Skip to main content

शिवजयंती

लेखक सुनील
गुरुवार, 19/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1045
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

ही शिवजयंती क्यालेंडराप्रमाणे आहे, त्या तारखेला व्यक्तिशः आम्ही व आमचे मंड्ळ साजरी करत नाही. म्हणुन आज आम्हांस त्याबद्दल काही बोलायचे नाही. हे मत पुर्णतः वैयक्तिक आहे. ह्यावर कोणतेही भाष्य सदर प्रतिसादकर्त्याकडून केले जाणार नाही. सहकार्य करावे ही विनंती. :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

In reply to by धमाल मुलगा

हिन्दु पंचांगाप्रमाणे, शिवाजींचा जन्म "फाल्गुन वद्य तृतीये" स झालेला आहे. आणि त्यामुळेच हिन्दवी स्वराज्याची स्वप्ने पाहणार्‍या शिवरायांची जयन्ती " हिन्दु धर्मा" नुसार साजरी करणं, केव्हाही उचित ठरतं. :) हिन्दू धर्म-संस्कार, पंचांग न मानणार्‍या काही तथाकथित शिवप्रेमींसाठी ( की शिवधर्मींसाठी ???) ..... " ग्रेगेरीयन कॅलेंडर"- '१९ फेब्रुवारी' ही एक सोईस्कर प्रोव्हीजन आहे. अर्थात, त्यामुळे "सत्य" बदलत नाही, हेही तितकेच खरे! :) त्यामुळे च शिवाजी, संभाजी, जिजाऊ यांच्या नावाचा वापर करून घाणेरडे राजकारण खेळणारे लोक आणि "शिवरायां"चा इतिहास बदलून हिन्दु धर्माला काळिमा फासणारे समाजकंटक आज ""विद्रोही शिवजयन्ती"" साजरी करतात. हे माझे वैयक्तिक मत आहे. त्यामुळे यंदा शिवरायांची जयन्ती आम्ही १३ मार्च २००९ रोजी, म्हणजेच "फाल्गुन वद्य तृतीयेस" साजरी करणार आहोत. | जय जय रघुवीर समर्थ | :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

In reply to by मृगनयनी

असेच म्हण्तो. सहमत आहे. जय भवानी .. जय शिवाजी !!

In reply to by आनंदयात्री

सहमत. शिवरायांवर सकाळ मधे आलेला लेख वाचनीय आहे.

In reply to by

सकाळचा लेख वाचनीय. लेख फाल्गुन वद्य तृतियेच्या सुमारास प्रसिद्ध न करता, कालच्या अंकात का केला गेला असेल बरे? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

आम्ही महाराजांची जयंती फाल्गुन वद्य तृतियेलाच साजरी करणार आहोत हे सर्व कॉग्रेसवाल्यांचे भिकार चाळे आहेत १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करण्याचे जय भवानी जय शिवाजी ___________________________________________________ मुख्यकार्यकारी अधिकारी जाणताराजा डॉट कॉम

In reply to by सुनील

"सकाळ " हे एक सार्वजनिक वृत्तपत्र आहे. समाजात होणार्‍या घडामोडींचा आणि समाजातील सर्व स्तरांवरील घटकांचा वृत्तपत्रात उल्लेख असणे, क्रमप्राप्त आहे. :) आणि "सकाळ" मध्ये शिवरायांवर लेख लिहिणारे "शिवधर्मी -श्रीमंत कोकाटे" हे ते तर नव्हे ?... ज्यांनी " बाबा पुरंदरे हाच खरा जेम्स लेन" सारखी निरर्थक पुस्तके लिहिलीत. आणि ज्यांच्या एका शिवधर्मी सहकार्‍यावर (सचिन गोडाम्बे) "सकाळ" ने कॉपीराईटचा गुन्हा दाखल केला होता? विश्रामबागवाडा पोलिसचौकी......... असो. महापुरुषांच्या जयन्ती आणि पुण्यतिथी नुसत्या साजर्‍या करण्यापेक्षा, त्याचबरोबर त्यांचे सद्गुण ही अंगी बाणवणे, अधिक श्रेयस्कर ठरते. आता, १३ मार्च २००९'च्या शिवजयन्तीला ज्येष्ठ इतिहासकार "निनादजी बेडेकर" यांचा लेख "सकाळ" मध्ये येइल, यात शंकाच नाही. :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

In reply to by मृगनयनी

त्यामुळे यंदा शिवरायांची जयन्ती आम्ही १३ मार्च २००९ रोजी, म्हणजेच "फाल्गुन वद्य तृतीयेस" साजरी करणार आहोत. शिवाजी महाराजांची जयंती आपण इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे साजरी करणे मलाही नाही पटत... मराठी माती जे पंचांग आणि कालगणना कित्येक शतके वापरीत आहे, ते आपण जास्त वापरत नाही ही खेदाची गोष्ट आहे... कित्येकांना आपल्या स्वतःच्या जन्माची तारीख सहज सांगता येते, पण तिथी सांगण्यासाठी विचार करावा लागतो... जय भवानी जय शिवाजी (शिवप्रेमी) सागर

मला शिवजयंतीच्या शुभेच्छा दोनदा द्यायला आवडतील.. छ. शिवाजी महाराज महत्वाचे..दिवस वगैरे सर्व नंतर.. !! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !! स्वप्निल

In reply to by स्वप्निल..

सेम हीयर! जय भवानी!जय शिवाजी!

आम्हाला शिवजयंतीची आज सुटी असते, म्हणून आम्ही आज शिवजयंती साजरी करु ! आणि१३ मार्च २००९ ला सुटी दिली नाही तरी, तेव्हाही ती साजरी करु ! कशाला वाद करायचेत नाही का ? -दिलीप बिरुटे

In reply to by विकास

धन्यवाद विकासराव! मीदेखिल याच धाग्यासाठी उत्खनन केले पण मला सापडला नाही (वेळही फारसा नव्हता), म्हणून स्वतंत्र कौल टाकला. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.