Skip to main content

संक्रांती

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 14/01/2009 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
पुरे जाहले "केश्या" मेल्या सोड अता ही निवृत्ती तुला न जमणे गप्प बैसणे ही न तुझी रे प्रवृत्ती तू गेल्यावर 'ब्याद टळाली' कुजबुजले हे जालकवी तू गेल्यावर आणि निघाल्या तुझ्या किती या आवृत्ती 'कट्टे' झाले, 'हल्ले' झाले, नि झाले 'नेहरू' 'गांधी' 'शिल्पे' झाली, 'चर्चा' झाल्या आणिक जळजळ 'भटकंती' कौल लावले कुणी फुकाचे, चित्रे संगणकी कोणी बक्कळ झाली भाषांतरे , अन प्राण्यांच्या पाककृती परीक्षणे आली शिणमांची, अन पडली व्यक्तिचित्रे दिसू लागल्या 'अर्ध्या चड्ड्या' अन 'स्वेटर' अवतीभवती जुनी स्थळे नि नवीन खोड्या, अजीर्ण झाले 'विषया'चे लैंगिकता अन समोपदेशन, वाचून झाली गुंगमती येतो आम्ही घडीभर येथे विसरण्या दुःखे अमुची परंतु येथे सुरू भांडणे, नि गंभीर कविता वरती किती वाचावे दुःख वेदना ओढून तरी चेहरा पुरे जाहल्या कविता गंभीर लाव त्यांना तू बत्ती 'सात्त्विक थाळ्या' पुरे आता लावा 'भेळेची गाडी' बाप बाटली लाथा बुक्क्या अन "केश्या"ची कंबख्ती घाल पुन्हा धुडगूस जाली लोकांना हसू दे थोडे आम्हा सांगती 'अतींद्रिये', सोडशील तू निवृत्ती लाग "केशवा" कामाला तू पुरे जाहली विश्रांती नमन करुनी सर्व कवींना करू साजरी संक्रांती केशवसुमार
लेखनविषय:

वाचने 5794
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

केसु !! लाग "केशवा" कामाला तू पुरे जाहली विश्रांती नमन करुनी सर्व कवींना करू साजरी संक्रांती वेलकम ब्याक !!! तिळगूळाची गोडी वाढली ! -- सर्किट

In reply to by अवलिया

ज ह ब ह रा पुनरागमन! अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शॉल्लीड... एका दगडात दोन पक्षी ऐकले होते. रजनीकांत काही जास्त मारू शकतो. एका कवितेत इतके एका दमात हाणायचे म्हणजे कमाल आहे :D

अहो किती वाट पहायची आम्ही? :W जर्मनीतल्या खनिजांच्या बर्फाळ गुंफेत आपण निद्रिस्त आहात असे कळल्याने आमची झोप उडाली होती!! :O आज संक्रांतीच्या मुहूर्तावर आपले आगमन झाले आम्ही धन्य झालो! =D> 'सात्त्विक थाळ्या' पुरे आता लावा 'भेळेची गाडी' बाप बाटली लाथा बुक्क्या अन "केश्या"ची कंबख्ती घाल पुन्हा धुडगूस जाली लोकांना हसू दे थोडे आम्हा सांगती 'अतींद्रिये', सोडशील तू निवृत्ती लाग "केशवा" कामाला तू पुरे जाहली विश्रांती नमन करुनी सर्व कवींना करू साजरी संक्रांती हे तर होणारच! कोई शक? (खुद के साथ बातां : रंग्या, आली आली कविजनांवर संक्रांत आली! ;) ) चतुरंग

अरे वा ! काकांचे आगमन दणक्यात ! छान छान. आता मजा येईल :) -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

केशवा, प्रत्येक ओळन् ओळ दाद देण्याजोगी! क्या केहेने भैय्या! जियो..! :) पुनरागमनाबद्दल हर्दिक अभिनंदन.. तात्या.

