कलाकृतींचा उगम
अनंताने लिहीलेल्या "रसग्रहण : सुन्या सुन्या मैफलीत माझ्या" या धाग्यात या कवितेच्या उगमाबद्दलची रोचक माहीती कळली, जी मला आणि कदाचीत येथील बर्याच जणांना आधी माहीत नसावी.
अशाच काही गोष्टी गदीमांच्या कवितेबद्दल ऐकलेल्या आहेत:
- मायाबाजार मधे श्रीकृष्णास उठवण्यासाठी म्हणून जे गाणे लिहायचे होते ते सुचलेले नव्हते. रात्रभर मित्रांबरोबर (कदाचीत बाबूजी वगैरे) जागून ते पहाटेच्या प्रहरी पुण्यनगरीत शिवाजीनगरच्या वगैरे भागात फिरायला म्हणून निघाले आणि त्यांनी नगरपालीकेचे रस्त्यावरील दिवे विझताना पाहीले आणि त्यांना एकदम "विझले रत्नदीप नगरात, आता जागे व्हा यदुनाथ" हे गाणे सुचले!
- बाबुजींनी चाल लावली मात्र गाणे तयारच नव्हते. जे केले होते ते हरवले! आकाशवाणीवर कार्यक्रम तर दुसर्या की त्याच दिवशी होता... त्यांनी गदीमांना एका खोलीत बंद करून ठेवले आणि गाणे लिहून होईपर्यंत बाहेर येता येणार नाही म्हणून सांगितले! त्यातून स्वये श्री रामप्रभू ऐकतीचा जन्म झाला...
- रामजन्माचे गाणे काही केल्या सुचत नव्हते... येराझरा घालताना पाहून वरून विद्या माडगुळकरांनी मध्यरात्रीच्या सुमारास विचारले. ते म्हणाले अग "रामाचा जन्मावरील गाणे लिहीतोय, अण्णा माडगुळाकरांच्या जन्मावरील नाही!"
- बाळंतपणात मृतावस्थेत मूल झाले. सगळ्यांना वाईट वाटले. पण त्या अर्भकाच्या अचेतन देहाला घेऊन जाण्याची तयारी झाली. बाळंतिणीच्या जवळील सुईणीस वाटले नाहीतरी मूल मेलेलेच आहे, काय फरक पडतोय? तीने एक शेकायचा राख तयार झालेला कोळसा त्या अर्भकाचा बेंबीवर ठेवला आणि त्या बाळाने जे काही टँ केले त्यामुळे गीतरामायण काय आणि अनेक उत्कृष्ठ गाणी/कविता तयार करणारे माडगूळकर जगात येऊ शकले!
- जन्माच्या वेळेस नाही पण आदलाबदल होऊन तीच अवस्थ होऊन लिटील मास्टर गावस्कर असाच मासे पकडत बसला असता.
लहानपणी घशाचा काहीतरी त्रास असल्याने आवाज एकदम खराब/घोगरा. पण एकदा काहीतरी लागले म्हणून मोठ्या भावाने त्याला वैदूकडे नेले आणि बिब्बा लावता क्षणी हे आक्रस्ताळी पोर इतके गुरासारखे ओरडले की घसा एकदम साफ! विचार करा तसा नसता झाला तर किशोर कुमार आपण ऐकू शकलो असतो का? :-)
अनेकदा अनेक कलाकृती अशा तयार होतात. त्या जशा काव्यात असतात तशाच इतर कुठल्याही क्षेत्रात असू शकतात. या आठवणी कधीतरी वाचलेल्या ऐकलेल्या आहेत त्यातून लिहील्या. काही चुकले असल्यास अवश्य सांगावे आणि आपल्यास माहीत असलेल्या अशाच विविध कलाकृतींच्या उगमाबद्दल येथे सर्वांना माहीती करून द्या ही विनंती!
वाचने
6194
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
आणखी काही...
In reply to आणखी काही... by नाटक्या
मस्त किस्से
In reply to आणखी काही... by नाटक्या
वा छान!
In reply to आणखी काही... by नाटक्या
बदन पे सितारें किस्सा
मस्त
किस्से
In reply to किस्से by मुक्तसुनीत
सहमत आहे.
सर्वच
जन्मकथा
सुंदर चर्चा!
वाह ! मस्तच
किस्से
आम्रपाली
हा
किस्से आवडले
यादों की बारात सिनेमासाठी
मस्त लेख. वाचनखूण म्हणून
किस्से आवडले, वाचताना शिरिष