तरी हरकत नाही.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
माझ्या कविता
कुणिही गात नाही
कुणिही वाचत नाही
वाचली तरी ऐकत नाही
परंतु
कविता लिहील्याविना
मला र्हावत नाही
लिहूया कविता म्हणून
लिहीली जात नाही
विचारांच्या वेलीची
शब्दरुपी फुलं जेव्हा
मनाच्या पाण्यात
एकत्र तरंगतात
तेव्हा कविता लिहील्या
वाचून र्हावत नाही
दुःखा मागून
आनंद डोकावतो
यातना मागून
निर्मीती होते
कवितेचे असंच आहे
अशावेळी
कविता लिहील्या
वाचून र्हावत नाही
अन तुम्ही
गायिलीत नाही
वाचलीत नाही
आणि वाचून
ऐकलीत ही नाही
तरी हरकत नाही
कविता लिहील्या शिवाय
मला र्हावत नाही
श्रीकृष्ण सामंत
वाचने
2109
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
छान ..
आभार
छान,आवडली कवीता
आवडली!!
काव्यभाव कमी वाटला. व्याकरणात