स़क्रांतीची ही भेट आवडली.... :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

लाग "केशवा" कामाला तू पुरे जाहली विश्रांती नमन करुनी सर्व कवींना करू साजरी संक्रांती हेच म्हणतो!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

वाह केशवराव! एकदम खल्लास कविता... कवितेत सांगितल्याप्रमाणे तुम्ही हसवलेत हे मात्र खरं! आपला, (प्रभावित) भास्कर

=D> =D> =D> =D> खूप खूप आनंद झाला........ एकदम भरपूर. केसु गुरूजी, खूप मिस केलं तुम्हाला. एकदम धडाक्यात तुमचं आगमन झालं आहे.. संक्रांत मस्त साजरी झाली आमची. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अहो किती वाट बघायला लावायची? लाग "केशवा" कामाला तू पुरे जाहली विश्रांती नमन करुनी सर्व कवींना करू साजरी संक्रांती बरे झाले तुम्हाल स्वतःलाच जाग आली ते... नायतर आम्ही खुद्द जर्मनीत येऊन, "चलो मछिंदर, गोरख आया" अशी आरोळीच द्यायचे ठरविले होते...... आता या मठाची सूत्रे तुम्ही लवकर तुमच्या ताब्यात घ्या बुवा!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

बहोत अच्छे डांबिसखान! एक नंबर बात केली आहे ! :-) केसुगुर्जी ! मजा आणली राव ! :-)

केशवसुमारांची खुपच दर्जेदार संक्रातभेट सर्व मिपाकरांना. परीक्षणे आली शिणमांची, अन पडली व्यक्तिचित्रे दिसू लागल्या 'अर्ध्या चड्ड्या' अन 'स्वेटर' अवतीभवती अचुक निरिक्षण.... ह्यावरुन लक्षात येते तुम्ही जागेपणी झोपेचे सोंग घेतले होते.मिपावर काय चालले आहे ह्याची खबरबात तुम्हां पर्यत होती तर..किती वेळ लावला तुम्ही परत एकदा धन्यवाद वेताळ

गुरुजी एकदम धडाक्यात पुनरागमन केलतं खरचं एक नं एक ओळ अव्वल दाद देण्याजोगी येतो आम्ही घडीभर येथे विसरण्या दुःखे अमुची परंतु येथे सुरू भांडणे, नि गंभीर कविता वरती एक्दम चपखल शब्द बसलेत (मनातलं लिहलतं) 'सात्त्विक थाळ्या' पुरे आता लावा 'भेळेची गाडी' बाप बाटली लाथा बुक्क्या अन "केश्या"ची कंबख्ती संक्रांतिची गोडि वाढली आणि मिसळ पुन्हा चटकदार बनणार :D (आनंदित) चेतन

गुरुजी एकदम धडाक्यात पुनरागमन केलतं खरचं एक नं एक ओळ अव्वल दाद देण्याजोगी येतो आम्ही घडीभर येथे विसरण्या दुःखे अमुची परंतु येथे सुरू भांडणे, नि गंभीर कविता वरती एक्दम चपखल शब्द बसलेत (मनातलं लिहलतं) 'सात्त्विक थाळ्या' पुरे आता लावा 'भेळेची गाडी' बाप बाटली लाथा बुक्क्या अन "केश्या"ची कंबख्ती संक्रांतिची गोडि वाढली आणि मिसळ पुन्हा चटकदार बनणार :D (आनंदित) चेतन

गुरुदेव !!! साधु संत येती घरा तोची दिवाळी दसरा !! (स्वगतः चामारी बेणं बेंच वर आलं की काय ?? रेसेशन रेसेशन ;) )

च्यायला लैच जोरदार आगमन झालं ! संस्थळावरील सार्‍या ष्टोर्‍या आल्या कवितेत :) -दिलीप बिरुटे

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासुन आभार! (आभारी) केशवसुमार