लावलेल्या भाकरी, वाला-वांगी-पेरु-बोर वगैरे भाज्यांच्या रसरशीत व खमंग गावराण जेवणाचा अस्वाद, सुवासिनिंचे हळद-कुंकवाला एकमेकींकडे जाणे येणे, आवा लुटणे, नवीन सुगड्यात बोरे, चिंचा, उसाची कांडे भरुन त्यांची पुजा करणे, चिल्या-पिल्यांचे बोर न्हाण, पतंगांच्या भरार्‍या... ही सगळी लगबग डोळ्यासमोर येते. मला मात्र एक गोष्टीची गंमत वाटते. आजकालच्या संक्रांतीची भेटकार्डे व शुभेच्छापंत्रांत तिळ-गुळाचा भरपूर उधो-उधो होतो. पण त्यासारख्याच किंबहुना त्याही पेक्षा महत्वाच्या सांस्कृतीक गोष्टींकडे मात्र आपण पाहिजे तेवढे लक्ष देत नाही.

लालजी देसाईंचे (पु लंच्या रविवार सकाळ मधले गायक) निधन

लेखक मिसळपाव यांनी बुधवार, 14/01/2009 06:39 या दिवशी प्रकाशित केले.
मित्राकडून बातमी मिळाली की लालजी देसाई गेले. पु लंच्या 'रविवार सकाळ' मधे अतिशय बहारदार गाणं असायचं त्यांचं. थोड्याशा भीमसेनांच्या ढंगात ते 'उगीच का कांता' असं काही सुरेख रंगवतात की व्वा! श्रीकांत मोघेने थोडा वात्रटपणा केल्यावर लालजी, 'कांSSS ता SSSSSS' अशी नाजुक हरकत घेतात नी श्रीकांत मोघेंची 'अग आई ग' अशी दाद जाते !! कींवा 'धरणीSSSSS' म्हणून ठासून दाखवतानाचा आवेश, कानडी ढंगात गायला सुरूवात केल्यावर त्याच 'धरणीSSSSसंग'ला 'वा..वा..वा' अशी श्रीकांत मोघेंची मॅचिंग दाद.....छे.

एक निवेदन

लेखक कोलबेर यांनी बुधवार, 14/01/2009 02:50 या दिवशी प्रकाशित केले.
आम्हाला आत्ताच हाती आलेल्या धक्कादायक माहिती नुसार आमचे मिसळपाव वरील स्नेही श्री.अजानुकर्ण ह्यांचे खाते उडवल्याची माहिती मिळाली. श्री. अजानुकर्ण हे मिसळपाव द्वेष्टे अथवा मिसळपाव कंटक असल्याने त्यांचे खाते उडवलेले दिसते. तसे असेल तर ते अगदी योग्य आहे. परंतू ते एक ज्येष्ठ सभासद देखिल होते आणि कोणत्याही आगाऊ सुचने शिवाय त्यांचे खाते उडवले जात असेल तर 'मिसळपाव कंटक' किंवा 'मिपाद्वेष्टे' बनु नये म्हणून काय खबरदारी घ्यावी ह्याची स्पष्ट कल्पना कृपया मिपा व्यवस्थापन/ संचालक/ संपादक ह्यांनी द्यावी अशी नम्र विनंती. श्री.

ही कुठली "गिरी" बरं?

लेखक विकास यांनी बुधवार, 14/01/2009 02:49 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच रेडीफ.कॉम वर एक बातमी वाचली. त्याप्रमाणे पांढरे कबुतर(डोव्ह) असलेले एक भेटकार्ड नविन वर्षाच्या शुभेच्छांसहीत पंतप्रधान मनमोहनसिंग आणि त्यांच्या पत्नीने सही करून पाकीस्तानी पंतप्रधानांना पाठवले. ही वरील बातमी वाचल्यावर प्रश्न पडला की हक्की नक्की कोणती गिरी आहे? - गांधीगिरी, मुन्नाभाई गिरि आहे का मनमोहन गिरी आहे ते. तुम्हाला काय वाटले बातमी वाचून?

वैद्यकात वस्तुनिष्ठता

लेखक धनंजय यांनी बुधवार, 14/01/2009 01:39 या दिवशी प्रकाशित केले.
हल्लीच "अतींद्रिय शक्ती" या लेखात डॉ. दाढे यांचा प्रतिसाद वाचला. वैद्यकशास्त्रात खूप काही अगम्य असते याबाबत मी त्यांच्याशी सहमत आहे. परंतु त्या योग्य विचारांबरोबर त्यांनी वैज्ञानिकांच्या अहंमन्यतेबद्दल निष्कर्ष काढला होता. अहंमन्यता आणि वस्तुनिष्ठता यांच्यात पुष्कळदा गल्लत होते, असे मला वाटते. त्यावरून मागे रेडियोवर ऐकलेली एक मुलाखत आठवली. डॉक्टर रेचल नेओमी रेमेन या श्रद्धेबाबत, डॉक्टर-पेशंट संबंधाबाबत डॉक्टराने जागरूक असण्याबाबत मुलाखत देत होत्या. या सर्व बाबतीत मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो.

