धिरडं
मिसळपावचे पाहुणे संपादक ऋषिकेश यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून ही बालकथा लिहित आहे.
ही बालकथा माझी आजी मला लहानपणी सांगत असे.
कोण्या एका काळी एका गावात एक भटजीबुवा राहत होते. घरोघरी पूजा सांगून ते आपले आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरत असत. एकदा त्यांना शेजारच्या गावात पूजा सांगण्यासाठी बोलावणे आले. शेजारचे गाव थोडे दूर होते. भटजीबुवा गरीब असल्याने चालत जाण्याशिवाय त्यांच्या कडे काही पर्यायच नव्हता.
दुसर्या दिवशी सक्काळी लवकर उठून भटजीबुवा पूजा सांगायला गेले. पूजा होई पर्यंत दुपार झाली होती. भटजीबुवा घाईने घरी जायला निघाले. पण यजमानीणबाई त्यांना म्हणाल्या,'अहो भटजीबुवा थांबा. काहितरी खाऊन मगच घरी जायला निघा !' त्यावर हो-नको करित भटजीबुवा थांबले.
मग यजमानीणबाईंनी चुलीवर तवा ठेवला आणि तवा गरम झाल्यावर त्यावर त्यांनी काहितरी घातले. त्याचा छानपैकी चुरर्र असा आवाज आला.

आता आली का पंचाईत !
त्यांनी खूप आठवायचा प्रयत्न केला.
''काय बरं नाव होतं? बाकडं ? नाही नाही... सरडं.. अरे नाही नाही.. काय बरं नाव होतं? उम्ह्ह ! काही केल्या आठवेना !"
असं करत करत ते घरी पोहोचले.
बायकोने त्यांना गूळ पाणी आणून दिले आणि विचारले, "थकला असाल तुम्ही. आणि भूक पण लागली असेल, काय करु तुमच्या साठी खायला?"
भटजीबुवा : "'ते' कर!"
बायको : "हा कुठला नविनच पदार्थ?"
भटजीबुवा : "ते गं ! ते तव्यावर करतात ना ते!"
बायको : "हां म्हणजे पोळी का?"
भटजीबुवा : "नाही गं ! ते नाही का.. चुरचुरीत... कुरकुरीत ...!"
बायको : "अहो पण काहितरी नाव असेल ना !"
भटजीबुवा : "मला काही नाव आठवत नाही..पण ते खूप छान लागतं.. एकदम .. चुरचुरीत... कुरकुरीत ...!"
बायको : "मला नाही बाई माहिती..."
भटजीबुवा रागावले आणि म्हणाले "येवढं कसं तुला येत नाही??"
असं म्हणून रागाने ते बायकोला पाठीत रट्टे मारायला लागले.
बायको ओय..ओय .. अशी ओरडू लागली..म्हणाली "अहो असे काय करता... मारुन मारुन अगदी माझ्या पाठीचे धिरडं करुन टाकलेत!"
भटजीबुवा एकदम टुणकन उडी मारुन म्हणाले "हा.. तेच हवंय मला.. धिरडं".
बायकोने कपाळाला हात लावला.. म्हणाली "हात् तिच्या..धिरडं होय !!"
मग बायकोने त्यांना गरम गरम चुरचुरीत कुरकुरीत धिरडं करुन दिलं :)

वाचने
10046
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
धिरड्याचं
शाल्मली, सुंदर बालकथा, एकदम चुरचुरीत, कुरकुरीत!
रंगा के
In reply to शाल्मली, सुंदर बालकथा, एकदम चुरचुरीत, कुरकुरीत! by चतुरंग
फोटो मस्त आलेत.
आम्ही पण
हा हा
In reply to आम्ही पण by विसोबा खेचर
सहजच
In reply to आम्ही पण by विसोबा खेचर
वाचून दाखवली.
फरक
In reply to वाचून दाखवली. by रेवती
लै भारी
मस्तच!
हा हा!
In reply to मस्तच! by आपला अभिजित
छान गोष्ट
In reply to हा हा! by शाल्मली
मस्त आहे गोष्ट
:)
In reply to मस्त आहे गोष्ट by ३_१४ विक्षिप्त अदिती
गोष्ट!
खूप दिवसांनी पुन्हा ऐकली
काय मस्त
सह्ही.
छान
आवडली
मस्तच...
धन्यवाद!
खटकल.
अभिज्ञ, तुम
In reply to खटकल. by अभिज्ञ
अभिज्ञ,
In reply to खटकल. by अभिज्ञ
>>भटजीबुवां
In reply to अभिज्ञ, by चतुरंग
(घरातले
In reply to >>भटजीबुवां by लिखाळ
हे कसे वाटतेय?
In reply to अभिज्ञ, by चतुरंग
चालेल, हा बदल पुढल्या पिढीत चालेल.
In reply to हे कसे वाटतेय? by अभिज्ञ
गंमत झाली बुआ..
बाकी
शाल्मली,