मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ए आई, सांग ना, कधी येइल बाबा घरा?

विशाल कुलकर्णी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
ए आई, सांग ना, कधी येइल बाबा घरा? ए आई......,सांग ना SSSSS! आता गोष्ट नको आम्हाला, गाण्यातला रस संपला! लुटुपुटीच्या भातुकलीचा, आला खुप खुप कंटाळा SSSS! ए आई, सांग ना SSSSS, कधी येइल बाबा घरा? नकोच आई मजला, चॉकलेटचा तो बंगला ! अन बर्फीची ती झाडे, इथे आहेत, हवी SSSS कुणाला? ए आई, सांग ना SSSSS, कधी येइल बाबा घरा? राजपुत्र अन परीराणीच्या, गोष्टींचा स्टॉकही संपला ! टॉम अँड जेरी, पापायनेही, बघ जीव; आमचा SSS उबला ! ए आई, सांग नाSSSSS, कधी येइल बाबा घरा? चिवचिव करती चिमणपिले, चोचीतच घास राहीला ! असेल का गं गेला ? त्यांचाही बाबा टूरSSS ला? ए आई, सांग नाSSSSS, कधी येइल बाबा घरा? बघ चांदोबा तो रुसला, चांदण्याही..., बघ धुसफुसल्या ! अंगाई नच रुचे आम्हाला, आम्हा हवाय बाबा......, थोपटायलाSSSSS ! ए आई, सांग नाSSSSS, कधी येइल बाबा घरा? विशाल.

वाचने 3096 वाचनखूण प्रतिक्रिया 9

विशाल कुलकर्णी 27/07/2009 - 12:59
प्रेरणास्थान "आयुष्यावर बोलु काही" .... पार्श्वभुमी ....? एक माजी पोलीस हे विचारतोय? ;-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

In reply to by विशाल कुलकर्णी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 28/07/2009 - 08:56
कविता वाचल्यावर मलाही परवा झी मराठीवर पाहिलेल्या "आयुष्यावर बोलु काही" ची आठवण झाली. काय मुळुमुळू रडतात स्त्रीया बाबांच्या आठवणींनी...! (सर्वच स्त्रीयांचा एक वीक प्वॉइंट म्हणजे...'बाबा' ....असे वाटते) -दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 27/07/2009 - 17:04
कविता आवडली.. बाकी, बाबा कुठे उलथलाय देव जाणे! :) तात्या.

पक्या 27/07/2009 - 21:55
छान कविता. एकच खटकले...घरला हा शब्द. सगळी कविता शहरी बोली भाषेत आहे आणि घरला हा एकच शब्द ग्रामीण वाटतोय.

विशाल कुलकर्णी 28/07/2009 - 09:36
धन्यवाद, पक्या मलाही ते लक्षात आले होते, पण बदल करायचे काल राहुनच गेले. आज अपेक्षित बदल केला आहे. धन्स ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

In reply to by विशाल कुलकर्णी

बेचवसुमार 28/07/2009 - 12:45
पण ह्या नादात ला..ला..ला हे यमक फसले की हो! :T ह.घ्या.

In reply to by बेचवसुमार

विशाल कुलकर्णी 28/07/2009 - 12:55
'ला' नसला तरी 'आ' आहे ना! चालीत गुणगुणता आली म्हणजे झाले. आता तुम्ही "आ" वासु नका म्हणजे झाले. :T ह. घ्या. >:) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

आशिष सुर्वे 28/07/2009 - 09:48
विशाल भाऊ, आपली कविता आवडली ! - कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''