मागल्या आठवड्यात मी मध्यप्रदेशातील विदिशानगरीला गेलो होतो. तेथील स्थानिक हिन्दी दैनिकात आणि लोकांच्या बोलण्यात त्या वेळी एकाच विषयाची चर्चा चालली होती. मुंबईच्या वर्तमानपत्रात हे वृत्त आले होते की नाही हे मला माहीत नाही म्हणून मिसळपावच्या वाचकांसाठी ते इथे थोडक्यात देत आहे.
तेथील लोकसभेच्या जागेसाठी भाजपच्या सुप्रसिध्द नेत्या श्रीमती सुषमा स्वराज या उभ्या आहेत. कॉंग्रेसतर्फे राजकुमार नांवाच्या एका गृहस्थांना ही सीट दिली गेली होती. त्यांनी त्यासाठी फॉर्म भरला आणि त्यांचेच बंधु देवकुमार यांनी डमी कँडिडेट म्हणून. पण या दोन्ही फॉर्ममध्ये ओरिजिनलचे ऐवजी झेरॉक्स कॉपी देणे, सर्व आवश्यक परिशिष्टे न जोडणे वगैरेसारख्या कांही तांत्रिक चुका निघाल्या आणि ते रद्द ठरवले गेले. त्यामुळे या मतदारसंघात आता कॉंग्रेसचा किंवा तिने पुरस्कृत केलेला उमेदवारच उभा नाही. येथील आतापर्यंतचा इतिहास पाहता तो निवडून येण्याची मोठी शक्यता होती अशातला भाग नाही. पण राज्यकर्त्या राष्ट्रीय पक्षाने अशा प्रकारे निवडणुकीपूर्वीच वॉकओव्हर द्यावा अशीही कोणाची अपेक्षा नव्हती. अशा प्रकारच्या बारीक चुका 'चुकून' झाल्या अशी सफाई दिली गेली, पण त्यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता.
कॉंग्रेसचा उमेदवार नाही म्हणून श्रीमती सुषमा स्वराज या बिनविरोध निवडून आलेल्या नाहीत, इतर उमेदवार रिंगणात आहेतच.
त्यामुळे निवडणूक ही होणारच आहे. त्यांचे काम थोडे सोपे झाले असावे आणि त्यामुळे त्यांना इतर ठिकाणी प्रचार करायला जायला वेळ देता येईल असे म्हंटले जात होते.
वाचने
1468
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
अश्या
प्रमोद, बाळ आणि शरद
In reply to अश्या by चिरोटा