Skip to main content

<अस्वस्थ मन!>

लेखक मराठमोळा यांनी बुधवार, 18/03/2009 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: प्रेरणा यांची "मन" ही कविता.. काय करु आज विडंबनाची हुक्की आली.. ह. घ्या. कधी सकाळी उगाच पोट दुखुन येतं.. टाकीतलं पाणी नेमकं तेव्हाच आटुन जातं.. पाण्याची जाण, फक्त, कोरडा नळ देतो! तेव्हा फक्त टिश्यु पेपर मदत करु पाहतो.. थरारलेल्या क्षणांमागे मन जाऊन लपतं.. ते क्षण सरले की मग खुद्कन हसतं! काल काय खाल्ले मन पुन्हा उकलू पाहतं.. पुन्हा असे खायचे नाही, वेडं, शपथ घेउन जातं! भरलेल्या ताटावरती पुन्हा फिरून येतं.. थरारलेले क्षण पुन्हा विसरुन जातं..
Taxonomy upgrade extras

<तुझ्या नशेविना>

लेखक मराठमोळा यांनी बुधवार, 18/03/2009 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : शिवापा यांची "तुझ्या दु:खाविना" ही कविता अजुन किती वेळ जाईल? तुझी नशा कुठपर्यंत राहिल? रात्र संपलीय पण हँगओव्हर छळतोय नशेत झिंगल्यागत मी अजुन चालतोय कुठलाच विचार येत नाहि तुझ्या नशेविना अवचित फुटलेला ग्लास काळजाचे ठोके चुकवतो टेबलावरचा प्रत्येक प्याला तुझाच भासतो प्रत्येक रात्री वाट पहात राहतो बाटलीची झोपही येत नाहि तुझ्या नशेविना जाग आल्यावर लिंबु सोड्यासाठी घसा आसुसतो तुझी नशा उतरल्यावर एकदम बावरतो कधितरी थांबेलच पिणं, झिंगणं हे सर्व हँगओव्हरचे हेहि संपेल पर्व बेवड्यांच्या रांगेत पुढे सरकतांना बार बंद व्हायची वेळ आली हे कळताना पिणे सोडणे तेव्हढेसे कठिण रहाणार नाहि अवेळी प्यायची
Taxonomy upgrade extras

वय

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 18/03/2009 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
खास माझ्या लेकींसाठी लिहिलेली कविता. वय तुझे फुलण्याचे, वार्‍यासंगे बोलण्याचे इवल्याशा पंखांवर आसमंत पेलण्याचे आपल्याच सुरांमध्ये गात आपलीच गाणी आपल्याच रचनेच्या सौंदर्याला भाळण्याचे कधी खुळ्या वसंताचे, कधी दाहक ग्रीष्माचे आग पिऊन सूर्याची, चंद्रबिंब माळण्याचे वय तुझे भुलण्याचे, अधांतरी चालण्याचे मनाच्या धुंदीत नव्या तालावर डोलण्याचे तुझ्या वयासाठी नाही वाट जुनी रुळलेली, तुझे वय नव्या वाटा धुंडाळून चालण्याचे तुझी स्वप्ने जपताना ज्यांचे वय ओसरले, त्यांनी भाग्य दिले तुला हिरेमोती तोलण्याचे
Taxonomy upgrade extras

भारतातील हिन्दु लोकसन्ख्या

लेखक अबोलि यांनी बुधवार, 18/03/2009 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकराना नमस्कार, आजच हि मेल मला मिळाली. आपल्या प्रतिक्रिया आपेक्शित.... (लवकरच भारतात कायमचे जाण्याच्या तयारित असलेलि) अबोलि मिपाच्या धोरणानुसार सदर मजकूर अप्रकाशित करत आहे याची नोंद घ्यावी. -- (संपादक) अदिती

मनाच्या कुपितले-जर्नल

लेखक विनायक पाचलग यांनी बुधवार, 18/03/2009 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या कुपीतले या सदरातला हा सलग बारावा लेख. हे सर्व लेख तुम्ही इथेही वाचु शकता
जर्नल
हाय लोकानो काय चालु हाय ,अहो मला ओळखले नाहीत का! हा कसे ओळखणार म्हणा, तुम्हा सगळ्यांची शिक्षण होवुन लय दीवस झाले, आणि त्या काळात आमच्या भावंडानी तुम्हाला लय पीडलेला मग तुम्ही मला कसे ओळखाल. बाकी म्या जर्नल आणि माझा मालक म्हणजे ह्यो विन्या टारगट मी आपला त्याचा पामर .ए कोण ते म्हणले रे टॅब बंद करतो त्या विन्या मुर्खाचा नवा निबंध कशाला वाचत बसु,गप्प बस आज म्या बडबडणार आहे.

