Skip to main content

आयुष्य

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 05/05/2009 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
रमत गमत जगायचं, हसत हसत मरायचं जन्मभर उन्हाच्या झळा सोसून सावलीसाठी झुरायचं बकुळगंधाच्या स्मृती घेऊन बाभुळबनात फिरायचं एकाकीपण विसरून जाऊन मैफलीत बहरायचं निखळलेल्या प्रतिबिंबातलं चांदणं हाती धरायचं निसटलेल्या क्षणांमधली स्वप्नं शोधत फिरायचं हळूच मिटल्या पापणीतला अश्रू होऊन झरायचं तृणावरच्या दंवासारखं कोवळ्या उन्हात विरायचं तहानल्या जीवांसाठी मेघ होऊन उतरायचं वाळवंटातल्या पथिकामागे सावली होऊन फिरायचं रित्या ओंजळीला गोड गुलाबी आठवणींनी भरायचं बहरासाठी वाटा सजवून पाचोळ्याचं आयुष्य सरायचं

आपला तो संस्कार, त्यांचा तो उर्मटपणा!

लेखक आपला अभिजित यांनी मंगळवार, 05/05/2009 00:54 या दिवशी प्रकाशित केले.
आमची मुलगी सध्या हिंदी शिकतेय. म्हणजे, तसं ती गेली दोन वर्षं शिकतेय! (शिकवायला बापच ..सॉरी...पिताश्री असल्यावर कसं व्हायचं पोरीचं?) पिताश्रींनी तिला इंग्रजी-हिंदी शिकवायचं व्रत घेतल्याला काही वर्षं लोटली. (आधी स्वतः शिका म्हणावं!) आता ती "पाच मिनिट थांबो' अशा दर्जाचं हिंदी बोलतेय. जमलं नाही, तर तोंडाला येईल ते ठोकून देते. (पिताश्रींची परीक्षेतली सवय!) काही महिन्यांपूर्वी असंच तिला कळू नये म्हणून मी आणि बायको एक विषय इंग्रजीतून बोलत होतो. ("तसलं' काहीही बोलत नव्हतो! चहाटळ कुठले! "तसलं' मराठीतून बोलायची बोंब. इंग्रजीतून काय बोलताय?) थोडा वेळ पाहिलं पाहिलं आणि पोरगी वैतागली.

(रेडा...)

लेखक केशवसुमार यांनी सोमवार, 04/05/2009 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा भूषण कटककरांची सुंदर रचना रेडा... कशाला ही अदाकारी?

सोसायटी आणि बॅचलर

लेखक निखिल देशपांडे यांनी सोमवार, 04/05/2009 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारी सकाळी लवकरच भद्रा मारुती दर्शनाला निघालो. गाडी चालवताना फोन वाजला, बघितल तर घरमालकांचा फोन. घरमालकः- निखिल कुठे आहात??? मुंबई मधे आहात का??? मी:- नाही हो, सध्या मी घरी आलेलो आहे. घरमालकः- तुमच्याशी थोडे बोलायचे होते. मी:- सध्या गाडी चालवत आहे, तुम्हाला साधारण तासभरात फोन करतो. घरमालकः- ठीक आहे पण आठवणीने फोन करा माझ्या डोक्यात पहिला विचार आला आज तर दोन तारीख आहे ह्यांना लवकर घरभाडे पाहिजे असणार ह्या वेळेस. तसेच सगळे काम आटपुन एक तासाच्या आत घरी पोहचतच होतो तेव्हा परत त्यांचा फोने आला.

विचार चालु आहे

लेखक गोगट्यांचा समीर यांनी सोमवार, 04/05/2009 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
विचार करतो तुला सांगाव कसं? माझं मन तुला कळावं कसं? सांगयच तर खुप आहे , पण शब्दात व्यक्त होत नाही, Romantic मला होता येत नाही , आणि सरळ बोलावं असं वाटत नाही, हा विचार तर चालुच राहिल , पण मला तु आवडतेस आणि हा विचार बदलत नाही!
Taxonomy upgrade extras

मन तृप्त झालं आहे पण उत्साह स्वस्थ बसूं देत नाही.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 04/05/2009 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या "कृष्ण उवाच" ह्या ब्लॉगवर आज पावलाख वाचनं झाली. निरनीराळ्या विषयावर एकूण ३९२ लेखनं मी केली.

तर्कशास्त्र

लेखक अजय भागवत यांनी सोमवार, 04/05/2009 05:09 या दिवशी प्रकाशित केले.
सुधारणा १: धनंजयने दिलेल्या प्रतिसादानंतर लेख विस्तारीत केला आहे. धनंजयच्या प्रतिसादाने खूप विचार करायला भाग पाडले. त्यामुळे वाचकांनी धनंजयचा पहिला प्रतिसाद जो "एक चांगला विषय पण लेख नीट समजला नाही. येथे वाद म्हणजे "आर्ग्युमेंट" म्हणायचे आहे की "लॉजिक" म्हणायचे आहे?

स्वाईन फ्लू.

लेखक नेटकिडा यांनी रविवार, 03/05/2009 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
मी न्यू यॉर्क राज्यातल्या बफैलो शहरात राहतो. इथे बहुतेक अमेरिकन लोकांमध्ये स्वाईन फ्लू बद्दल भिती जाणवली. आमच्या क्लायंट ने कोणत्याही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर १० दिवसांची बंदी घातली आहे. त्या मानाने भारतीय लोकांमध्ये तेवढी भीती वा उत्सुकता जाणवली नाही. भारतात या रोगाबद्दल लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत?

संवादाचा सुवावो

लेखक भोचक यांनी रविवार, 03/05/2009 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ साहित्यिक, प्रख्यात वक्ते आणि संत साहित्यासह संस्कृत साहित्याचेही गाढे अभ्यासक राम शेवाळकर यांच्या निधनाची बातमी कळाली नि गलबलून गेलो. शेवाळकर नाशिकला नित्य यायचे. नाशिकच्या देशदूत या वृत्तपत्रातर्फे सारडा व्याख्यानमाला होते. त्यात शेवाळकरांचे व्याख्यान ठरलेले असायचे. एकदा या व्याख्यानमालेत त्यांचे ज्ञानेश्वरीवरच्या एका अध्यायावरचे ओजस्वी निरूपण ऐकले नि प्रचंड प्रभावीत झालो. हा माणूस 'ग्रेट' आहे, एवढे जाणवले.