Skip to main content

स्वाती ताई- मांसाहारी पाककृती हवी आहे

लेखक वेताळ
Published on सोमवार, 10/11/2008
मला जरा कोकणी जेवणा बद्दल सविस्तर माहिती हवी आहे. घरी सुरमई फ्राय,बांगडा फ्राय करायला जमते. पंरतु कोकणी माशाचे कालवन.बांगडा कालवन व इतर माश्याचे प्रकार जमत नाहीत्.वेळ मिळेल तसे तुम्ही कोकणी जेवणाच्या पाककृती पण इथे द्यायला सुरुवात करा.मला बांगड्याचा रस्सा व सोलकडी ह्या बद्दल सविस्तर माहिती द्या. वेताळ

याद्या 7051
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

सहमत. स्वाती ताई ह्या पाकृ पण येउ द्यात. :) अभि़ज्ञ. अवांतर- ह्या वेताळाला अजून कशाकशाचा नेवेद दाखवावा लागतो?;)

स्वातीताई हे पाककृतीचे नवीन नाव दिसल्याने खूप कुतुहल वाटले! पण नंतर ती हाक आहे असे दिसून आले आणि हाकेतली आर्तता जाणवली :-) म्हणून आगाऊपणे मीच माश्याच्या कालवणाची एक सोपी पद्धत देते - माशाच्या तुकड्यांना थोडे मीठ, हळद, तिखट, आले-लसणीची पेस्ट, थोडा चिंचेचा कोळ असे लावून ठेवायचे. थोड्या वेळाने एका पसरट भांड्यात (भांडे शक्यतो मी दांडा असलेले वापरते) तेलावर थोडी लसणीची पेस्ट/ लसणीच्या १-२ पाकळ्यांचे तुकडे परतून त्यावर बारीक चिरलेला कांदा परतायचा. कांदा चांगला परतून घेणे आवश्यक आहे, कच्चा लागला नाही पाहिजे. त्यावर ३-४ तिरफळे, आणि माशाच्या तुकड्या घालून अगदी हलकेच परतून तुकड्या शिजतील इतके पाणी घालावे. त्यातच थोडा चिंचेचा कोळ घालावा. विस्तव प्रखर असावा. तुकड्या लवकर शिजतात, पातेल्याला दांडा असल्यास त्याला धरून हलकेच वर खाली हासडावे. हासडल्याने तुकड्या तुटत नाहीत, मोकळ्या राहतात. पळी/कालथ्याने कालवण हलवू नये ( नाहीतर तुटतात). तुकड्यांचा रंग बदललेला दिसला (पांढरट झाला) की मासे शिजलेले असतात. यावर नारळाच्या खोबर्‍याचे दूध घालून, कालवण घट्ट किंवा पातळ हवे त्याप्रमाणे पाण्याचे प्रमाण कमी अधिक करून एक उकळी आणून खाली उतरवावे. मीठ चवीप्रमाणे घालावे/ न घालावे. नारळ घातल्यानंतर अधिक शिजवायचे नाही. तेच कोथिंबिरीचे. कोथिंबीर बारीक चिरून वर शोभेसाठी टाकावी, पण एकदा कोथिंबीर घातली की मग शक्यतो कालवण परत गरम करायचे नाही. त्यामुळे कोथिंबीर वाढतानाच घालावी. (कालवणात १-२ बटाटेही छान लागतात. मी बटाट्यांचे मोठे तुकडे कांद्यापाठोपाठ तेलावर परतून पाण्यातच थोडे मीठ घालून अर्धेअधिक शिजवून घेते. मग माश्याच्या तुकड्या घालून पूर्ण शिजवते. पण तुकड्या नाजूक असल्याने त्या तुटत नाहीत ना हे पहाणे महत्त्वाचे. असे करायचे नसल्यास उकडलेले बटाटे घालता येऊ शकतात.)

In reply to by चित्रा

नेमक्या आणि मोजक्या शब्दात पाककृती दिली आहे. तिरफळे १०-१५ मिनिटे गरमपाण्यात भिजवून पाण्यासकट कालवणात घातली तर वास जास्त लागतो असा माझा अनुभव आहे. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

In reply to by चित्रा

वा चित्राभाभी! अगदी पारंपारिक आणि ऑथेन्टिक पाकृ...! बाय द वे, उपक्रमावर अबोल-अबोल, शिष्ठ-शिष्ठ असणारी चित्रावैनी एक चांगली सुगरणही आहे हे माहितीच नव्हतं! :) तात्या.

In reply to by चित्रा

धन्यवाद, पेठकरसाहेब. तिरफळांबद्दलची टीप पटली. तात्या, शिष्ट लोक काय चांगला स्वयंपाक करू शकत नाहीत असे म्हणायचे आहे काय? (शिष्ट )चित्रावैनी

चिकन, मटन, मासे, याबद्दलच्याही पाकृत्या याव्यात असे वाटते. :) वेगवेगळे फ्राय, रश्श्याचे प्रकार ( काळ्या मसाल्याचे-पिवळा मसाल्याचे सोडून ) इ.इ. माश्याच्या कालवणाची पाकृ दिल्याबद्दल चित्रा यांचे आभार, पुढील पाकृसाठी शुभेच्छा !!!

चित्राताई पाककृती नेहमी पेक्षा वेगळी आहे. उद्या बुधवार तेंव्हा करुन बघायला हरकत नाहि. पण एक सांगायच होत हासडणे हा शब्द बरोबर आहे की आसडणे? माझ्या ऐकीवात कायम आसडणे असाच आहे म्हणुन आपल विचारल!!!!!!!!!! "अनामिका"

In reply to by अनामिका

चित्राताई पाककृती नेहमी पेक्षा वेगळी आहे. सहमत. करून पहायला हवी. उद्या बुधवार तेंव्हा करुन बघायला हरकत नाहि मिपावर बुधवारच प्रस्थ वाढतच चाललयं! पण एक सांगायच होत हासडणे हा शब्द बरोबर आहे की आसडणे? माझ्या ऐकीवात कायम आसडणे असाच आहे म्हणुन आपल विचारल!!!!!!!!!! माझ्या ऐकीवात हासडणे असा आहे. पण दोन्ही चालावेत. तीच तर भाषेचे गंमत आहे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

माझ्या ऐकीवात हासडणे असा आहे. पण दोन्ही चालावेत. तीच तर भाषेचे गंमत आहे! मीही हासडणे असेच ऐकले आहे. बोलीभाषेतील फरक म्हणून सोडून द्यावे :) पण एक सांगायच होत हासडणे हा शब्द बरोबर आहे की आसडणे? बाकी तुम्हाला सांगायचं होत का विचारायचं होतं?!!!

अहो बुधवार एव्हढ्यासाठीच कारण आम्ही वार पाळतो . बारमाही खाऊन वस्तुंचे भाव कशाला वाढ्वायचे नाहि का? तुम्ही हासडणे म्हणत असाल तर तसेच ठि़क आहे. पण मला जिभ हासडणे हा वाकप्रचार माहित आहे. आज पर्यंत ज्यांच्या हाताखाली स्वयंपाक करायला शिकले ती माझी आजी, आई ,मावशी ,सासुबाई त्यांच्या तोंडुन कायम आसडणे हाच शब्द ऐकुन आहे म्हणून आपल विचारल. आता "अ "चा "ह" झाला काय किंवा "ह" चा "अ" झाला काय फरक काय पडतो? पदार्थाचा संबंध फक्त रुचीशी आणि पोटाशी. "अनामिका"