आपल्या भारतीयांत अचूकतेचा अभाव ठायी ठायी दिसून येतो. त्याचा परिणाम आपल्या कार्यक्षमतेवर निश्चितच होतो. आपल्या प्रगतीचा प्रवास अतिसंथ आहे त्यांतल्या अनेक कारणांपैकी हे एक महत्वाचे कारण आहे.
पत्रकारांचेच पहा ना, त्यांनी लोकांपर्यंत अचूक बातम्या पोचवल्या पाहिजेत. प्रत्यक्षांत काय दिसते? साधी नांवे सुध्दा या मंडळींना अचूक लिहिता येत नाहीत. 'कसाब्'ला पकडणारा तो शूर पोलिस! त्याचे नांव सुध्दा ओंबळे की उंबळे याबाबतीत गोंधळ दिसतो. 'कसाब' चे नांव सुध्दा कासाब, कासव, कासम असे लिहिलेले वाचायला मिळते. मागे भोपाळ्ला 'मिथाईल आयसोसायनेट' हा वायु सुटला होता तेंव्हा एक टाईम्स सोडला तर दुसर्या कोणत्याही पेपरांत त्याचे अचूक नांव नव्हते.
एखादी घटना आपल्या डोळ्यासमोर जरी घडली तरी प्रत्येकाच्या सांगण्यात फरक पडतो. लोकांना पत्ता सांगताना किती लोक तो अचूकपणे सांगतात ते आठवून पहा. टी.व्ही. वर प्रश्न विचारणार्या बहुतांशी लोकांना आपल्याला नक्की काय विचारायचे आहे हेच मनांत स्पष्ट नसते. अं अं असे करत बोलणारी माणसे पाहिली की त्यांची कींव येते.
कांही माणसांना तर आपण काल काय जेवलो हे सुध्दा नीट आठवून सांगता येत नाही. प्रत्येकाने जर मनःपूर्वक अचूकतेचा आग्रह धरला तरी आपल्या समाजाची जलद प्रगति होईल!!!
वाचन संख्या
2468
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
सकाळ
कुठला टाइम्स?
हमम
In reply to कुठला टाइम्स? by गोगोल
पाश्चात्य
आणी हो
In reply to पाश्चात्य by मराठी_माणूस
जात
In reply to आणी हो by विनायक पाचलग