आपण पहिलेछूट सांगतो,की झी टीव्ही, सारेगमप कार्यक्रम, त्यावरचे सगळे छोटे-मोठे स्टार, कार्यक्रमाचे अमाप आणि अफाट चाहते, यांच्याबद्दल आपल्या मनात जराही वैरभाव नाही. कार्यक्रमाच्या, कलाकारांच्या दर्जाविषयी, प्रेक्षकांच्या आकलनशक्तीविषयी मनात जराही किंतु नाही. तरीही काही प्रश्न पडतात. ते या निमित्ताने मांडण्याचा प्रयत्न...
स्पर्धेत राहिलेले सगळेच लिट्ल चॅम्प्स आता अंतिम (महामहा की काय ती) फेरीत गाणार आहेत. सारेगमपच्या विश्वात इतिहास घडविणारा निर्णय म्हणून परीक्षकांचा निकालही यावेळी 50 टक्के निर्णायक आहे. सगळीच क्रांती एका कार्यक्रमातून होत आहे.
तरी पण खरं सांगा दोस्तहो, मुग्धा, आर्या, प्रथमेश, कार्तिकी आणि रोहित सगळे अप्रतिम, अफाट, चाबूक वगैरे गातात, एवढ्या वयात त्यांची प्रतिभा, तयारी म्हणजे पायाचं तीर्थ घ्यावं इतकी आहे, हे सगळं कबूल. पण खरंच, जुन्या अत्युच्च उंचीच्या गायकांची गाणी त्यांच्या बालवयीन आवाजातून ऐकायला किती काळ बरी वाटतात हो? ते वयाच्या मानानं अप्रतिम गात असतीलही, पण जे गाणंच वयस्कर किंवा प्रौढ व्यक्तीचं आहे, ते या लहानग्यांच्या आवाजात ऐकायला खरंच गोड वाटतं? आणि किती काळ? बरं, त्यांना त्यांच्या पद्धतीनं गाणं गायचीही परीक्षकांची परवानगी नाही. अभिषेकीबुवांनी अमूक ठिकाणी तमूक हरकत, तान घेतली आहे, म्हणून त्यांनी पण तसंच गायचं. किंवा जयश्रीबाई अमूक गाण्यावर ढमूक ठिकाणी मुरका घेतात, म्हणून मुग्धा किंवा आर्यानंही तिथे तसाच घ्यायचा! (जयश्री गडकर गायिका नव्हत्या आणि आशा भोसले त्या गाण्यात पडद्यावर नाहीत, याचा बहुधा परीक्षकांना सोयीस्कर विसर पडत असावा!!)
आणखी किती गाणी गायली की या लिट्ल चॅम्प्सला अढळपद मिळणार आहे? किंवा प्रेक्षकांचं, झी टीव्हीचं, परीक्षकांचं आणि या स्पर्धकांच्या आईवडिलांचं समाधान होणार आहे? आणि महत्त्वाचं म्हणजे, सारेगमप संपल्यानंतर त्यांना पुढची दहा-बारा वर्षं कोण विचारणार आहे आणि कशाच्या जोरावर?
वाचने
1936
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्यांना बालपण जगू द्या रे !!
पण खरंच,
आपल्या
आणि