Skip to main content

टोमॅटो ऑम्लेट

लेखक प्रभाकर पेठकर यांनी रविवार, 16/08/2009 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः- लालबुंद टोमॅटो ४ मध्यम आकाराचे. चण्याचे पिठ (बेसन) मावेल इतके. कांदे २ आलं १ " कोथिंबीर आवडीनुसार. काश्मिरी तिखट १ टीस्पून मीठ चवीनुसार. चटणी साठी: चिरलेली कोथिंबीर १ वाटी चिरलेला पुदीना १ वाटी हिरव्या मिरच्या ३ मीठ चवीनुसार लिंबू रस १ टेबलस्पून इतरः ब्रेड स्लाईस १, कडा काढून टोमॅटो केचप अमूल बटर कृती: चटणीसाठीचे साहित्य मिक्सरमध्ये फिरवून मुलायम वाटून चटणी करून घ्या. कांदे बारीक चिरुन घ्या. आल्याचे बारिक तुकडे करून घ्या. टोमॅटोची प्यूरी करून गाळून घ्या.

अर्थ

लेखक अ-मोल यांनी रविवार, 16/08/2009 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस सोन्याचा आज उगवला सूर्य स्वातंत्र्याचा नभावर अडगळीतून काढा देशप्रेम दुर्लक्षाची धूळ पुसा बरे सर्वत्र भरो रे आनंदी आनंद ऑफर्स ओसंडो मॉल मॉली चौकाचौकातून पांढरे बगळे विकाया बसोत देश कार्य घरोघरी चर्चा पिकनिक पार्टी देशप्रेम वाहो ग्लासो ग्लासी टीव्हीवर चालो घोष मुक्ततेचा नग्नतेचे दास डोळे होती मुक्त झालो आम्ही परि ना कळेना काय खरा अर्थ स्वातंत्र्याचा तुका म्हणे जगी तोच खरा आहे बनून जो राही ब्रॅंड नेम भारत मार्केट की जय !

क क क क कमीने

लेखक अनामिक यांनी रविवार, 16/08/2009 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
फ्पॉयलर अलर्टः या परिक्फणात(?) कथा न फांगण्याचा खूप प्रयत्न केलाय. तरी वाचकांनी आपापल्या जबाबदारीवर वाचावे. आताच 'कमीने' बघून आलो. आता मी हा चित्रपट का पाहिला अफे विचारणार अफाल तर उत्तर आहे केवळ करमणूकीकरता आणि फनीवारचा वेळ चांगला जावा म्हणून. कालपरवाच्या पेपरात ह्या चित्रपटाला चार चांदण्या (कोण तात्यांच नाव घेतंय रे?) मिळालेल्या पाहिल्या आणि जायचं पक्कं केलं. तफा फमिक्फकांनी दिलेल्या चांदण्यांचा आजकाल माझ्यावर काही परिणाम होत नाही.

प्राध्यापकांचा संप मिटणार कधी ?

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 16/08/2009 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांचा संप सुरु होऊन आज तीस दिवस होत आहेत, [सर्वात मोठा संप चोपन्न दिवसाचा रेकॉर्ड आहे] अजून प्राध्यापकांचा संप मिटण्याची कोणतीच चिन्ह नाहीत. प्राध्यापक संपावर का गेले आहेत ? प्राध्यापक संपावर आहेत कारण महाराष्ट्रातील सर्व शासकीय कर्मचार्‍यांना सहावा वेतन आयोग लागू झाला आहे, त्याची अंमलबजावणी झाली आहे.

स्वातंत्र्यदिनानिमित्त वंदे मातरम्! आणखी दोन बाल कलाकार

लेखक बहुगुणी यांनी रविवार, 16/08/2009 03:47 या दिवशी प्रकाशित केले.
आठवड्याभराच्या भरपूर कामानंतर बाहेर पडायचा कंटाळा, बाहेर धुवांधार पाऊस, आणि सॅटेलाईट टीव्हीचा गायब सिग्नल, या सर्वांचा परिपाक म्हणजे आंतर्जालावर भटकणं, आणि भटकतांना सापडली ही दोन रत्नं! सुरूवात बहुतेक बालपणापासून केली असणारे हे दोघं आता कुमारवयाचे आहेत. पहिली स्मरणिका (ही बहुधा दिल्लीच्या पब्लिक स्कूल मधली विद्यार्थिनी असावी, व्हिडीओज् चे tags पहाता). हिचे, तिच्या वय वर्षे ९ ते १२ या कालावधीतले, यू ट्यूब वरचे instrumental वादनाचे व्हिडिओज सापडले.

