रासलीला
लाख चांदण्या लखलख करीती
आणि तारका दळे उतरती
आज पोर्णिमा उतरुन आलि
कालिंदीच्या तटी
खेळतो रास सखा श्रीहरी
भरल्या मेघा परि सावळा
मोरमुकुट शिरी मदनची दुसरा
श्रृंगाराला स्वरात भिजवी
अधरी धरुनी बासरी
खेळतो रास सखा श्रीहरी
गोप गोपिका जमले सारे
टिपरी वरती टिपरी गाजे
त्या नादाला भूलूनी आले
शिवही यमुनातिरी
खेळतो रास सखा श्रीहरी
वाळ्वंटी त्या यमुनाकाठी
रास रंगता हरी संगती
तनमन अवघे विसरुन जावे
प्रेम भरूनिया उरी
खेळतो रास सखा श्रीहरी
विषय नव्हे हा ही तर भक्ती
विसरूनी रमणे देहासक्ती
देवांनाही वेड लावते
अशी रासमाधुरी
खेळतो रास सखा श्रीहरी
Taxonomy upgrade extras
मराठीचा अभिमान मराठीची शान ! मराठी महाजालावर... - मी मराठी
मराठी भाषेच्या सर्वांगीन विकासासाठी व वाचकांना खाद्य पुरवण्यासाठी आज पासून आम्ही आमचे नवीन संकेतस्थळ मी मराठी चालू करत आहोत.
तुमचे मी मराठी नेटवर्क मराठी लोकांच्यासाठी मराठीतून भावना / कला व्यक्त करण्यासाठी हे स्थळ निर्माण करण्यात आलं आहे.
स्थळावर मराठी मध्ये लेखन करा, आपले विचार, मत तुम्ही आम्हाला admin@mimarathi.net पाठवू शकता.
आई भवानीच्या साक्षीने आहे आम्ही संकेतस्थळ चालू करत आहोत.
५ फेब्रुवारी २००९ पासून हे स्थळआनंद यादव यांच्या लिखाणावर आक्षेप?
संतसूर्य तुकाराम' कादंबरीत महाराजांची बदनामी?
साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आनंद यादव यांच्या ‘ संतसूर्य तुकाराम ’ या नव्या कादंबरीतील मजकूरामुळे वारक-यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
आयडिया सारेगम शेवटची घंटा..
त्वरा करा.. वेळ संपत आली आहे आपल्या आवडत्या लिल चॅम्प ला व्होट करण्याची. मित्रहो, क्रुपया व्होटींग लाइन्स बंद होण्यापुर्वी आपले व्होट रजिस्टर करा..
इथे ब्लॉगवर.. काही खरडलंय या विषयावर.. बघा पटतंय का..
http://tinyurl.com/cyf74d
सोळावं वरीस धोक्याचं..!
तारूण्याच्या दिशेने झुकणारे वय... सोळावे वरीस !
तरूण-तरूणींसाठी मोठ्या धोक्याचंच असतं. या वयात तरूण-तरूणी प्रेम, मैत्री या गोष्टीमध्ये विनाकारण गुरफटून जातात.
एका बाजुला अभ्यासाचा ताण व दुसरीकडे 'तो' तिच्या व 'ती' त्याच्या, आठवणीत रात्र जागून काढत बसावं लागते.
या वयात जे काही होतं ते तरूण-तरूणींनी अनुकरणातून शिकले असतात.
कारण त्यांना या गोष्टीचा फारसा अनुभव आलेला नसतो.
तरूण्याची पहिली पायरी समजणार्या सोळाव्या वर्षात स्वत:ला जेवढे जपले तेवढे कमी असते.
या वयातच तरूण-तरूणी अधिक घसरतात.
ज्याला सावरता आले़ त्याचेच करियर उज्ज्वल होते. नाही तर 'घडीचे घड्याळ' व्हायला वेळ लागत नाही.
पुस्तक हवी आहेत ?
मला काहि व्यक्तीच्या जिवनावरील पुस्तके हवि आहेत जरा मदत कराल का????
१ प्रताप्रराव गुजर
२ नेताजी पालकर
३ बहीर्जी नाईक
४ थोरला बाजीराव पेशवा
५ मस्तानी
जर कोणा मिपाकरांस या महान व्यक्तीच्या जिवनावरील पुस्तके माहित असल्यास जरा मला मदत करा
अजुन काहि असल्यास ईथे महिति द्या
नीलकांतकी चल पडी! :)
अमेरीकेत होणार्या साहित्य संमेलनाशी निगडीत मिपावर या आधीच बराच काथ्याकूट झाल्यामुळे खालील मजकूर कदाचित कुणाला मस्करी वाटू शकेल. परंतु तसे नाही. जरी मौजमजा, विरंगुळा सदरात टाकली असली तरी ही सत्यघटना आहे. देवकुळेकाकांचा नंबर आता आमच्या भ्रमणध्वनिवर आहे खरा परंतु घाईगडबडीत त्यांना मिपावर चाललेली चर्चा वाचा आणि जमल्यास खुलासा करा असे सांगायला विसरलो..! पुन्हा फोन करून सांगू की काय?! :)
राम राम मिपाकरहो,
आत्ताच आम्हाला आमच्या भ्रमणध्वनीवर, अमेरीकेत होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाच्या संदीप देवकुळेंचा दूरध्वनि आला होता.
शेराला सव्वाशेर
आर शित्याला पोलीसांनी धरलाय. जाम मारतान बग. बारक्या बातमी झेउन आला.
शित्या. सिताराम म्हात्रे. यकदम झोलर मानुस. आखोंशे सुरमा नीकालनेवाला. तो न्हेमी म्हानायचा ' ऊधारी ने वलखी वाडतात'.
गणा पाटलाची दोन येकर जमीन त्यान सात जनांना ईकलीवती. दुनीयेची ऊधारी आंगावर.
यकदा माजे घरी दोगा जनांना झेउन आला. माज घर तस रोडटच हाय. वटीवर बसवल न घरात आला .
आयला म्हनला 'लांबन आल्यात पावनं. गुळपानी दे. पाच मिन्ट बसतील न जातील.' गेला मागल्या दारानं.
धा मीन्ट जाली पंदरा मीन्ट, पावनं ऊटाया मागनात.
आय म्हनली 'बाबांनो क काम हाय क तुमच ?' तर म्हनल क 'शित्याला पाटवा.
लफडा
प्रेम बिमसब झुट.. नाटकं आहेत.. प्रेमात पडायचं कश्याला ?
हा मुर्खासारखा प्रश्न मी अनेकांच्या तोंडातून बाहेर पडताना पाहीला आहे,
त्यांची किव करावी शी वाटते,
अरे यार प्रेम कधी ना कधी तुम्ही पण केलंच असेल ना..
पण काही कारणामुळे तुम्ही अयशस्वी झालात म्हणुन सरळ प्रेम भावनेवर ब्लेम ?
नाय यार हे काय चांगले नाही ! आपण आपला दोष कोणावर तरी का काढायचा :?
आता बघ ना, परवा माझा एक मित्र खुप दुख:त होता दारु पीत होता..
मी विचारलं काय झालं रे बाबा.. तु असा देवदास कसा झाला
तो म्हणाला... ती नाही म्हणाली.. व दोस्ती पण तुटली !
मी म्हणालो... असं कसं ?
मिसळपाव