संक्रांती

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 14/01/2009 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
पुरे जाहले "केश्या" मेल्या सोड अता ही निवृत्ती तुला न जमणे गप्प बैसणे ही न तुझी रे प्रवृत्ती तू गेल्यावर 'ब्याद टळाली' कुजबुजले हे जालकवी तू गेल्यावर आणि निघाल्या तुझ्या किती या आवृत्ती 'कट्टे' झाले, 'हल्ले' झाले, नि झाले 'नेहरू' 'गांधी' 'शिल्पे' झाली, 'चर्चा' झाल्या आणिक जळजळ 'भटकंती' कौल लावले कुणी फुकाचे, चित्रे संगणकी कोणी बक्कळ झाली भाषांतरे , अन प्राण्यांच्या पाककृती परीक्षणे आली शिणमांची, अन पडली व्यक्तिचित्रे दिसू लागल्या 'अर्ध्या चड्ड्या' अन 'स्वेटर' अवतीभवती जुनी स्थळे नि नवीन खोड्या, अजीर्ण झाले 'विषया'चे लैंगिकता अन समोपदेशन, वाचून झाली गुंगमती येतो आम्ही घडीभर

लिट्‌ल चॅम्प्स आणि `बिग' प्रश्न...

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 14/01/2009 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
आपण पहिलेछूट सांगतो,की झी टीव्ही, सारेगमप कार्यक्रम, त्यावरचे सगळे छोटे-मोठे स्टार, कार्यक्रमाचे अमाप आणि अफाट चाहते, यांच्याबद्दल आपल्या मनात जराही वैरभाव नाही. कार्यक्रमाच्या, कलाकारांच्या दर्जाविषयी, प्रेक्षकांच्या आकलनशक्तीविषयी मनात जराही किंतु नाही. तरीही काही प्रश्‍न पडतात. ते या निमित्ताने मांडण्याचा प्रयत्न... स्पर्धेत राहिलेले सगळेच लिट्‌ल चॅम्प्स आता अंतिम (महामहा की काय ती) फेरीत गाणार आहेत. सारेगमपच्या विश्‍वात इतिहास घडविणारा निर्णय म्हणून परीक्षकांचा निकालही यावेळी 50 टक्के निर्णायक आहे.

कळण (अत्यंत पौष्टिक)

लेखक समिधा यांनी मंगळवार, 13/01/2009 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
विवरण: हि पाकृ. खूप पौष्टिक आहे कारण कळण हे मटकी शिजवलेल्या पाण्या पासुन केले जाते आणि मटकी शिजवल्यावर त्यातिल सत्व पाण्यात राहते.

हा फोटो कुणाचा? ( जाहीर अज्ञान !)

लेखक संदीप चित्रे यांनी मंगळवार, 13/01/2009 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाच्या मुख्यपानावर दिसणारा फोटो कुणाचा आहे? (माधुरी दीक्षितचा नक्की नाहीये !!) ------ त्या फोटोचा आणि यमन रागाचा काय संबंध / काही संबंध आहे का?

संक्रांत!

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 13/01/2009 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
"हे ऽऽ काऽऽऽप्पेऽऽऽ" असं बेंबीच्या देठापासनं ओरडत, उन्हानं तावलेल्या लालबुंद चेहेर्‍यानं गच्चीवरुन धावत जायचं आणि अनवाणी पायांना चटके बसत असले तरी गच्चीवरल्या कुंभीवर चढून कापला गेलेला पतंग कोणत्या पोरांचा होता हे टाचा उंच करुन शोधायचं हे दृश्य आता माझ्यासाठी तरी इतिहासजमा झालं आहे. जानेवारी महिना आला तरी थंडी सुरुच असायची पण सकाळी-सकाळी उन्हात एकप्रकारचा प्रेमळ उबदारपणा जाणवायला सुरुवात झालेली असायची. संक्रांतीआधी तीनचार दिवस आम्ही मित्रमंडळीचा एककलमी कार्यक्रम पतंग बनवणे आणी मांजा सुतवणे. त्याची तयारी सुद्धा साग्रसंगीत असायची. आधी बाजारात जाऊन मजबूत धागा असलेला दोरा घेऊन येणे.