मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कांद्याच्या पातीची सोप्पी कोशिंबीर

शाल्मली · · पाककृती
कांद्याच्या पातीची ही कोशिंबीर करायला अगदी सोपी आणि पटकन होणारी अशी आहे. साहित्य- घरात सहजी उपलब्ध असणारेच- कांद्याची पात - १ जुडी दाण्याचं कूट - २ - ३ चमचे कच्चं तेल - १ चमचा गोडा मसाला - १ छोटा चमचा तिखट - १ छोटा चमचा लिंबाचा रस - १ छोटा चमचा मीठ - चवीनुसार साखर - २ चिमूट कृती - कांद्याची पात स्वच्छ पुसून चिरून घ्यावी. त्यात वरील सर्व जिन्नस - दाण्याचं कूट, कच्चे तेल, गोडा मसाला, तिखट, मीठ, लिंबाचा रस आणि साखर घालावे. घरच्या सर्वांना 'चला जेवायला' अशी हाक मारून, सगळे येईपर्यंत ही कोशिंबीर ढवळून ठेवावी. :) करायला एकदम सोप्पी आणि फोडणी वगैरेची भानगड नसल्याने पटकन होणारी.. आणि चवीलाही अतिशय छान लागते. --शाल्मली.

वाचन 6137 प्रतिक्रिया 0