निषेध निषेध निषेध

लेखक यन्ना _रास्कला यांनी बुधवार, 18/03/2009 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
काही कामाकरता आज ताडदेव आरटीओ मधे गेलो होतो. काम व्हायला वेळ लागेल असे एजंट बोल्ला. म्हणुन कँटिन मधे गेलो. पाहतो तर तिथे मिसळपाव नाही. शेम शेम. महाराष्ट्रातल्या सगळ्या कँटिन मधे मिसळपाव मिळतो. सगळ्या एष्टी कँटिन मधे तर ए-वन मिसळ मिळते. मग ताडदेव आरटीओ कँटिन मधे मिसळपाव का नाही मिळत? आयला ही भैय्या लोकं जिथे जातील तिथुन मिसळपाव हटवतात की काय? वि. सु. : तिथे मच्छी फ्राय मात्र मस्त मिळते बर का... सोबत खारा लस्सी घ्यायलाच हवी अशी.

मन!

लेखक प्रेरणा यांनी बुधवार, 18/03/2009 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
कधी जुन्या आठवांनी मन भरून येतं.. शुभ्र काळ्या ढगांनी आभाळ दाटून येतं.. पावसाची जाण, फक्त, वैशाखाचं रान देतं! सोबतीला आषाढाची ओल धरून येतं.. भारलेल्या क्षणांमागे पुन्हा जाऊ बघतं.. झुळुकीवरती कळीसारखं हळूच फ़ुलून येतं! नात्यांची वीण जरा पुन्हा उकलू पाहतं.. निसटलेली रेती, वेडं, पुन्हा धरु जातं! जुन्या जुन्या वाटांवरती पुन्हा फिरून येतं.. सरलेले दिवस जरा पुन्हा जगून येतं.. प्रेरणा
Taxonomy upgrade extras

subprime crisis.. (कोसळलेला) पत्त्याचा बंगला

लेखक बामनाचं पोर यांनी बुधवार, 18/03/2009 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिण कॅलिफॉर्निया मधला ऒरेंज प्रांत. कर्जाचे हप्ते न भरल्यान एका कुटुंबाला राहत्या घरातून बाहेर पडावं लागंल , तेही ऐन नाताळच्या तोंडावर . शेवटच्या दिवशी "no trespassing" ची पाटी लावायला आलेल्या महिला पोलीस अधिकारयाला त्या कुटुंबातल्या ४-५ वर्षाच्या मुलाने विचारले.." how will Santa ever find me now ? ".. यावर डोळ्यातून अश्रु वाहण्या पलीकडे कोणाच्याही हातात काही नव्हतं. अशीच परिस्थीती " subprime mortgage crisis " मधे अडकलेल्या व बेघर झालेल्या हजारो अमेरीकन कुटुंबांची आहे.. सीनबीसीच्या " house of cards " या विशेष वृत्तांता मधे या घोटाळ्याच उत्तरीय परीक्षण केलय.

गमतीशीर देवपुजा

लेखक रम्या यांनी बुधवार, 18/03/2009 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
मी हल्ली आठवड्यातून एक दिवस तरी घरातल्या देवाची पुजा करतो. रोज करायला अजून तरी जमलेलं नाही. देवपुजा झाल्यावर देवाबरोबर आईच्याही पायाला हात लावतो. वाटेतल्या सगळ्याच नाही पण बर्‍याच देवळासमोरून जाता जाता नमस्कार करतो. कधी कधी लांबच्या देवदर्शनाला सुद्धा जातो. पण आजही देवासमोर उभं असताना तो गमतीदार किस्सा आठवतो... लहान पणी मी नास्तिक, विज्ञाननिष्ठ वगैरे काही तरी होतो. मी कधी देवळात जात नसे, घरातल्या देवाची पुजा करीत नसे. वडील सुद्धा देवभोळे होते असं नव्हे. पण देव, धर्म याचं कधी स्तोम माजवलं नाही. आई मात्र देवपुजा, इतर प्रथा आवर्जून पाळत असे.