Skip to main content

उशीर.....

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 11/05/2009 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
उशीर..... ही हुरहुरणारी सांज अशी अन् भुरभुरणारे केस तुझे असते सुरेख सुंदर कांता पण..... मज दिसती ते गणवेष तुझे ! खिडकीवर , गाली ओघळते ही श्रावणातली धार अशी तू कधी कवळशील सांग सखे हे विरघळते अवशेष तुझे? ही चांदरात गे पुनवेची मी स्वार जुन्या आठवांवरती हा धपापणारा श्वास मला पण ओठांवरती फेस तुझा ! संपले स्वप्न ते सोनेरी अन् माझेही झाले सोने पण मोहरलो मी चितेवरीही गळता.....भिजल्या पापण्यांचे केस तुझे !
Taxonomy upgrade extras

मी कुठवर पाहू वाट ?

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 11/05/2009 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
मी कुठवर पाहू वाट ? मी कुठवर पाहू वाट ? सांग ना..... कुठवर पाहू वाट ? या उत्तररात्री आठवतो मज केशसंभार घनदाट ही रिती शेज अन् तळमळता मी जाते उशीत भिजून पहाट सांग ना , कुठवर पाहू वाट ?सांग ना , कुठवर पाहू वाट ? तो तरुण कोवळा स्वप्नाळू ती सुंदर , शीतल ना कुठला थाट पाहताच तिला तो हरवून गेला ....नयनी आठवांची* ही लाट !
Taxonomy upgrade extras

बेसामे मुचो - एक शृंगारिक गाण्याची विविध रूपे

लेखक धनंजय यांनी सोमवार, 11/05/2009 07:32 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही महिने मला या "बेसामे मुचो" ("खूप चुंबने दे") गाण्याने पछाडले आहे. हे प्रथम ऐकले, ते आवडावे असे नाही. "अमेरिकन आयडल" या संगीतस्पर्धेत सँजाया मॅलकार (?संजय मालाकार?) याने मी ते गायलेले ऐकले, आणि अशा परिस्थितीत कुठलेही गाणे न आवडले, तर आश्चर्य ते काय? पुढे यूट्यूबवर शोधता दिसले, की हे गाणे अनेक कलाकारांना आपली छाप लावून गावेसे वाटले आहे. तसे हे गाणे फार जुने लोकसंगीत वगैरे नाही. हे गाणे त्या मानाने अगदी हल्लीहल्लीच १९४०मध्ये कोन्सुएलो वेलास्केस या मेक्सिकन पियाने-वादिकेने रचले (शब्द आणि संगीत दोन्हीही).

इंद्रधनुष्यी करंज्या

लेखक समिधा यांनी सोमवार, 11/05/2009 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या करंज्या माझ्याकडील पुस्तकात बघुन मी केल्या आहेत. माझ्या कडे उपलब्ध असलेल्या सामानानुसार थोडा बदल केला आहे. ह्या करंज्या त्यातील रंगामुळे खुप आकर्षक दिसतात.

सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 11/05/2009 01:47 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या थोडे आधी सरसगडावर जाण्याचे झाले. मी आणि माझा पालीतला भाचा -शुभम- असे दोघे जण सकाळी ११ वाजता बल्लाळेश्वराचे नाव घेवून घरातून निघालो. छाया. १. निघतांना आम्ही एका बॅगेत खाण्याचे पदार्थ, पाणी आदी. घेतले. छाया. २. गडाखालच्या विस्तीर्ण पठारावर आस्मादिक व शुभम छाया. ३.

माय.........

लेखक उमेश__ यांनी रविवार, 10/05/2009 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाप्रेमी मात्रुदिना निमित्त ही एक छोटीशी कविता............ माय, माय आतला पदर चार पुडदाच्या पोळीतला भाजलेल्या खोबर्याचा तुकडा गावाच्या होळीतला... तव्यावरची भाकर भाजण्यासाठी माय झाली चुलीतलं सरपण जळत राहिली सतत घराला यावं घरपण... चुलीवर शिजून-शिजून मऊ झालेल पूरण आत्मशांतिसाठी पोळीचा तुकडा आगीत जळावा तसं माईला आलेलं मरण..................

आई

लेखक मराठमोळा यांनी रविवार, 10/05/2009 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
सामंत काकांचा हा लेख वाचला आणी ही कविता सुचली.
Taxonomy upgrade extras

आठवण

लेखक स्वप्नयोगी यांनी रविवार, 10/05/2009 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
येणारा दिवस कधीच तुझ्या आठवणीशिवाय जात नाही दिवस जरी गेला तरी तुझी आठवण जात नाही. पंखांना क्षितीज नसते, त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे आभाळ असते.