मी विश्वास न ठेवण्यावर विश्वास ठेवतो

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 15/08/2009 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
"जसं पृथ्वी गोल आहे असं आपण नेहमीच म्हणतो.जर का त्या गोष्टीत तुला शंका असेल तर अनेक मार्गानी तिची सत्यता पडताळून पहाता येते." अलीकडे मी नक्षत्राचे देणे ही डी.व्ही.डी पहात होतो.ती सुरेश भटांवर प्रोग्राम केलेली होती.मला त्यांच्या कविता फारच आवडतात.

गोविंदा आला रे आला | आता करू या गोपालकाला

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 15/08/2009 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
ज्वारीच्या लाह्या, साळीच्या [तांदळाच्या] लाह्या, पोहे, चुरमुरे थोड्या ताकात ओलसर होतील असे भिजवून घ्यावे, त्यात भिजवून ठेवलेली हरभर्‍याची दाळ घालावी, गाजर, काकडी, पेरू, सफरचंद अशा फळांच्या बारीक फोडी, डाळिंबाचे दाणे [ऐच्छिक] घालावे, लिंबाचे आणि आंब्याचे लोणचे घालावे, खोवलेला नारळ, मीठ, साखर चवीनुसार घालावे, हिरव्या मिरच्या वाटून घालाव्या, आलं बारीक चिरून किंवा खिसून घालावं. म्हणजे चांगली चव येते. अगदी बशा भरतेवेळी किंवा वाटप करायच्या वेळी वरून दही घालावे, सगळे पदार्थ चांगले मिसळावेत आणि हिंग, जिरे-मोहरी घालून तेलाची किंवा तुपाची फोडणी आवडीप्रमाणे द्यावी. फोडणीत हळद मात्र घालू नये.

पारतंत्र्यदिन!

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 15/08/2009 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
mask (खालील लेख हा आठ दिवस सर्व मनोरंजन बंद असल्याने भोगाव्या लागलेल्या मनस्तापाचा झालेला उद्रेक आहे. त्यातून "स्वाइन फ्लू'सारख्या जीवघेण्या समस्येबाबत गांभीर्य नसल्याची भावना झाल्यास, तो निव्वळ योगायोग समजावा!) ---- पारतंत्र्यदिन! छ्या! वैताग आलाय नुसता! कुठे जाणं नाही, येणं नाही. नुसतं घर एके घर नि ऑफिस एके ऑफिस.

नविन खाते अप्रुव्हल

लेखक निमीत्त मात्र यांनी शनिवार, 15/08/2009 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाववर नविन खाते अप्रुव्ह करुन घ्यायची नेमकी काय प्रक्रिया आहे? माझ्या एका मित्राने नविन खात्यासाठी अर्ज देऊन काही आठवडे झाले. त्याला अजूनही खाते मिळालेले नाही. माझा सल्ल्यानुसार त्याने श्री. तात्यांना एमेल पाठवून कळवले त्यालाही अजून उत्तर मिळाले नाही. म्हणून शेवटी इथे प्रस्ताव मांडत आहे. इथल्या प्रशासनाने कृपया योग्य मार्गदर्शन करावे. -निमीत्त मात्र

परिक्षण-गंध (छोटा डॉन स्टाईल)

लेखक विनायक पाचलग यांनी शनिवार, 15/08/2009 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
अखेरीस सात तारखेला 'गंध' प्रदर्शित झाला. अनेक महोत्सवातुन गाजल्यानंतर त्याला प्रेक्षकांपुढे यायला बराच वेळ लागला खरा, पण आता त्याने प्रेक्षकांच्या अपेक्षा पुर्ण केल्या का नाहीत ते येत्या काही दिवसात कळेलचं. पण, माझ्या अपेक्षा पुर्ण झाल्या की नाही ते मात्र मी लिहित आहे.कदाचित माझ्या या लिखाणातुन लोकांनाही हा चित्रपट कसा आहे ते समजेल म्हणुन हा लिखाण प्रपंच. * पहिला प्रश्न म्हणजे 'गंध' हा चित्रपट मी का पाहिला? - 'गंध' हे नांव अनेक फेस्टिवलमधून गाजत होतेच.