Skip to main content

बायको बरोबर भाजीला गेलो...

लेखक अविनाश ओगले यांनी शनिवार, 15/08/2009 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
बायको बरोबर भाजीला गेलो, पिशवी तिच्या हातात होती खरेदीला घेतलेल्या पैशाची, माझ्या खांद्यावर जड पोती आलं, कडीपत्ता, भाजीवाल्यानं सहज पिशवीत सारला दोन किलो वांगी दे म्हटल्यावर, पॅन नंबर विचारला तो म्हणाला, शंभर रुपयाच्या भाजीवर, फुकटच आहे कडीपत्ता पण आयकर विभागाला कळवावा लागतो तुमचं नाव आणि पत्ता. कडधान्याच्या दुकानात बॅंकांचे प्रतिनिधी वाटत होते अर्ज तूरडाळ खरेदीसाठी सवलतीच्या दरात मिळत होते कर्ज डाळीचा मग नाद सोडला, चिकन आणलं भाराभर त्यादिवशी मला पटलं, `घर की मुर्गी दाल बराबर' दाल मे कुछ काला है, मोठा कठीण आलाय काळ महागाईसमोर कुणाचीच शिजेनाशी झालीय डाळ आमच्या संसाराचं चाक असं महागाईत फसल
काव्यरस

`आयडिया'ची कल्पना

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 15/08/2009 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबैतल्या शाळा सात दिवस बंद ठेवायचा निर्णय उपमुख्यमंत्री छगन भुजबळांनी घेऊन टाकल्याने महापालिकेचे आयुक्त जयराज फाटक यांची स्थिती केविलवाणी झालीय. एवढी चांगली `आयडिया' प्रत्यक्षात आणून `लोकशाही' (डेमोक्रसी) कशाला म्हणतात, ते दाखवूने द्यायच्या श्रेयाचे पहिले मानकरी ठरण्याचे त्यांचे स्वप्न भुजबळांनी पार धुळीला मिळवले. लोकशाहीत जनमताला किती किंमत असते, याचा एक वस्तुपाठ फाटकांनी घालून दिला असता, तर ती प्रथा पुढे घातक ठरू शकते, अशी भीती कदाचित भुजबळांना वाटली असेल... (शाळा बंद करायच्या की सुरू ठेवायच्या, हे लोकांना विचारायचे?

यज्ञकर्म उपहारगृह

लेखक प्रभाकर पेठकर यांनी शनिवार, 15/08/2009 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. पुण्यात सध्या स्वाईन फ्लू ने भयंकर उच्छाद मांडला आहे हे आपण सर्व जाणताच. प्रसारमाध्यमे उलट सुलट बातम्या पसरवून लोकांमध्ये घबराट पसरवत आहेत. टिव्ही वरील बातम्यांमधून स्वाईन फ्लूचे जे उग्र स्वरूप समोर येत आहे त्याने धास्तावून आम जनतेने बाहेर फिरणे, सार्वजनिक ठिकाणांना भेटी देणे बंद केले आहे. ह्याचा सर्वच व्यवसायांवर अनिष्ट परिणाम दिसू लागला आहे. ह्याचाच परिपाक म्हणून बहुतेक उपहारगृहे ओस पडलेली दिसत आहेत. यज्ञकर्म उपहारगृहही त्याला अपवाद नाही. यज्ञकर्म उपहारगृहात काम करणारा कर्मचारी वर्ग पुण्याबाहेरून आलेला आहे.

स्वातंत्र्यदिन

लेखक प्रशांत उदय मनोहर यांनी शनिवार, 15/08/2009 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावच्या सर्व सदस्यांना व वाचकांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या मनापासून शुभेच्छा. लहानपणापासून स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण आपण साजरे होताना पाहत असतो. शाळांमध्ये जेवढ्या उत्साहात हे सण साजरे होतात, तेवढे कॉलेज, विद्यापीठ किंवा ऑफ़िसांमधून साजरे होताना दिसत नाही. मी कॉलेजात गेलो होतो तेव्हा आठवतंय - मी, माझा वर्गमित्र आणि आणखी १५-२० विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि कॉलेजातले काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून साधारणपणे ५०-६० लोकंच वेळेवर उपस्थित असत. काही शिक्षक उशीरा का होईना? पण निदान हजेरी तरी लावून जात. पुणे विद्यापीठात एम्.एस्.सी.

नवअस्पृश्य!

