संभा
"संभा...या दोन पेपर्सच्या झेरॉक्स आणुन दे बाबा.....!"
संभा..ही फाईल अकाउंट्मध्ये नेवुन दे रे..............!
संभा......काल बाईंडिंगसाठी दिलेला प्रोजेक्ट रिपोर्ट आणलास का परत.........!
संभाजी.....अरे, त्या एसी सर्व्हिसींगवाल्याला फोन करायला सांगितला होता तुला, तो अजुन उलथला नाही...!
संभा....दोन चहा...............!
संभा......तो कालचा ड्राफ्ट चेक केलास....प्रत्येक गोष्ट किती वेळा सांगायची रे तुला...?
संभा.............?
हे रोजचंच होतं तेव्हा, हि वाक्ये कानावर आल्याशिवाय आमचा दिवसच मुळी जात नसे. आणि स्वतः संभालाही त्याशिवाय ऑफीसला आल्यासारखं वाटत नसेल.
मिसळपाव