Skip to main content

पण तु मात्र....

लेखक प्रेरणा यांनी शुक्रवार, 08/05/2009 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या डोळ्यातील आसवं होवून तळहातावर विसावावं क्षणभर... पण तु मात्र तटस्थ उभी असतेस पापण्यांच्या काठावर तुझ्या केसातील गजरा होवून अलगद ओघळावं मांडीवर... पण तु मात्र निस्पर्श असतेस मिटलेल्या देहावर तुझ्या अनावर वेगाचं भान व्हावं क्षणभर पण तु मात्र पाठमोरी उभी असतेस अधीरल्या डोहावर
लेखनविषय:

वाचने 1629
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

साधी सोपी सरळ रचना.. तरीही पोचणारी! खूप मस्त लिहिलंय!! :) राघव

खूप खूप आवडली कविता. :) क्रान्ति {तापलो रामराया!} अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो! www.mauntujhe.blogspot.com

छान कविता ...