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 14/08/2009 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
काहि प्रसंग: १. स्वाईन फ्लूमुळे शाळेला सुट्ट्या. घराजवळच्या मंदीराच्या आवारात ७-८ मुलींचा घोळका काहितरी खेळत बसला होता. एक चिमुरडी मात्र एवढंस्स तोंड करून बाजुला बसलेली. मला बघवलं नाही म्हणून त्या खेळणार्‍या मुलींपैकी एकीला विचारावं म्हणून संवाद सुरु केला "काय गं शाळेला सुट्टी?" "होऽऽऽ" (एकीला प्रश्न घाऊक उत्तरे :) ) "ती 'क्ष' का तिथे बसलीए? लिंबु टिंबु आहे? का तिला येतच नाहि हा खेळ?" "श्शुऽ!! बसुदे तिला तिथे.. ती आली तर आई ओरडेल मला" "का बॉ? भांडलात की काय?" "नाऽहीऽ!!! ती आहे ना तिच्या चुलत बहिणीला ताप आलाय" "मग?" "म्हणून आई म्हणालिए तिच्यापासून दूर रहा..

DOMESTIC THERAPY TO AVOID SWINE FLU.

लेखक विनोद कोकने यांनी शुक्रवार, 14/08/2009 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
Strengthen your Immune System & avoid Swine Flu with this simple Domestic Therapy. 30 leaves of Tulsi 30 leaves of Bela 10 nos. of Miri 4 ltrs of Water Boil for half an hour & can have it through out the day when it attains normal temperature. Try this Therapy and avoid Swine Flu.

ती व तो - लफडा अनलिमिटेड -भाग -२

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 14/08/2009 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
मागील.... भाग १ त्याला ही काही समजत नव्हते काय बोलावे... त्यालाच नवल वाटत होते की त्यांने हे प्रश्न विचारलेच कसे ? जवळ जवळ दिड वर्षानंतर तीला सरळ लग्नात अडचण आहे का ? असे कसे विचारले मी .. हा विचार करुन तोच स्वतः ओशाळला.. व क्षमा मागावी हा विचार करु लागला पण तीचे उत्तर त्याला समजलेच नाही... तो आपल्या ह्दयमध्ये अचानक दर्द का झाला ह्याचा विचार करु लागला व त्या क्षणी तो हे देखील विसरला कि तो ऑफिस मध्ये आहे व काम करत आहे व फोन कानावर लावलेला आहे.. ! *********** ती.. काय बोलू ह्याच्या बरोबर... ह्याला सांगू का नको माझी अडचण ?

अल्-जझीराने केलेल्या "पाकिस्तानला सर्वात जास्त धोका कुणाकडून" या पाकिस्तानी जनमतकौलावर टिप्पणी

लेखक सुधीर काळे यांनी शुक्रवार, 14/08/2009 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तानचा खरा शत्रू कोण? "अल जझीरा" या अरबी भाषिक चित्रवाहिनीने "पाकिस्तानी गॅलप" या संस्थेकडून जनमताची पाहणी करविली. २६०० पेक्षा जास्त लोकांनी या जनमतकौलात भाग घेतला. प्रश्नोत्तरें मतदात्यांमध्ये आणि प्रश्न विचारणार्‍यांमध्ये समोरासमोर झाली, अनेक प्रश्न विचारण्यात आले, पण मुख्य प्रश्न होता कीं पाकिस्तानला सर्वात मोठा धोका कुणाकडून आहे? तालीबानकडून? की भारताकडून? की अमेरिकेकडून? ५९ टक्के पाकिस्तानी लोकांना सर्वात जास्त धोका अमेरिकेकडून वाटला, त्या खालोखाल (पण खूप खाली) फक्त १८ टक्के लोकांना भारताकडून वाटला तर तालीबानकडून धोका आहे असं मानणारे फक्त ११ टक्के निघाले.

सभासदाची बखरं

लेखक शैलेन्द्र यांनी शुक्रवार, 14/08/2009 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली बखर हे मराठ्यांच्या इतिहासाचे अतिशय महत्वाचे असे अस्सल साधन आहे. मृणाल भिडे या विदुशीने ही बखर पी डी एफ मधे तयार केली आहे. हा अमुल्य ठेवा नक्कि वाचावा असा आहे. आपणांस तो हवा असल्यास आपला टेस्ट मेल shailendrakawade@gmail.com इथे पाठवावा.

अरे देवा ....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 14/08/2009 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
गुगलवर भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी यांच्याबद्दल अधिक माहिती गोळा करत असताना हे सापडलं. पाहिल्यावर धक्काच बसला. http://www.iloveindia.com/indian-heroes/bhimsen-joshi.html अशा लोकांचं काय करायचं? विशाल.